अकोला: 65 वर्षांच्या आजीची मृत्यूशी 18 तासांची झुंज, फक्त एका फांदीची घेतली मदत

वत्सला आजीला पुराच्या पाण्यातून बाहेर काढताना ग्रामस्थ.

फोटो स्रोत, NITESH RAUT/BBC

फोटो कॅप्शन, वत्सला आजीला पुराच्या पाण्यातून बाहेर काढताना ग्रामस्थ.

सध्या अकोला जिल्ह्यातील वत्सला या 65 वर्षीय आजीच्या धाडसाचं कौतुक होत आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानंतरही धीर न सोडता झाडाच्या फांदीचा आसरा घेत या आजीने 18 तास पाण्याच्या प्रवाहात काढले आहेत.

अकोल्यात संततधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच ऋणमोचन या गावात आलेल्या पुरात ही आजी वाहून गेली होती. दूरपर्यंत वाहून गेलेल्या आजीने झाडाच्या फांदीचा आसरा घेतला.

तब्बल 18 तास झाडाच्या फांदीला पकडून आजीची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर या आजीला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले आहे. वत्सला राणे असं या आजीच नाव आहे. त्या आपातापा या गावातील रहिवाशी आहेत.

नेमकं प्रकरण काय?

वत्सला राणे या अकोला जिल्ह्यातील आपातापा या गावाच्या या गावातील रहिवाशी आहेत. त्या अमरावती जिल्ह्यातील ऋणमोचन येथे दर्शनासाठी गेल्या होत्या.

दरम्यान, पूर्णा नदीच्या काठावर त्या पाय धुण्यासाठी उतरल्या. मात्र पाण्याच्या प्रवाहाचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळं पाण्याच्या प्रवाहात त्या वाहात गेल्या.

आजीला वाहत जाताना तरुणाने पाहिले आणि त्याने आजीला वाचवण्याचा प्रयत्न केला. आजीला वाचवण्यात तरुण अपयशी ठरला.

आजीचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. अखेर एन्डली गावात एका बकऱ्या चारणाऱ्या युवकाला त्या आढळून आल्यास. झाडाच्या फांदीचा आडोसा घेऊन त्या पाण्यात अडकल्याच त्याला दिसून आल्या.

त्याने आजी अडकल्याची बातमी तात्काळ गावकऱ्यांना कळवली. घटनास्थळी गावकरी पोहचले आणि आजीला दोराच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले.

वत्सला आजीला पुराच्या पाण्यातून बाहेर काढताना ग्रामस्थ.

फोटो स्रोत, NITESH RAUT/BBC

गावकऱ्यांनी आजीला घटनाक्रम विचारला तेव्हा ऋणमोचन पासून एन्डली गावापर्यंत पाहून आल्याचं आजीने गावकऱ्यांना सांगितले. हे अंतर दीड किलोमिटर इतकं असल्याचं गावकऱ्यांनी सांगितले.

वत्सला राणे

फोटो स्रोत, Nitesh raut/bbc

फोटो कॅप्शन, वत्सला राणे

या आजी सुखरूप त्यांच्या घरी परतल्या आहेत. मात्र त्यांच्या धाडसाचं सगळीकडे कौतुक केलं जातं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)