उद्धव ठाकरे कोव्हिड पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?

फोटो स्रोत, facebook
मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं भर पत्रकार परिषदेत जाहीर केलं.
बुधवारी (22 जून) पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, "माझी कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. नाहीतर माझा चेहरा पाहून किंवा बसलेला आवाज पाहून काही लोक वेगळा अर्थ काढतील. पण हे कोव्हिडचे दुष्परिणाम आहेत."
मग कोरोनाची लागण झालेली असताना उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या गर्दीत कसे गेले? नेत्यांना कसे भेटले? ते खरंच कोरोना पॉझिटिव्ह आहेत की त्यांची दुसरी चाचणी निगेटिव्ह आहे? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.
कोरोनाची बाधा तरी भेटीगाठी?
शिवसेनेत बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे बुधवारी पत्रकार परिषदेत पहिल्यांदाच बोलले.
साधारण पाच वाजता त्यांची पत्रकार परिषद सुरू झाली.
ही परिषद संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी थेट वर्षा या निवासस्थानी पोहचले.
तेव्हाही हा प्रश्न उपस्थित करण्यात आला की, मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झालेली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्यांना भेटण्यासाठी कसे गेले.
ही भेट झाल्यानंतर उद्धव ठाकरे तिथेच शिवसैनिकांनाही भेटले.

फोटो स्रोत, facebook
आपल्याला मुख्यमंत्रिपदाचा मोह नाही हे सांगण्यासाठी त्यांनी 'वर्षा हे सरकारी निवासस्थान सोडून मातोश्री या आपल्या खासगी निवासस्थानी जाणार,' अशी घोषणा केली.
उद्धव ठाकरे कुटुंबासह घर सोडणार म्हटल्यावर शिवसैनिकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली. अशावेळी वर्षा बंगल्याचा गेट उघडण्यात आला आणि शिवसैनिक आत गेले. उद्धव ठाकरे सुद्धा यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटले.
वर्षा हे निवासस्थान दक्षिण मुंबईत मलबार हिल येथे आहे. तर मातोश्री हे त्यांचं खासगी निवासस्थान वांद्रे येथे पश्चिम मुंबईत आहे.
उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावरून निघाल्यानंतर वांद्रेतील आपल्या घरापर्यंतच्या प्रवासात शेकडो शिवसैनिकांना भेटले.
या संपूर्ण मार्गावर मुंबईतले शिवसैनिक आपलं समर्थन दर्शवण्यासाठी उभे होते.
मातोश्रीच्या प्रवेशद्वाराजवळ शिवसेनेचं शक्तिप्रदर्शन झालं. यावेळीही अनेकदा उद्धव ठाकरे गाडीतून खाली उतरले.
कोरोनाची लागण झाल्यानंतर नियमानुसार उद्धव ठाकरे यांनी क्वारंटाईन व्हायला हवं होतं. पण तसं झालेलं दिसत नाही. म्हणून हा प्रश्न सामान्य जनतेकडूनही उपस्थित केला जातोय.
उद्धव ठाकरेंविरोधात भाजयुमोची तक्रार
भाजपचे युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी उद्धव ठाकरेंविरोधात ऑनलाईन तक्रार दाखल केलीय.
मलबार हील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्याची माहिती त्यांनी ट्वीट करून दिली आहे.
आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, "कोव्हिड निर्बंधांचं पालन न केल्याप्रकरणी मी तक्रार दाखल केली आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री कार्यालय किंवा शिवसेना यांच्याकडून याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.
काही माधम्यांनी त्यांची RTPCR चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती प्रसिद्ध केली आहे. परंतु उद्धव ठाकरे यांनी आपण पॉझिटिव्ह असल्याचं जाहीर केलं पण त्यांच्या कार्यालयातून त्यांची कोव्हिड टेस्ट निगेटिव्ह आहे, अशी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








