You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नोकियाचा 'बनाना फोन' परत येतोय, जाणून घ्या 6 भन्नाट गोष्टी
- Author, लिओ केलिएन
- Role, टेक्नोलॉजी डेस्क एडिटर
मॅट्रिक्स सिनेमापासून प्रकाशझोतात आलेला नोकिया 8110 मोबाईल परत बाजारात येणार आहे. तर नोकिया 8 सिरोक्को हा स्टील बॉडीचा असणार आहे. दोन्ही मोबाईल येत्या एप्रिलमध्ये बाजारात येणार आहेत.
गेल्या काही वर्षांत नोकिया मोबाईल बाजारातून नामशेष होतो की काय असं वाटत होतं. पण आता ते नवीन अवतारात परत येत आहे. नोकिया 8 सिरोक्को फोन हा आतापर्यंतचा सगळ्यांत मजबूत फोन असल्याचा कंपनी दावा करत आहे. नोकिया 8110 हे मॉडेल बाजारात परत आणताना यामध्ये 4G वापरण्याची सुविधा असणार आहे.
नोकिया फोन बनवणाऱ्या फिनलँडच्या HMD Global कंपनीने गेल्या वर्षापासून या फोनचं नवीन मॉडेल बाजारात आणण्याचा दणका लावला आहे.
नोकिया 8 सिरोक्को
1. स्टील बॉडी
नोकिया मोबाईलचं हे मॉडेल स्टेनलेस स्टीलचं बनलं आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वाकणार नाही, असं कंपनीचं म्हणणं आहे. अॅपलचा आयफोन X ही स्टील बॉडीचा आहे. पण नोकिया अशाच स्टील बॉडीचा फोन कमी पैशामध्ये देणार आहे.
काही लोक पँटच्या मागच्या खिशात फोन ठेवतात. त्यामुळं तो वाकण्याची शक्यता असते. या फोनची बॉडी स्टेनलेस स्टीलची असल्याने तो वाकणार नाही, असं जाणकारांचं म्हणणं आहे.
2. प्रो-कॅमेरा
'प्रो-कॅमेरा मोड'मुळे फोटो काढताना मॅन्युअली नियंत्रण ठेवता येणार आहे.
फोटो काढताना अंधाराचा आणि अती उजेडाचा परिणाम आणि इतर अडचणी कमी करण्यास मदत होणार आहे.
3. क्वॉलकोम प्रोसेसर
यामध्ये क्वालकॉम 835 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. पण त्यापेक्षा उत्तम दर्जाचा क्वालकॉम 845 सध्या बाजारात उपलब्ध आहे. त्यामुळे नोकियाची मार्केटिंग स्ट्रॅटेजी ही मोबाईलच्या कार्यक्षमतेपेक्षा त्याच्या बाहेरून दिसण्यावर असणार आहे. याची किंमत अंदाजे 60 हजार रुपये असणार आहे.
नोकीया 8110
तुम्ही मॅट्रिक्स सिनेमा पाहिला असेल तर त्यामध्ये 'नोकीया 8110' हे मॉडेल वापरण्यात आले आहे.
4) फिचर फोन
'काई (Kai) ऑपरेटींग सिस्टीम' असलेल्या या बनाना फोनमध्ये काही ठरावीक अॅप्लिकेशनच वापरता येणार आहेत. हा केवळ फिचर फोन असल्याने केवळ गुगल मॅप, गुगल असिस्टंट आणि फेसबुकचा वापर करता येईल. तर व्हॉट्सअॅप, ट्विटर आणि स्नॅपचॅट वापरता येणार नाही.
5) बनाना फोन
नोकिया 8110 हा फोन केळ्यासारखा वक्र असल्याने हा 'बनाना फोन' म्हणूनही ओळखला जातो. की-पॅड स्लाइड कव्हर आहे.
नोकिया 8110 फोनचं जुनं मॉडेल जसंच्या तसं लोकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होता, असं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. पण विश्लेषकांच्या मते फोनची किंमत कमीत कमी ठेवण्यासाठी जुन्या मॉडेलमध्ये बदल केला नाही.
6) 4G
लोकांना आठवणीमध्ये रमायला खूप आवडतं. त्यामुळे नोकियाचं जुनं मॉडेल परत बाजार आणलं आहे. जुन्या मॉडेलमध्ये बदल केला असता तर फोन महाग झाला असता, असं CCS इन्साइट कन्सल्टन्सीच्या बेन वुड यांनी सांगतलं.
त्याचबरोबर हा 4G मोबाईल असणार आहे. अगोदर हे मॉडेल फक्त 2G नेटवर्कवर चालायचं. या फोनची अंदाजे किंमत 6 हजार रुपये असणार आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)