BBC Marathi वरील गेल्या आठवड्यातले महत्त्वाचे लेख, खास तुमच्यासाठी

नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या. आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील. पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.

तर मंडळी काळजी नको. आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.

बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.

राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख खास तुमच्यासाठी...

1. सरकार कुणाचेही असो, या कुटुंबांच्या हाती आहे महाराष्ट्रातील सत्तेच्या चाव्या

सत्ता आणि घराणे हे समीकरण नवे नाही. देशात गेल्या 75 वर्षांपासून लोकशाही आहे पण काही मोजक्या कुटुंबाकडेच सत्ता आहे अशी ओरड नेहमीच होताना दिसते. कित्येक वर्षांपासून नेहरू-गांधी हे घराणे राजकीयदृष्ट्या प्रभावशाली आहे हे आपल्याला तर माहितच आहे. पण देशातल्या विविध राज्यातही एकाच कुटुंबाकडे जास्त काळ मुख्यमंत्रिपद राहिल्याचे आपल्याला दिसते.

मुख्यमंत्रिपदच नाही तर आमदार-खासदार या पदांसाठी देखील घराणे किंवा कुटुंब ताकद असल्याचे दिसते. स्थानिक पातळीपासून ते मुख्यमंत्रिपदापर्यंत एकमेकांशी नाते असलेले लोकच राजकारणात प्रभावशाली आहेत.

सत्ताबदलाच्या निमित्ताने राज्यातलं राजकारण ढवळून निघालं. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याशी हातमिळवणी करून सत्तास्थापन केली. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने बंड केलं.

भाजपने या गटाला पाठिंबा दिला आणि एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री झाले. सत्तेच्या या सारीपाटात कोणता नेता कुठल्या पक्षात आणि कुणाच्या बाजूने आहे हे कळेनासं व्हावं अशी परिस्थिती आहे. असं असलं तरी कोण कोणत्या कुटुंबात आहे किंवा कुणाचे नाते कुणाशी आहे हे तर आपण जाणून घेऊच शकतो.

2. भारतात श्रीलंकेसारखी परिस्थिती उद्भवू शकते का?

भारत आणि श्रीलंकेत तशी तुलना होऊ शकत नाही. अर्थव्यवस्था आणि लोकसंख्या या दोन्ही निकषांवर श्रीलंका हा भारताच्या तुलनेत छोटा देश आहे.

पण, सोशल मीडियावर श्रीलंकेतील परिस्थितीची तुलना भारताशी केली जात आहे. भारतात सध्या जे घडतंय तेच काही महिन्यांपूर्वी श्रीलंकेत घडत होतं, अशा आशयाचा मजकूर सोशल मीडियावर झळकत आहे. मग खरंच भारतही श्रीलंकेच्या वाटेनं जाणार का?

3. रणबीर कपूर : 'आमच्या लग्नातले मंत्र मी लक्ष देऊन ऐकत होतो, कारण मला वाटलं...'

अभिनेता रणबीर कपूर सध्या आपल्या शमशेरा सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. रणबीर कपूरचा शेवटचा चित्रपट होता संजू. तो 2018 मध्ये रिलीज झाला होता.

त्यानंतर जवळपास चार वर्षांच्या अंतराने रणबीरचा शमशेरा रिलीज होत आहे. त्यापाठोपाठ याच वर्षी रणबीरचा 'ब्रह्मास्त्र'ही रिलीज होत आहे. यामध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच एकत्र ऑनस्क्रीन दिसतील.

4. रुपयाची घसरण का होतेय? आपल्या खिशावर याचा काय परिणाम होईल?

गुरुवारी (14 जुलै 2022) ला भारतीय रुपयाने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 80 रुपयांचा नीचांक गाठला. त्यानंतर सावरून तो पुन्हा 80च्या वर आला. पण, तरीही मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर रुपयातली सगळ्यात मोठी घसरण अलीकडे बघायला मिळतेय.

तज्ज्ञांचं तर असं म्हणणं आहे की येणाऱ्या काळात तो आणखी खाली म्हणजे अगदी 81 रुपयापर्यंत घसरेल.

रुपया आणि चलनाचा दर या तशा किचकट गोष्टी आहेत. आणि याचा माझ्याशी काय संबंध असंही काही जणांना वाटेल. पण, रोजच्या जीवनात आपल्या खिशावर याचा अप्रत्यक्ष परिणाम होत असतो.

देशाच्या अर्थव्यवस्थेवर तर दूरगामी परिणाम होतो.

5. अलिफिया पठाण: मेरी कोमवरील चित्रपट पाहून तिने बॉक्सर बनण्याचा केला निश्चय

कोणत्याही खेळात कनिष्ठ गटातून वरिष्ठ गटात संक्रमण हे कौशल्याचा कसं पाहणारं असतं. नागपूरच्या अलिफिया पठाणने गेल्या महिन्यात कझाकिस्तान इथे झालेल्या एलोरडा चषक स्पर्धेत माजी विश्वविजेत्या खेळाडूला चीतपट केलं तेव्हा तिच्या खेळात कोणतंही नवखेपण जाणवलं नाही.

अलिफियाने 81 किलो वजनी गटात लझ्झत कुंगइबायेचा 5-0 असा धुव्वा उडवत सुवर्णपदकावर नाव कोरलं.

19वर्षीय अलिफियाच्या कारकीर्दीतला हा महत्त्वाचा टप्पा होता. अलिफियाचा भाऊ शाकीब बॉक्सिंग खेळतो. तो खेळत असताना अलिफिया पाहत असे. दोन भावांच्या पाठीवर असलेल्या अलिफियाला खेळांचा वारसा लाभला आहे.

शाळेत असताना अलिफियाने स्केटिंग, गोळाफेक, थाळीफेक तसंच बॅडमिंटन अशा विविध खेळांमध्ये स्वत:ला आजमावलं. जाणून घेऊ अलिफिया पठाणबाबत..

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)