एकनाथ शिंदे यांच्या बंडातील ईडीच्या रडारवरचे नेते कोण?

यामिनी जाधव, प्रताप सरनाईक आणि भावना गवळी

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, यामिनी जाधव, प्रताप सरनाईक आणि भावना गवळी

महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 37 आमदार आहेत. या बंडात ईडीच्या रडारवर असलेले नेतेदेखील आहेत.

भाजपसोबत गेल्याने कारवाई थांबेल अशी आशा या नेत्यांना वाटतेय का? कोण आहेत हे नेते पाहूया.

प्रताप सरनाईक

एकेकाळी ठाण्यात एकनाथ शिंदे यांचे कट्टर विरोधक मानले जायचे. सरनाईक आणि शिंदे संघर्ष मोठा होता. पण आता शिंदेसेनेत शामिल झालेत.

कथित एनएससीएल घोटाळ्याप्रकरणी सरनाईक ईडीच्या रडारवर आहेत. त्यांची मालमत्ता ईडीनं जप्त केलीये.

NSCL प्रकरणातील आस्था ग्रुपने 21.74 कोटी रूपये विहंग आस्था हाऊसिंगमध्ये ट्रान्सफर केले होते. यातील 11.35 कोटी रूपये विंहग एंटरप्रायझेस आणि विहंग इम्फ्रा या कंपन्यांना देण्यात आले होते असं ईडीचं म्हणणं आहे. या दोन्ही कंपन्या प्रताप सरनाईक यांच्या नियंत्रणात आहेत.

ईडीच्या कारवाईनंतर सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहीलं होतं. त्यात ते सरनाईक म्हणाले होते, "सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतेलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे."

प्रताप सरनाईक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रताप सरनाईक

"निदान यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे," असंही पुढे प्रताप सरनाईक म्हणाले होते.

सुरतमधून निघताना बीबीसीशी बोलताना सरनाईक यांनी भाजपसोबत युती व्हावी अशी मागणी केली होती.

यामिनी जाधव

शिवसेना आमदार यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. यशवंत जाधवही आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या रडारवर आहेत.

काही महिन्यांपूर्वी आयकर विभागाने जाधव यांच्यावर छापेमारी केली होती. यात 40 प्रॅापर्टी जप्त करण्यात आल्या होत्या. यानंतर ईडीने जाधव यांना मनी लॅांडरिंग प्रकरणी चौकशीसाठी नोटीस बजावली आहे.

यामिनी जाधव

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, यामिनी जाधव

जाधव यांच्यावर आरोप करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, "स्थायी समिती अध्यक्षांकडे सुरुवातीला 138 कोटींची संपत्ती होती. आता ती 300 कोटींच्या घरात पोहोचली आहे. 24 महिन्यात 38 संपत्ती खरेदी केल्या आहेत."

भावना गवळी

शिनसेना खासदार भावना गवळी एकनाथ शिंदेंच्या गटात शामिल नसल्या तरी त्यांनी शिंदे गटाला समर्थन दर्शवलं आहे.

उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात त्या म्हणतात, "आपल्या पक्षातील मावळे हिंदुत्वाच्या मुद्यावर आपणास निर्णय घेण्याचीव विनंती करीत आहेत. हे सर्व शिवसेनेचे शिलेदार हाडामासाचे शिवसैनिक आहेत.

त्यांच्या भावना समजून आपण त्यांच्यावर कुठलीही कार्यवाही न करता शिवसेनेसाठी निर्णय घ्यावा"

भावना गवळी ईडीच्या रडारवर आहेत. त्यांना चौकशीसाठी ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं. पण त्या चौकशीसाठी उपस्थित राहिल्या नाहीत.

भावना गवळी

फोटो स्रोत, FACEBOOK/Bhavana Pundlikrao Gawali

फोटो कॅप्शन, भावना गवळी

गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टमधील गैरव्यवहार प्रकरणी ईडीने नोव्हेंबर महिन्यात आरोपपत्र दाखल केलं होतं. या कथित गैरव्यवहारप्रकरणी सईद खान हे भावना गवळी यांचे निकटवर्तीय ED च्या अटकेत आहेत.

त्याची 3.5 कोटी रूपयांची मालमत्ता ईडीने तात्पुरती जप्त केली आहे.

सईद खान महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टचे संचालक आहेत. ईडीच्या दाव्यानुसार, महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टला कंपनीत बदलण्याचं षड्यंत्र विचारपूर्वक रचलेलं होतं. ट्रस्टमधून पैशांची अफरातफर करण्यासाठी हे करण्यात आल्याचं ईडीचं म्हणणं आहे.

लता सोनावणे

जळगावच्या चोपडा मतदार संघातून शिवसेना आमदार लता सोनावणे यांची आमदारकी धोक्यात आलीये. त्यांचं अनूसनचित जातीचं जात प्रमाणपत्र जातपडताळणी समितीने अवैध ठरवलं होतं.

औरंगाबाद खंडपीठाने जातपडताळणी समितीचा निर्णय कायम ठेवला होता.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)