ब्रिजभूषण शरण सिंह- '...तोपर्यंत मी राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही'

फोटो स्रोत, ANI
राज ठाकरे यांना अयोध्येत पाय न ठेवू देण्याचा इशारा भाजपचे उत्तर प्रदेशातले खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी दिली आहे.
अयोध्येला येण्याआधी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. "राज यांनी सार्वजनिक माफी मागितली नाही तर मी त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही," असं ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटलंय.
"योगी आदित्यनाथ यांनी जनभावना लक्षात घेता जोपर्यंत राज माफी मागत नाही तोपर्यत त्यांना भेटू नये," अशी मागणीसुद्धा ब्रिजभूषण यांनी केली आहे.
"ही माझी वैयक्तिक मागणी आहे, यामागे कुठलही राजकारण नाही. मी स्वतःला रोखू शकत नाही. हे आजचं नाही. हे 2008 पासूनचं आहे. तेव्हापासून मी हे पाहात आहे. आज मुंबईच्या विकासात 80 टक्के योगदान हे बाहेरून आलेल्या लोकांचं आहे. त्यांनी मुंबई सोडली तर काय होईल? राज ठाकरे यांनी आधी चूक केली आहे. त्यांनी चूक सुधारावी अशी आमची मागणी आहे," असं ब्रिजभूषण यांचं म्हणणं आहे.
राज ठाकरे 5 जूनला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठी मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईत सध्या मनसे त्यासाठी मोठ्या प्रमाणावर होर्डिंगबाजी करत आहे.
राज ठाकरे हे हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालण्याआधी उत्तर भारतीयविरोधी नेते म्हणून ओळखले जात होते. मनसेनं मराठी तरुणांच्या नोकऱ्यांवरून आंदोलन करताना अनेकदा मुंबई आणि परिसरातल्या उत्तर भारतीयांना टार्गेट केलं होतं.
उत्तर भारतीयांविरोधातल्या वक्तव्यांमुळे राज ठाकरे यांचा अनेकदा उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये विरोध झाला आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








