You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
क्यूबामध्ये विमान अपघातात 106 लोक मृत्युमुखी
क्यूबाची राजधानी हवानाच्या जवळच एका विमान अपघातात 106 लोक ठार झाले आहेत.
अपघातग्रस्त बोइंग 737 हे विमान सरकारी एअरलाईन्स - क्युबाना डे एव्हिएशनचं होतं. हवानाच्या होजे मार्टी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टजवळच हा अपघात झाला.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार, हे विमान हवानाच्या पूर्वेला असणाऱ्या होलगन शहराकडे निघालं होतं.
विमानात एकूण 104 प्रवासी आणि उर्वरित केबिन क्रूसह 113 जण होते.
क्यूबातल्या कम्युनिस्ट पार्टीचं वृत्तपत्र 'ग्रॅनमा'नं दिलेल्या वृत्तानुसार, 113 पैकी फक्त तिघे जण वाचले आहेत आणि त्यांचीही प्रकृती गंभीर आहे.
क्यूबाचे राष्ट्राध्यक्ष मिगेल दियाझ कनेल हे अपघातस्थळी पोहोचले आहेत. दुर्घटनेचा आवाका पाहता मृतांचा आकडा मोठा असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
राजधानीजवळच विमान अपघात झाल्याने बचाव कार्याला लगेच सुरुवात झाली. क्यूबाच्या एका वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार हे विमान मेक्सिकोच्या दमोझ नावाच्या चार्टर कंपनीकडून क्यूबाच्या सरकारी विमान कंपनीनं भाडेतत्त्वावर घेतलेलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)