हड्डी : चित्रपटाचं पोस्टर पाहून तुमचाही गोंधळ उडाला का?

फोटो स्रोत, Getty Images/zee studios
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आगामी चित्रपटातील लुकवरून सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे.
'हड्डी' असं या नव्या चित्रपटाचं नाव असून यामध्ये नवाज एका महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे.
'हड्डी' चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओजने केली आहे. तर दिग्दर्शनाची जबाबदारी अक्षत अजय शर्मा यांच्याकडे देण्यात आली आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचं काम नुकतंच सुरू झालं असून 2023 मध्ये हड्डी चित्रपट प्रदर्शित होईल.
या चित्रपटाबाबत माहिती देण्यासाठी झी स्टुडिओजने एक मोशन पोस्टर त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केलं. यानंतर मात्र या पोस्टरने इंटरनेटच्या जगात धुमाकूळ घातलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
ही पोस्ट करताना झी स्टुडिओजने म्हटलं, "गुन्हा यापूर्वी इतका सुंदर कधीच दिसला नसेल. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा हड्डी या नव्या चित्रपटातील आतापर्यंत कधीच न पाहिलेला अवतार. चित्रपटाचं चित्रीकरण सुरु झालं आहे. 2023 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल."
हड्डी चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज होताच नवाजुद्दीन सिद्दीकीच्या नव्या लुकची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. इतकंच नव्हे तर त्यावरून शेकडो मीम्स बनवण्यात येऊ लागले.
पोस्टरने लोकांचं लक्ष वेधण्याचं एक कारण नवाजचा आगळावेगळा लुक आहे, असं आपण म्हणू शकतो.
पण त्याचं खरं कारण म्हणजे, हा लुक अभिनेत्री अर्चना पुरण सिंग यांच्याशी मिळताजुळता आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर ही सगळी गंमत करण्यात येत असल्याचं दिसून येतं.
झी स्टुडिओजच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना दीपक बनयाल यांनी कॉमेंट केली, "आता कळालं, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अर्चना पुरण सिंग हे कुंभमेळ्यात हरवलेले भाऊ बहीण आहेत. आता नवज्योत सिंग सिद्धू यांचे दोन दुश्मन."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
डॉ. आशिष बेलवाल नामक अकाऊंटवरून ट्विट करण्यात आलं, "अर्चना पुरणसिंगच्या बायोपिकमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
फैजान मीम्सवाला अकाऊंटने कॉमेंट केली, "विनाकारण मेकअपसाठी इतका खर्च केला. यापेक्षा अर्चना पुरणसिंगला यांनाच चित्रपटात घेतलं तर बरं झालं असतं."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
अर्चना पुरणसिंग काय म्हणाल्या?
अभिनेत्री अर्चना पुरण सिंग यांनी आतापर्यंत विविध चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. पण त्यांनी लाफ्टर चॅलेंज, कपिल शर्मा शो यांसारख्या विनोदी कार्यक्रमांमध्ये जज म्हणून केलेल्या कामामुळेच सर्वाधिक ओळखलं जातं.
हड्डी चित्रपटाच्या मोशन पोस्टरमुळे सोशल मीडियावर हा सगळा गोंधळ सुरू झाल्यानंतर अर्चना पुरण सिंग यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.
एका माध्यमाशी बोलताना त्या म्हणाल्या, "त्यांची हेअरस्टाईल माझ्यासारखी असल्यामुळे आम्हा दोघांमध्ये तुलना केली जात आहे. कपिल शर्मा शोच्या सुरुवातीला मी अशाच प्रकारची हेअरस्टाईल करत होते."
अर्चना पुढे म्हणाल्या, "मी इतकंच म्हणेन की नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याशी माझी तुलना होणं हीच माझ्यासाठी सर्वांत मोठी गोष्ट आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)