पाहा फोटो : जगातली ही सर्वोत्तम घरं पाहून तुम्ही थक्क व्हाल

रियाधमधलं एक रिसर्च सेंटर, ग्रामीण चीनमधलं लाऊंज आणि इराणमधली मिनार नसलेली मस्जिद या वास्तू प्रकल्पांना 'वर्ल्ड आर्किटेक्चर फेस्टीव्हल अवॉर्ड्स २०१८'ने सन्मानित करण्यात येणार आहे.

'वर्ल्ड आर्किटेक्चर फेस्टीव्हल अवॉर्ड्स २०१८' साठी ८१ देशांतल्या प्रकल्पांना निवडण्यात आलं होतं. पोर्तुगालमधल्या अवर लेडी ऑफ फातिमा या वास्तूला धार्मिक वास्तूंच्या विभागात स्थान मिळालं असून त्याची निर्मिती प्लॅनो ह्युमॅनो आर्किटेक्चर्स यांनी केली आहे.

नोव्हेंबर महिन्यात अॅमस्टरडॅमध्ये होणाऱ्या तीन दिवसीय फेस्टीव्हलमध्ये विजेत्यांची निवड केली जाणार आहे. जवळपास 100 परिक्षक या वास्तूंचं परिक्षण करणार आहे. बांबू स्टॅलाक्टाईट हे इटलीमधल्या वेनिस इथे ट्राँग न्हाया आर्किटेक्ट्स यांनी तयार केलं आहे.

दे पाओर यांनी आयर्लंड इथं निर्माण केलेलं हे सिनेमा थिएटर. द पालस सिनेमा इन गॉलवे.

ब्राझीलमधल्या बर्नार्डेस आर्किटेक्चर यांनी इथल्या गुआरुजा इथे उभारलेलं हे पेनिन्सुला हाऊस. अटलांटिक सागराजवळचं हे एक सुंदर विकेंड होम आहे.

छोट्या घरांच्या प्रकारात नॉर्वे इथल्या कोड आर्किटेक्चर यांनी उल्लेवल टार्न ही वास्तू उभारली आहे.

इराणमधल्या तेहरान इथे फ्लुईड मोशन आर्किटेक्ट्स यांनी ही मिनार नसलेली अनोखी मशीद उभारली आहे. वाल-ए-सर मशीद असं या वास्तूचं नाव आहे.

दक्षिण अफ्रिकेतल्या हिथरविक स्टुडिओ यांनी उभारलेलं हे केप टाऊनचे झेईट्झ म्युझिअम ऑफ कंटेपररी आर्ट.

या परिक्षकांमधल्या प्रमुख परिक्षक आणि डच आर्किटेक्ट नॅथॅली दे व्राईस या 'वर्ल्ड बिल्डींग ऑफ द इयर' ठरवणार आहे. हॉटेल विभागात सहभागी झालेल्या आणि लिमिनिल आर्किटेक्चर यांनी कोल्स बे, टास्मानिया इथं बनवलेलं हे फ्रेसिनेट लॉज कोस्टल पॅव्हिलियन्स. हा हॉटेलचाच एक प्रकार आहे.

नॉर्वे इथल्या लुंड हॅजेम आर्किटेक्ट्स यांनी उभारलेलं केविटफिजेल केबिन.

सौदी अरेबियामधल्या झाहा हदीद आर्किटेक्ट्स यांनी रियाधमध्ये उभं केलेलं हे द किंग अब्दुल्लाह पेट्रोलियम स्टडीज आणि रिसर्च सेंटर.

स्पेनमधल्या रॅमोन इस्टेवी स्टुडीओ यांनी उभं केलेलं हे डेल्स अल्फोरिन्स वाईन यार्ड.

मिलान, इटली इथल्या तबानलीग्लू आर्किटेक्ट्स यांनी ट्यूबचा वापर करत उभं केलेलं हे अनोखं होसइमोशन

ओक आर्किटेक्ट्स यांनी ग्रीस इथल्या कार्पाथोस इथे उभारलेलं हे विशेष घर.

जागतिक वास्तूकला स्पर्धेतल्या सर्वोत्तम वास्तूंचं अनोखं प्रदर्शन अॅमस्टरडॅम इथं भरणार आहे. जगभरातल्या ८१ वास्तूंपैकी सर्वोत्तम वास्तूला 'वर्ल्ड बिल्डींग ऑफ द इयर' हा पुरस्कार मिळणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)