व्हॉट्सअॅप : 'घरच्या माणसाशी वाद सुरू असताना व्हॉट्सअप बंद होण्यासारखं सुख नाही'

व्हॉट्सअप युझर

फोटो स्रोत, Getty Images

चार वेळा डेटा-पॅक ऑन ऑफ करून, मोबाईल स्वीच ऑन-स्वीच ऑफ करून, आपला मोबाईल खराब झाला, क्रशने आपल्याला रिप्लाय नाही केला, नातेवाईकांनी आपल्याला वाळीत टाकलं, दिवाळीचा एकही मेसेज आला नाही असं टेन्शन घेऊन आता तुम्हाला फायनली कळलं असेल की, आयुष्यात बाकी काही सुरळीत होतं फक्त गेला तास-दीड तास व्हॉट्सअप बंद पडलं होतं.

फक्त भारतातच नाही, तर जगातल्या इतर देशांमध्येही लोकांना अशी अडचण आली होती.

आता भारतात अनेक ठिकाणी ते परत सुरू झालं आहे.

व्हॉट्सअपची मुख्य कंपनी मेटाच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय की, "काही लोकांना मेसेज करताना अडचणी येत आहे याचा आम्हाला कल्पना आहे. आम्ही या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर आम्ही या प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्नात आहोत."

पर्सनल आणि ग्रुप अशा दोन्ही ठिकाणी मेसेज पाठवणं शक्य होत नव्हतं.

भारतीय प्रमाणवेळेनुसार साधारण दुपारी 12 वाजता ही अडचण येत असल्याचं कळलं.

डाऊन डिटेक्टर या वेबसाईटने म्हटलं होतं की हजारो युझर्संचं व्हॉट्सअप बंद पडलं आहे. भारतातल्या अनेक मोठ्या शहरांमध्ये लोकांना ही अडचण येतेय. मुंबई, दिल्ली, कोलकाता.. महाराष्ट्रातल्या शहरांपैकी ठाणे, औरंगाबाद, नाशिक अशा अनेक ठिकाणी लोकांना व्हॉट्सअपवरून मेसेज पाठवता येत नव्हते.

वेब व्हॉट्सअपही काम करत नव्हतं. लोक आपल्या व्हॉट्सअपला वेबशी कनेक्ट करू शकत नव्हते.

त्यामुळे वैयक्तिक आणि कामाच्या ठिकाणी गंमतीजमती घडल्या. आमचंच उदाहरण घ्या ना, ही बातमी करताना लोकांच्या विनोदी कमेंट टाकायचं ठरलं.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

दुसऱ्या शहरात बसणाऱ्या सहकाऱ्याला म्हटलं की दे रे अशा काही कमेंट्स. तर त्याने व्हॉट्सअप बंद आहे यावर असलेल्या रिएक्शन्स बंद व्हॉट्सअपवरच पाठवल्या. फार उशीरा आमची ट्युब पेटली की अरे आज कधी नव्हे तो इमेल वापरावा लागेल.

सोशल मीडियावरही लोक या घटनेबद्दल कोपरखळ्या मारत आहेत.

प्रथमेश शिरवाडकर या अकाऊंटने ट्वीट करत म्हटलं आहे की, "आता व्हॉट्सअपवरून मोठमोठ्या, लांबलचक पोस्ट करणारे लोक त्रासले असतील."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

कूल किरण जे या अकाऊंटने ट्वीट केलंय की, "आता व्हॉट्सअप पण व्हॉट्सअपवरून फॉरवर्ड झालेल्या वैतागलं असेल."

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

व्हॉट्सअप बंद पडलं त्यानंतर अनेक लोक ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त करत होते.

मोहिनी स्पीक्स या अकाऊंटने गर्दीने खचाखच भरलेल्या एका ट्रेनचा फोटो शेअर केला आणि म्हटलं, "ही गर्दी आहे व्हॉट्सअप बंद पडलं म्हणून ट्विटरवर येणाऱ्या लोकांची."

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

बी फॉर भक्ती या अकाऊंटने ट्वीट करून म्हटलं, "घरच्या माणसाशी व्हॉट्सअपवर वाद चालू असताना ते बंद झालंय! आत्ता या क्षणी जर समर्थांनी 'जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारलं तर सगळ्यात आधी तो 'मी' असं म्हणेन."

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

याआधीही व्हॉट्सअप बंद पडलं होतं

नोव्हेंबर 2017 मध्येही व्हॉट्सअप काही काळासाठी बंद पडलं होतं. तेव्हा काय घडलं होतं ते तुम्ही सविस्तर वाचू शकता इथे क्लीक करून.

त्यावेळीही व्हॉट्सॲप बंद पडल्याने युजर्सना शुक्रवारी तासभर एकही मेसेज पाठवता येत नव्हता. अनेकांनी ट्वीट करत यासंदर्भातली माहिती दिली, त्यामुळे ट्विटरवर '#whatsappdown' हा हॅशटॅग ट्रेंडिंग होता.

व्हॉट्सअॅपची सेवा फक्त भारतातच नाही तर जगभरात विस्कळित झाली होती.

गेल्या वर्षीही बंद पडलं

2021 साली नुसतं व्हॉट्सअपच नव्हेत तर फेसबुक, इंस्टाग्रामही जगभरात सहा तासांसाठी बंद पडलं होतं.

5 ऑक्टोबरला रात्री 9.30 च्या सुमारासमारास फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम या तीनही सेवा बंद पडल्या. जगभरात वेबसाईट वा स्मार्टफोनद्वारे या सेवा वापरता येत नव्हत्या.

आतापर्यंतचं या सेवांचं हे सर्वांत मोठं आऊटेज (Outage) म्हणजेच खंडित राहण्याचा काळ असल्याचं डाऊनडिटेक्टर (Downdetector) या सेवांच्या आऊटेजवर लक्ष ठेवणाऱ्या गटानं म्हटलंय. जगभरातल्या तब्बल 10.6 दशलक्ष लोकांनी या काळात आपल्याला सेवा वापरता येत नसल्याची तक्रार नोंदवली होती.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)