You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
iPhoneकर्त्यांचा नवा विक्रम; 'अॅपल'ची किंमत झाली 1000 अब्ज डॉलर
आयफोनच्या निर्मात्यांनी आणखी एक व्यावसायिक विक्रम केला आहे. एक ट्रिलियन अर्थात 1000 अब्ज डॉलरएवढं बाजार मूल्य असलेली जगातली पहिली पब्लिक कंपनी होण्याचा मान अॅपलला मिळाला आहे.
न्यूयॉर्क शेअर बाजारात आज दुपारी अॅपल कंपनीच्या शेअरने उसळी घेतली आणि 207 डॉलरपेक्षा जास्त भाव त्यांच्या शेअरला मिळाला.
1980 साली अॅपल कंपनी पब्लिक लिस्टेड कंपनी म्हणून पहिल्यांदा नोंदली गेली. त्यानंतर या कंपनीच्या शेअरचं मूल्य तब्बल 50,000 टक्क्यांनी वाढलं.
2007मध्ये पहिला आयफोन बाजारात आला. त्यानंतर अॅपलच्या शेअरनं अचानक उसळी घेतली आणि 1100 टक्क्यांची वाढ नोंदवली.
1976मध्ये स्टीव्ह जॉब्स यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या अॅपलची ओळख पूर्वी मॅक नावाने पर्सनल काँप्युटर बनवणारी कंपनी एवढीच होती. पण आयफोन बाजारात आला आणि क्रांती झाली. कंपनीचं बाजारमूल्य त्यानंतर प्रचंड वेगाने वाढत गेलं.
जॉब्स यांचं 2001मध्ये निधन झालं. त्यानंतर टिम कुक यांच्याकडे अॅपलची धुरा आली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)