You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोदी-जिनपिंग भेट : नौकाविहार आणि 'तू... तू है वही दिल ने जिसे अपना कहा...'
चीनच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय पंतप्रधानांसाठी चीनच्या कलाकारांनी चक्क 'तू... तू है वही दिल ने जिसे अपना कहा...' हे गाणं वाजवलं.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली.
मोदी आणि जिनपिंग हे चीनमधल्या वुहान शहराच्या इस्ट लेक इथं भेटले. दोन्ही नेत्यांनी यावेळी नौकाविहारसुद्धा केला.
PTI वृत्तसंस्थेनं परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्या दाखल्यानं वृत्त दिलं आहे की, दोन्ही नेत्यांनी दहशतवादा विरोधातल्या लढाईत सहकार्य वाढवण्यावर कटीबद्धता व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरून जिनपिंग यांच्या भेटीची छायाचित्रं शेअर करत दोघांमध्ये झालेल्या चर्चेचा संदर्भही दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या छायाचित्राबरोबर लिहलयं की, "राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि मी आज सकाळी देखील चर्चा पुढे सुरू ठेवली आहे. वुहानच्या इस्ट लेक परिसरात फिरत असतांनाची ही छायाचित्रं. आम्ही दोन्ही देशांच्या द्वीपक्षीय संबंधांसंर्दभात विविध मुद्द्यांवर चर्चा केली."
पंतप्रधान मोदी पुढे लिहितात, "चहावर यशस्वी चर्चा. भारत-चीनची मजबूत मैत्री आमच्या देशवासीयांसाठी आणि संपूर्ण जगासाठी फायद्याची ठरेल."
या छायचित्राबरोबर मोदी लिहतात "राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर झालेल्या चर्चेचा फोकस हा भारत-चीन सहकार्याबरोबरच विविध क्षेत्रांवर होता.
आम्ही आर्थिक सहकार्याला गती देण्याच्या पद्धतीविषयी तसंच परस्पर संबंधांविषयी चर्चा केली. इतर क्षेत्रांमध्ये कृषी, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि पर्यटन क्षेत्रावरही आम्ही चर्चा केली."
पंतप्रधानांनी हे छायाचित्र शेअर करताना लिहलं की," अत्यंत सुंदर इस्ट लेकमध्ये अविस्मरणीय नौकाविहार."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)