You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तान निवडणूक: इम्रान खान यांचा पक्ष सर्वांत मोठा, पण बहुमत हुकणार?
पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिले कल हाती येत आहेत. इम्रान खान यांचा पक्ष PTI (पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ) सध्या आघाडीवर आहे. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता मतदान संपल्यानंतर मतदान केंद्रांवरच मतमोजणीला देशभरात सुरुवात झाली.
रात्री 11.30 - बहुतम हुकण्याची शक्यता
सध्याची स्थिती: (हे कल आहेत, निकाल नाहीत. मतमोजणी रात्रभर सुरू राहील.)
रात्री 10 - इम्रान खान यांची घोडदौड
दुनिया, आज न्यूज, ARY न्यूज आणि बोल या वृत्तवाहिन्यांनुसार सध्या इम्रान खान यांच्या PTI पक्षाने 90च्या पुढे जागांवर आघाडी प्रस्थापित केली आहे. आतपर्यंत या वाहिन्यांनी दिलेले कल खालीलप्रमाणे -
रात्री 9.20 - इम्रान यांचा पक्ष पुढे
इम्रान खान यांच्या पक्षाला सुरुवातीला आघाडी मिळाली आहे. PTI 90 जागांवर आघाडीवर आहे असं ARY न्यूजने म्हटलं आहे. तर डॉन न्यूजनुसार ते 65 जगांवर पुढे आहेत.
रात्री 8 - पहिले कल हाती आले
सुरुवातीला जे कल हाती आले आहेत, त्यानुसार इम्रान खान यांच्या पक्षाला PTI 54 जागांवर आघाडीवर आहे. तर नवाझ शरीफ यांचा पक्ष PML-N (पाकिस्तानी मुस्लीम लीग) 40 जागांवर आघाडीवर आहे.
संध्याकाळी 6.30 - मतमोजणीला सुरुवात
यावेळी मुख्य लढत सत्ताधारी PML-N आणि इम्रान खान यांच्या PTI या पक्षांत आहे, असं जाणकार मानतात. बिलावर भुत्तो झरदारी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या PPP (पाकिस्तान पीपल्स पार्टी) तिसऱ्या क्रमांकावर जाऊ शकते, असा अंदाज माध्यमांनी व्यक्त केला आहे. PPP सध्या 24 जागांवर आघाडीवर आहे.
इम्रान खान यांनी प्रचारादरम्यान बीबीसीला दिलेली मुलाखत इथे पाहा -
मतदानाला हिंसेचं गालबोट लागलं. मतदान सुरू असताना क्वेटा शहरात झालेल्या हल्ल्यात 31 जणांचा मृत्यू झाला. एका मतदान केंद्रानजीक हा स्फोट झाला.
या निवडणुकीच्या प्रचारातही अनेक हिंसक हल्ले झाले होते. त्यात बलुचिस्तानमध्ये 13 जुलैला केलेल्या हल्ल्यात 150 लोकांचा मृत्यू झाला होता. IS ने केलेल्या या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.
पाकिस्तान निवडणुकांशी संबंधित बातम्या -
- पाकिस्तानात आज मतदान - जाणून घ्या या 4 महत्त्वाच्या गोष्टी
- पाकिस्तान : मतदानाच्या दिवशीच बाँबस्फोटात 31 ठार
- पाकिस्तानच्या निवडणुकीत या तरुण चेहऱ्यांची आहे चर्चा
- 'पाकिस्तानात नव्या सरकारच्या स्थापनेचा मार्ग खडतर आणि काटेरी असेल'
- 'पाकिस्तान निवडणुकीत इम्रान खान जिंकावा म्हणून लष्कर ढवळाढवळ करतंय'
- पाकिस्तान निवडणूक : बलुचिस्तानातल्या बाँबस्फोटातील मृतांचा आकडा 128 वर
- ऐन पाकिस्तान निवडणुकांच्या तोंडावर नवाझ शरीफ यांचं राजकीय टायमिंग चुकलं - दृष्टिकोन
- पाकिस्तान : निवडणुकीच्या रिंगणात पुरुषांसमोर उभी ठाकलेली हिंदू महिला
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)