पुणे मेट्रोचे सल्लागार शशिकांत लिमये यांचं निधन

ज्येष्ठ रेल्वे अभियंता आणि पुणे मेट्रोचे सल्लागार शशिकांत लिमये यांचं पुण्यात निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. भारतीय रेल्वेतील तज्ज्ञ अधिकारी म्हणून ते प्रसिद्ध होते.

शशिकांत लिमये यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या कन्या योगिता लिमये बीबीसी न्यूजच्या दक्षिण आशिया प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.

शशिकांत लिमये भारतीय रेल्वेत ज्येष्ठ अधिकारी होते. कोकण रेल्वे आणि पुणे मेट्रोच्या बांधणीत त्यांचा मोठा वाटा होता.

लिमये यांचा जन्म 4 ऑगस्ट 1949 ला झाला. त्यांनी पुणे विद्यापीठातून इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी आयआयटी पवईतून पदव्युत्तर शिक्षण घेतलं.

युपीएससीच्या माध्यमातून इंजिनिअरिंग सर्व्हिससाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतून ते रेल्वेत दाखल झाले. विविध पदांवर काम केल्यावर ते कोकण रेल्वेच्या सुरुवातीच्या दिवसापासून त्याच्या उभारणीत सहभागी होते.

त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. त्यात एस.बी. जोशी स्मृती पारितोषिकाचाही समावेश आहे. आयआयटी मुंबईने त्यांना Distinguished alumnus award ने गौरवलं होतं.

पुणे मेट्रोचा प्रकल्प यशस्वी होण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)