You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेबद्दल लोकांना काय वाटतं?
आज 7 सप्टेंबर पासून काँग्रेस नेते राहुल गांधी 'भारत जोडो' यात्रा सुरू करणार आहेत.
राहुल गांधी यांच्याबरोबर काँग्रेसचे 100 नेते असतील. ही यात्रा पाच महिने चालणार असून 3570 किमीचा टप्पा पार करणार आहे. तसंच 12 राज्यातून ही यात्रा जाणार आहे.
या यात्रेदरम्यान लोकांशी संवाद साधणार आहेत. दिवसा संवाद साधून रात्री ते तात्पुरती सोय जिथे होईल तिथे झोपणार आहेत.
ही संपूर्ण यात्रा काँग्रेसच्या वेबसाईटवर लाईव्ह दिसेल आणि या यात्रेदरम्यान काही गाणीही सादर केली जातील.
या यात्रेबद्दल बोलताना काँग्रेस नेते शशी थरूर म्हणाले, "अनेक मार्गांनी भारताच्या आणि भारतीय घटनेच्या अस्तित्वाची लढाई लढली जात आहे. या यात्रेचा उद्देश असा आहे की आम्ही पक्ष म्हणून भारताच एकीचं वातावरण निर्माण करू आणि धर्म, भाषा, जातीच्या आधारावर सत्ताधारी पक्षाला देशात फुट पाडू देणार नाही.
कन्याकुमारी मध्ये काय वातावरण आहे?
मंगळवार 6 सप्टेंबरला आम्ही कन्याकुमारी मध्ये राहणाऱ्या लोकांकडून 'भारत जोडो' यात्रेबद्दल त्यांना काय वाटतं हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
या लोकांपैकी अनेकांनी सांगितलं की, बुधवारी राहुल गांधी कन्याकुमारीला येत आहे. यापेक्षा जास्त माहिती त्यांच्याकडे नाही.
या उत्तराचं आम्हाला इतकं आश्चर्य वाटलं नाही कारण इतकी महत्त्वाची घटना इथे होणार आहे अशा प्रकारचं कोणतंच वातावरण तिथे नव्हतं.
भारत जोडो यात्रेची घोषणा करणारे एखाद दुसरे पोस्टर आणि बॅनर तिथे दिसत होते. तेही अशा ठिकाणी जिथे राहुल गांधींचं हेलिकॉप्टर उतरणार होतं.
संध्याकाळ झाली तेव्हा विवेकानंद स्मारकाच्या थोडं दूरवर काही काँग्रेस कार्यकर्ते पोहोचले. त्यांनी तिथे एक नाटुकलं सादर केलं आणि लोकांना यात्रेशी निगडीत संदेश देऊ लागले.
तेव्हा काही स्थानिक नेतेही तिथे दिसले. मात्र यात्रेबदद्ल त्यांना फारच कमी माहिती होती.
त्रिवेणी संगमापासून काही अंतरावर दुकान चालवणारे वैरमुथू म्हणाले, "राहुल गांधी येताहेत इतकंच ऐकलं आहे. ते का येत आहेत? हे माहिती नाही."
राहुल गांधी इथे का येताहेत हे त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी फक्त हसून मान डोलावली.
महेश पिल्लई तिथे एक प्रवासी कंपनी चालवतात. ते म्हणाले, "मला असं वाटतं की त्यांची यात्रा नक्कीच यशस्वी होईल. काँग्रेसमध्ये नवीन चेहऱ्यांची गरज आहे." दक्षिण भारतात धर्माच्या नावावर फारसे मतभेद नाही त्यामुळे दक्षिणेत विस्तार करण्याची चांगली संधी काँग्रेस कडे आहे.
नेत्यांचं काय मत आहे?
"ही यात्रा म्हणजे पक्षात नवीन प्राण फुंकण्याची प्रकियासुद्धा आहे. तसंच आमच्या नेत्याची प्रतिमादेखील सुधारत आहोत. आम्ही लोकांचं म्हणणं ऐकणार आहोत. त्यांना कोणत्याही प्रकारचं व्याख्यान देणार नाही." असं पक्षाचे नेते जयराम रमेश म्हणाले.
अशा प्रकारे लोकांचे ऐकणं ही चांगली सुरुवात आहे. कारण लोकसभेत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. सध्या काँग्रेसची फक्त दोन राज्यात सत्ता आहे आणि पक्षात सध्या असंतोषाचं वातावरण आहे. काँग्रेसचे पारंपरिक मतदार आता भाजपकडे गेले आहेत. त्यामुळे धर्मनिरपेक्षता सोडल्यास पक्षाची काय ओळख आहे हा एक प्रश्न आहेच. कारण राहुल गांधी स्वत:च निरुत्साही नेते आहेत.
भाजपशी सामना करणं सध्या तरी काँग्रेससाठी तितकंसं सोपं नाही. जर लोकप्रिय नेत्याने योग्य नेतृत्व केलं तर ही सरकारच्या विरोधात देशपातळीवर एक मोठी चळवळ उभी राहू शकते.
मात्र राहुल गांधी या लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत हे सांगणारा कोणताही पावा नाही. 120000 लोकांमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यापैकी फक्त 9 टक्के लोकांनी राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून पसंती दिली आहे.
याच सर्वेक्षणात अर्ध्यापेक्षा अधिक लोकांनी मोदींना पसंती दिली आहे. "मुख्य नेत्याची विश्वासार्हता नसेल तर असे उपक्रम यशस्वी होत नाहत. गेल्या दोन दशकात राहुल गांधींचा जनतेशी काडीचाही संपर्क राहिलेला नाही त्यामुळे लोकांना त्यांच्यावर कणभरही विश्वास नाही." भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत जय पांडा बीबीसीशी बोलताना म्हणाले.
ऐतिहासिक संदर्भ
1983 मध्ये तत्कालीन विरोधी पक्ष नेते चंद्रशेखर यांनी सहा महिने यात्रा काढली होती. ही यात्रा 4000 किमीची होती.
चंद्रशेखर हेच तळागाळातून आलेले नेते आहेत हे त्यांना सिद्ध करायचं होतं. तेव्हा ते 56 वर्षांचे होते आणि त्यांना मॅराथॉन मॅन म्हणत असत. या यात्रेमुळे त्यांना कोणताही राजकीय फायदा झाला नाही.
पुढच्या वर्षी इंदिरा गांधींची हत्या झाली आणि सहानुभूतीच्या लाटेवर काँग्रेस पक्षाला सत्ता मिळाली.
1990 मध्ये भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही असीच रथयात्रा काढली होती. एका छोट्या ट्रकमध्ये 10 हजार किमीची यात्रा काढण्याचा त्यांचा इरादा होता.
सोमनाथ ते अयोध्या ही यात्रा होती. अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी ही रथयात्रा होती.
मात्र एका महिन्यातच अडवाणींची यात्रा मध्येच थांबवण्यात आली आणि त्यांना अटक करण्यात आली होती.
तेव्हा बिहारमध्ये लालू प्रसाद यादव मुख्यमंत्री होते. त्यांची ही यात्रा भाजपाची ओळख प्रस्थापित करण्यासाठी होती.
अशा प्रकारच्या यात्रांना ऐतिहासिक संदर्भ आहे. 1930 मध्ये महात्मा गांधीनीही अशीच पदयात्रा काढली होती. ही यात्रा 380 किमीची होती.
ही पदयात्रा गांधीजी पूर्ण करू शकतील की नाही अशी शंका होती. मात्र गांधींनी ती पूर्ण केली होती.
चीनचे सर्वोच्च नेते माओंनी 12000 किमी ची यात्रा काढली. ही यात्रा 1934 मध्ये काढली होती. ही यात्रा म्हणजे चीन च्या निर्मितीसाठीचं नवं पाऊल होतं.
"सोशल मीडियामुळे लोकांपर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे जोपर्यंत नेत्यांकडे विश्वासार्हता नाही तोपर्यंत अशा यात्रा यशस्वी होत नाहीत."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)