'लांब केसांमुळे तुम्ही आमच्या शोमध्ये येऊ शकत नाही' : इराणी चॅनेलचा फुटबॉलपटूला नकार

फोटो स्रोत, Getty Images
केशरचना बिघडली की अनेक सेलेब्सचा दिवसच खराब होतो, लोक वारंवार टोकत असतात, फोटो चांगले येत नाही, आणि सोशल मीडियावर उगाच ट्रोल होतात. पण एखाद्याने फार मेहनतीनं केसांची निगा राखली असेल आणि त्यासाठीही अडचणीचा सामना करावा लागला तर? बार्सिलोनाच्या एका माजी फुटबॉलपटूसोबत अशीच एक घटना घडली.
बार्सिलोनाचा सुप्रसिद्ध फुटबॉलपटू कार्ल्स प्युयोल यानं एका इराणी टीव्ही चॅनलने वर्ल्ड कप सामन्यांसाठी कॉमेंट्री म्हणजेच समालोचन करण्याचं आमंत्रण दिलं. त्यानं होकारही दिला, पण तो देताना त्याचे लांब कुरळे केस त्याच्या कार्यात विघ्न उभं करतील, याचा त्याने विचारही केला नव्हता.
इराण-स्पेनच्या बुधवारी होणाऱ्या सामन्यासाठी तिथल्या चॅनेल 3 च्या विशेष कार्यक्रमात कार्ल्स निवेदक अॅडेल फर्डोसिपर यांच्यासह सहभागी होणार होता. यासाठी त्याचं मानधनही त्याला देण्यात आलं होतं. पण इराणमधल्या या IRTV 3 च्या तेहरानमधल्या स्टुडीओमध्ये प्रवेश करू पाहणाऱ्या कार्ल्स यांना गेटवरच अडवण्यात आलं, प्रवेश नाकारण्यात आला.
अखेर वैतागलेले कार्यक्रमाचे अँकर फर्डोसिपर हे एकटेच स्टुडीओकडे रवाना झाले. कार्यक्रम सुरू होताच त्यांनी प्रेक्षकांना सांगितलं की, "आज रात्रीच्या या कार्यक्रमात फुटबॉलपटू कार्ल्स प्युओल उपस्थित राहणार होते. सध्या ते इथल्याच एका हॉटेलमध्ये आहेत. त्यांनी इथं यावं यासाठी आम्ही प्रयत्न केले मात्र, ते येऊ शकले नाहीत. आम्ही याबद्दल दिलगीर आहोत."
ISNA न्यूज एजन्सीनं ही माहिती दिली.

फोटो स्रोत, EPA
कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी या फुटबॉलपटूनं जास्त रक्कम मागितल्याची अफवा सुरुवातील उडाली होती. पण गुरुवारी भलतीच माहिती जगासमोर आली.
इराणमधले स्टेट ब्रॉडकास्टर IRIB यांनी प्युओल यांना सांगितलं की, "तुमच्या लांब केसांमुळे आम्ही तुम्हाला या कार्यक्रमात प्रवेश देऊ शकलो नाही." ही माहिती इंतेखाब या न्यूज वेबसाईटनं कार्ल्स यांच्याशी बोलून प्रसिद्ध केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
इराणमध्ये केशरचना म्हणजेच हेअरस्टाईलबद्दल असं कोणतंही विशेष धोरण नाही. पण सरकारी वाहिनी "अपारंपरिक किंवा इस्लामच्या व्याख्येत न बसणाऱ्या गोष्टी" प्रसारित करत नाही.
इराणच्या फुटबॉल फेडरेशनच्या आचारसंहितेनुसार, खेळाडूंनी पाश्चात्त्य संस्कृतीचा पुरस्कार करणारी कोणतीही केशरचना करू नये. यासाठी फुटबॉलपटूंना वारंवार बजावलं देखील जातं.
पण या बातमीनं या सरकारी वाहिनीला सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागला. सुधारणावादी पत्रकार सबा अझरप्येक यांनी, "IRTV 3 वाहिनीनं जगात आमची मान खाली घालायला लावली", अशा आशयाचं ट्वीट केलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
एकानं एका कुरळ्या आणि लांब केसांच्या मॉडेलचा फोटो ट्वीट करत त्यासोबत सरकारी वाहिनीची टर उडवणारी फोटोओळही लिहिली - "सरकारी वाहिनीचे अधिकारी प्युओल यांना या स्वरूपात पाहत होते."
तर @Parvazi_ha यांनी प्युओल यांच्या चेहऱ्यावर मुस्लीम महिला परिधान करतात तसा बुरखा गुंडाळलेल्या स्थितीतला फोटो ट्वीट केला. पुढे ट्वीट करताना लिहिलं की, "प्युओल यांना बुरखा परिधान करून कार्यक्रमात प्रवेश करू देण्याची अट घालायला हवी होती."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
इराणमधल्या टीव्ही वाहिनीमुळे वादंग उठण्याची ही पहिलीच वेळ नाही. दोन वर्षांपूर्वी प्येमेन होसैनी या राष्ट्रीय बीच फुटबॉल टीमच्या गोलकीपरला केवळ लांब केसांमुळे स्टुडीओमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. त्याला केस वर बांधून घेण्याचं सुचवल्यावर त्यानं तेव्हा तसं करण्यास नकार दिला होता.
प्युओल यांना प्रवेश नाकारण्याचा निर्णय हा या सरकारी वाहिनीत काही आठवड्यांपूर्वी घडलेल्या महत्त्वपूर्ण बदलानंतर घेण्यात आला. हा बदल या IRTV 3 चे माजी संचालक अली असगर पोरमोहम्मदी यांच्या जागी इराणमधल्या धार्मिक विचारसरणीला बळ देणाऱ्या नेत्यांच्या एका जवळच्या व्यक्तीला देण्यात आल्यानंतर घडला.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)