'एकनाथ शिंदेंना भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर'

व

भाजपने एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे, असं एकनाथ शिंदेंच्या अत्यंत जवळच्या सूत्रांनी बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयांक भागवत यांना सांगितलं आहे.

त्यात एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून 4 मागण्या मांडल्या आहेत.

1.गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला.

2.घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे - शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे.

3.पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.

4.महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

तर शिवसेनेकडे केलेल्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर आम्ही भाजपबरोबर सरकार बनवायला तयार आहोत, असंसुद्धा या सूत्रांनी सांगितलं आहे. भाजपची मंडळ एकनाथ शिंदेंच्या सतत संपर्कात आहे असल्याचं सूत्रांनी मान्य केलं आहे.

गुवाहाटीतून एकनाथ शिंदे यांचा बुधवारी सकाळी उद्धव ठाकरेंशी संपर्क झाला आहे. तूर्तास तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. पण आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाणार नाही, असं शिंदेंच्या गोटातून सांगण्यात आलं आहे.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, ANI

उद्धव ठाकरेंना भेटायला जाण्याचा निर्णय सगळ्या आमदारांचा असेल. सगळे एकत्र येऊन निर्णय घेतील उद्धव ठाकरे यांना भेटायचं की नाही, असंसुद्धा या सूत्रांनी बीबीसीला सांगितलं आहे. पण सध्यातरी तसा काही निर्णय झालेला नाही.

एकनाथ शिंदे यांनी वेळेवेळी उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या व्यथा मांडल्या होत्या पण त्यावर काहीच तोडगा काढण्यात आला नाही, म्हणू एकनाथ शिंदेंनी हे पाऊल उचलल्याचं त्यांच्या निकटवर्तींयांचं म्हणणं आहे.

ग्रामीण भागात शिवसेना खूपच कमकुवत आहे, शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळत नाहीये. सरकराच्या कामांच श्रेय मिळत नाहीये, यामुळे आमदारांमध्ये खदखद आहे. जी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली होती, पण त्यातून पुढे काहीच निष्पन्न झालं नाही, असा दावा या सूत्रांनी बीबीसी मराठीशी बोलताना केला आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)