पुढच्या 48 तासांतच धडकणार राज्यात मान्सून, हवामान खात्याचा अंदाज

पाऊस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

उष्णतेच्या लाटेमुळे पोळून निघालेल्या महाराष्ट्रासाठी एक चांगली बातमी येतेय. कर्नाटकच्या सीमेपर्यंत येऊन थबकलेला मान्सून आता पुढे मार्गक्रमण करू लागलाय.

त्यामुळे येत्या 48 तासांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल असं भारतीय हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलंय. म्हणजे 10 ते 11 जूनपर्यंत कोकणात थेट मान्सूनचा पाऊस कोसळेल.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग मंदावला असल्याने गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचा प्रवास थांबला होता.

अरबी समुद्रातून 29 मेला केरळमध्ये प्रवेश केल्यानंतर मान्सूनची कर्नाटकपर्यंतची प्रगती जोरात झाली होती. बंगालच्या उपसागरात असनी चक्रीवादळ तयार झाल्याने मान्सूनला हा प्रवास करता आला होता. मात्र, त्यानंतर मान्सून पुढे सरकला नव्हता.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

मात्र, आता मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली असल्याची माहिती पुण्याच्या हवामान केंद्राचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून दिलीय.

तसंच, येत्या 48 तासांत गोवा, दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या काही भागात मान्सून पोहोचेल असं होसाळीकर यांनी पुढच्या एका ट्वीटमध्ये म्हटलंय.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

दरम्यान, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत 11 जूनला काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणच्या दक्षिण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची इशाराही देण्यात आला.

ठाणे, रायगड आदी भागांतही हलका पाऊस होणार आहे.

धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, बुलढाणा आदी जिल्ह्यांतही चार-पाच दिवस पावसाळी स्थिती असणार आहे.

गेले 10 दिवस राज्यातल्या काही भागात मान्सून पूर्व सरी कोसळतायत. मात्र, विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)