न्यूझीलंडच्या महिला मंत्र्यानं बाळाला जन्म देण्यासाठी सायकलनं गाठलं हॉस्पिटल

फोटो स्रोत, Getty Images
न्यूझीलंडच्या महिला विभागाचं मंत्रीपद सांभाळणाऱ्या ज्युली जेंटर यांनी आपल्या बाळाला जन्म देण्यासाठी स्वतःच सायकल चालवत हॉस्पिटल गाठलं.
ग्रीन पार्टीशी संबंधित असलेल्या जेंटर यांनी सायकल वापरण्याचं समर्थन करताना सांगितलं की, "माझ्या गाडीमध्ये पुरेशी जागा नसल्यानं मी सायकलचा पर्याय निवडला."
३८ वर्षीय ज्युली यांनी त्यांचा आणि त्यांच्या पतीचा फोटो काढून इन्स्टाग्रामवर टाकला आहे. हा फोटो टाकताना, "रविवारची सुंदर सकाळ एका छान राईडनं पूर्ण केली." अशी पोस्ट लिहिली आहे.
2018च्या जून महिन्यात न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी पदावर असतानाच मुलीला जन्म दिला. असं करणाऱ्या आर्डर्न जगातल्या दुसऱ्या नेत्या ठरल्या आहेत. आर्डर्न आणि जेंटर या दोघींनी बाळाला जन्म देण्यासाठी इथल्या पब्लिक ऑकलंड हॉस्पिटलची निवड केली.
जेंटर या सध्या न्यूझीलंडच्या परिवहन मंत्री सुद्धा आहेत. त्या सायकलवापराच्या पुरस्कर्त्या म्हणून ओळखल्या जातात.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त
त्यांनी आपल्या पाठीराख्यांना प्रतिसाद देताना लिहिलं की, "आम्हाला सगळ्यांच्या शुभेच्छांची आवश्यकता आहे."
त्या पुढे लिहितात, "माझ्या पतीनं आणि मी सायकल चालवत हॉस्पिटल गाठलं. कारण, आमच्या सहकाऱ्यांना एकत्र बसण्यासाठी गाडीत विशेष जागा नव्हती. पण, यामुळे मला आनंदच झाला आहे."
उतारावरून इलेक्ट्रिक सायकल चालवण्याचा आनंदच वेगळा आहे. प्रसूती कळा लवकर याव्यात यासाठी मी याआधीचे काही आठवडे सायकल चालवायला हवी होती, असं त्या गमतीनं म्हणाल्या.

फोटो स्रोत, JULIE GENTER/INSTAGRAM
अमेरिकेत जन्माला आलेल्या जेंटर यांनी काही दिवसांपूर्वी त्या गरोदर असल्याचं इन्स्टाग्रामवरून जाहीर केलं होतं. त्यावेळच्या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या होत्या, "आम्हाला आमच्या सायकलमध्ये अजून एक सीट वाढवावी लागणार आहे."
जेंटर यांनी ३ महिन्यांची प्रसूती रजा घेतली असून त्यानंतर त्या आपल्या कार्यालयात रूजू होणार आहे. त्यांच्या कार्यालयात बाळ असलेल्या अनेक महिला सहकाऱ्यांमध्ये आता त्यांचंही नाव घेतलं जाईल.
न्यूझीलंडमध्ये १९७०मध्ये एका संसद सदस्य महिलेनं बाळाला जन्म दिला होता. तर, याच देशात १९८३मध्ये एका महिलेनं कार्यालयात आपल्या मुलाला सोबत आणत त्याला स्तनपान दिलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
ऑस्ट्रेलियानं २०१६मध्ये आपल्या संसद सदस्यांना संसद भवनात मुलांना स्तनपान देण्यास परवानगी दिली आहे.
नुकतंच युरोपमधल्या स्वीडन आणि इटालियन संसद सदस्यांनी आपल्या लहान मुलांना त्यांच्या संसद भवनातील मतदानावेळी सोबत आणलं होतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)