You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत-पाकिस्तानः कारगिलजवळचे हे लोक 50 वर्षांपासून आपल्या नातलगांची वाट पाहातायत
- Author, शकील अख्तर
- Role, बीबीसी उर्दू प्रतिनिधी
"माझे तीन भाऊ आणि बहिणी सीमेच्या पलीकडे होते. आई-वडील, भाऊ-बहीण, सगळे एकमेकांना न भेटताच गेले."
हिंडरमन इथं राहाणाऱ्या जैनब बीबी हे सांगताना रडायलाच लागतात. सीमेपलीकडे राहणाऱ्या नातेवाईकांची वाट पाहून त्यांचे डोळे थकले आहेत.
हिंडरमन कारगिलपासून 13 किमी जूर भारत पाकिस्तान सीमेवर उंच पहाडावर एक गाव वसलेलं आहे.
हे गाव सीमेच्या अतिशय जवळ आहे. हिंडरमन आणि त्याच्या आसपासचा भाग आधी पाकिस्तानचा भाग होता. 1971 च्या युद्धानंतर भारताने या भागावर ताबा मिळवला होता. युद्धामुळे अनेक कुटुंब विखुरले.
काही कुटुंबीय पाकिस्तानकडे गेले. काही इथेच राहिले. 50 वर्षानंतरही हे नातलग एकमेकांना भेटलेले नाहीत.
स्थानिक राहिवासी मोहम्मद हुसैन बीबीसीशी बोलताना म्हणाले, "1971 मध्ये आमच्या गावाची फाळणी झाली. अर्धे लोक इथे राहिले आणि अर्धे लोक तिथे गेले. आमचे सगळे व्यवहार या गावात होतात आणि त्या गावातही. आमचे नातलगही आहेत तेथे. कोणाची बहीण कोणाचा भाऊ तिथे आहे, कोणाचे आई वडील तिथे आहेत.
याचं आणखी एक कारण असं आहे की तिथे बहुतांश लोक गरीब आहेत. त्यामुळे दुसऱ्या देशात जाण्यासाठी इतका मोठा प्रवास करण्याची कोणाची तयारी नसते.
दोन्ही सरकारं व्हीसाही पटकन देत नाही हीसुद्धा एक मोठी समस्या आहे.
आठवणींचं संग्रहालय
मोहम्मद हुसैन म्हणतात, करतारपूर कॉरिडॉर उघडल्यामुळे आमच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आम्ही बराचकाळ ही मागणी करतोय की आमचा सीमावर्ती भाग खुला करायला हवा. त्यामुळे दोन्ही सरकारांना फायदा होईल. रस्ताही बराच जवळ आहे. फक्त दहा मिनिटांचा रस्ता आहे.
हिंडरमनमध्ये राहणाऱ्या मोहम्मद इलियास यांचे वडील युद्धाच्या वेळी सीमेच्या दुसऱ्या भागात आणि गावात गेले होते आणि कधीच परत आले नाहीत.
इलियास यांनी दोन्ही देशांत विखुरलेल्या लोकांसाठी आठवणींचं संग्रहालय सुरू केलं आहे.
संग्रहालयामध्ये एक फोटोकडे पाहून इलियास म्हणाले, "ही माझ्या काकांची पेटी होती. जेव्हा मी ती उघडली तेव्हा त्यात त्यांचे कपडे आणि इतर सामान निघालं. आम्ही ते सामान भिंतीवर लावलं."
त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे ते त्यांच्या नातेवाईकांची आठवण करतात जेणेकरून ते लोकांना सांगू शकतील की ते विखुरलेल्या नातेवाईकांना विसरले नाहीत आणि त्यांना नातेवाईकांपासून वेगळे झाले आहेत.
इलियास ने एक फोटो दाखवला आणि म्हणाले- हा माझ्या मामाचा फोटो आहे. त्यांची आठवण म्हणून माझ्याकडे त्यांचा एक फोटो आहे.
अडचणी
गावाच्या काही अंतरावर पाकिस्तानचा प्रदेश दिसतो. सिल्क रोड हिंडरमन गाव आणि कारगील शहराच्यामधून जातो. तो रस्ता अजूनही तिथे आहे. तिथून पाकिस्तानचा परिसर सुरू होतं. त्याआधी थोड्या अंतरावरचा भाग भारताने बंद केला आहे.
तिथे भारतीय लष्कराची छावणी आहे. हा भाग साधारणणे शांत असतो. स्थानिक सज्जाद हुसैन यांच्या मते ही मानवाधिकाराची समस्या आहे.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "लडाख आणि बाल्टिस्तान यांच्या मध्ये 15 हजार कुटुंबं अशी आहेत जे आज विभागलेले आहेत. ही मानवी संकट आहे. आम्ही सरकारला अपिल केलं आहे की ही समस्या मानवी दृष्टिकोनातून सोडवायला हवी. अशा प्रकारचा संघर्ष आम्ही खारमिंग आणि बाल्टिस्तानमध्ये पाहिला आहे.
गिलगिट बाल्टिस्तान विधानसभेत एक प्रस्ताव संमत झाला आहे. मात्र त्याचं पुढे काहीही झालं नाही.
शांत गाव.
सज्जाद हुसैन पुढे म्हणतात की सरकार रस्ते उघडू शकत नाही तर कमीत कमी भेटण्यासाठी एखादा पाॅइंट ठेवावा जिथे नातेवाईक एकमेकांना भेटू शकतात.
"जर हा रस्ता उघडला, तर जे हे सुरक्षेचं केंद्र झालं आहे ते शांततेचं केंद्र झालं आहे.
जैनब आता म्हाताऱ्या झाल्या आहेत. त्यांचे डोळे त्यांच्या कुटुंबीयांची वाट पाहत आहेत आणि नवीन पिढी हा दुरावा मिटवण्याच्या प्रयत्नात आहे.
मात्र हिंडमरन गाव त्यांच्या आठवणी आणि वेदनेबरोबरच उभं आहे.
कारगिल युद्ध
जेव्हा 1999 मध्ये युद्ध झालं तेव्हा कारगिल चर्चेत आलं होतं.
मे-जुलै 1999 मध्ये या युद्धाला भारताने ऑपरेशन विजय असं नाव दिलं होतं.
लढाईत सामील असल्याचं पाकिस्तानने अधिकृतरीत्या स्वीकारलं नव्हतं.
दोन महिने हे युद्ध सुरू होतं. तेव्हा भारताने नियंत्रण मिळवलं. तेव्हापासून 26 जुलै हा विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)