You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एका हॉस्पिटलच्या ICUमधल्या 16 नर्सेस एकाच वेळी गरोदर
अमेरिकेतल्या मेसा, अरिझोना भागात एका हॉस्पिटलमधल्या तब्बल 16 नर्स गरोदर असल्याची अविश्वसनीय घटना समोर आली आहे.
अतिदक्षता विभाग अर्थात ICU मधील 10 टक्के नर्सेस लवकरच बाळाला जन्म देणार आहेत. हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांनाही आता या गोष्टीची जाणीव झाली आहे.
आम्ही पितो त्या पाण्यात काहीतरी दडलं आहे किंवा ख्रिसमसच्या सुट्टीचा एकत्रित आनंद लुटण्याचा विचार आहे, असं या सगळ्याजणींनी गंमतीनं म्हटलं आहे. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
या सोळाजणींपैकी एका नर्सची सप्टेंबरमध्ये प्रसूती अपेक्षित आहे. तर जानेवारीत अन्य एका नर्सची प्रसूती अपेक्षित आहे.
"आम्ही इतक्याजणी एकाचवेळी गरोदर आहोत हे फेसबुक ग्रुप तयार करेपर्यंत लक्षातच आलं नाही. आमच्यात एखादा करार झाल्याप्रमाणे वाटतं आहे," असं रोचेल शेरमन यांनी सांगितलं.
"गरोदर बायका जी कामं करू शकत नाहीत त्या कामांची जबाबदारी आमच्या सहकाऱ्यांनी उचलली आहे. यामध्ये क्षयरोगाशी संबंधित काही उपचार आहेत, कॅन्सर पेशंट्सशी निगडीत काही गोष्टी आहेत," असं जोलेन गॅरो यांनी सांगितलं.
या सगळ्याजणींचं बेबी शॉवर ( डोहाळेजेवण ) पुढच्या आठवड्यात होणार आहे. त्यानंतर बहुतांशीजणी 12 आठवड्यांच्या मॅटर्निटी लिव्हवर जाणार आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)