मेटाव्हर्स म्हणजे काय? बॉलिवूड सिनेमे बघण्याचा अनुभव त्यामुळे कसा बदलेल?

मेटाव्हर्स

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, पराग छापेकर
    • Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

हे नवीन जग आहे- मेटाव्हर्स. मेटाव्हर्सच्या माध्यमातून आता चित्रपटसृष्टी अशा एका जगात प्रवेश करायला सज्ज आहे, जे आपल्या कल्पनेच्याही पलिकडचं असेल. बॉलिवूडमधले मोठे निर्माते मेटाव्हर्सच्या माध्यमातून मनोरंजनाचं जग एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे.

येत्या दोन वर्षांत भारतातलं मेटाव्हर्सचं मार्केट 800 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. याची सुरूवातही लवकरच होत आहे. 'बडे मियां छोटे मियां' नावाच्या फिल्मनं याची सुरूवातही झाली आहे.

बॉलिवूड आणि मेटाव्हर्स एकत्र आल्यानंतर काय घडू शकतं, हे पाहण्याआधी मुळात मेटाव्हर्स हा काय प्रकार आहे हे जाणून घेऊ.

मेटाव्हर्स दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे. मेटा म्हणजे पलिकडचं, अर्थात जी गोष्ट अस्तित्त्वात नाही आणि कल्पनेपलिकडची असले. व्हर्स म्हणजे युनिव्हर्स, जे आपल्या नजरेला दिसत नाही. ढोबळमानानं अर्थ सांगायचा झाल्यास आभासी दुनिया.

मेटाव्हर्स काय आहे आणि त्यावर कसं नियंत्रण ठेवता येतं?

1992 मध्ये जेव्हा नील स्टीफन्सननं 'स्नो क्रश' या आपल्या पुस्तकात अशा जगाची कल्पना केली होती, तेव्हापासूनच हे कधी ना कधी प्रत्यक्षात येईल असं वाटलं होतं.

अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास मेटाव्हर्सचा अर्थ एक अशी जागा जिथे तुम्ही नसता किंवा जिथे असण्याचा विचारही करू शकत नाही, तिथे तंत्रज्ञानाच्या आधारे तुम्ही आभासीरित्या उपस्थित असता.

अगदी आपल्या घरात बसूनही तुम्ही तुमच्या आवडीच्या जगात आणि आवडीच्या गोष्टींपर्यंत पोहोचू शकता. मेटाव्हर्स 3 डी स्पेसमध्ये युजर्सना एकत्र काम करण्याची, भेटण्याची, गेम खेळण्याची आणि सोशलाइज होण्याची संधी देते.

मेटाव्हर्स फिल्मी दुनियेचा हिस्सा बनेल?

गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय चित्रपट टेक्नॉलॉजीच्या आधारे अनेक भव्यदिव्य प्रयोग करत आहेत. व्हीएफएक्स आणि स्पेशल व्हर्चुअल इफेक्टस तर आता अनेक चित्रपट किंवा वेब सीरिजचा भाग बनले आहेत.

पूजा एंटरटेन्मेन्ट कंपनी ही मेटाव्हर्समध्ये सिनेमा बनवणारी पहिली प्रॉडक्शन कंपनी असेल. काही दिवसांपूर्वी याच बॅनरनं अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांना घेऊन 'बड़े मियां छोटे मियां' चित्रपटाची घोषणा केली.

मेटाव्हर्स

फोटो स्रोत, Getty Images

या कंपनीने व्हर्चुअल प्लेसला पूजाव्हर्स असं नाव दिलं आहे. पुढच्या वर्षी ख्रिसमसला रिलीज होणारी ही फिल्म हिंदीशिवाय तेलुगू, तमीळ, कन्नड आणि मल्याळममध्येही रिलीज केली जाईल.

प्रसिद्ध निर्माते आणि पूजा एंटरटेन्मेन्टचे प्रमुख वाशू भगनानी यांनी सांगितलं, "मेटाव्हर्स ही नवीन गोष्ट आहे आणि जेव्हा असं काही होतं तेव्हा सगळ्यांचाच फायदा होतो. बॉलिवूडला होणारा मोठा फायदा म्हणजे सगळं जग आपल्याला पाहू शकतं. एरव्ही आपल्याला चीन किंवा यूएसला जाण्यासाठी भौगोलिक मार्गानेच जावं लागायचं. आता त्याची आता गरज नसेल."

वाशू भगनानी यांच्या मते यांमुळे बॉलिवूडला जास्त काम मिळेल आणि जगातही आपला सन्मान वाढेल. सलमान खान, अक्षय कुमार, ऋतिक रोशन, टायगर श्रॉफ यांच्यासारख्या स्टार्सना मेटाव्हर्सचा फायदाच होईल."

अनेक स्टार्सचंही मेटाव्हर्सवर पदार्पण

अजय देवगणनं 'रूद्र-द एज ऑफ डार्कनेस'च्या माध्यमातून वेबसीरिजच्या विश्वात पदार्पण केलं आहे. आता तो मेटाव्हर्सवरही येत आहे. मेटाव्हर्ससाठी हंगामा डिजिटलच्या वेब-3 व्हेंचर हेफ्टी एन्टरटेन्मेंट सोबत टाय-अप केलं आहे.

अजय देवगण सांगतो की, "मेटाव्हर्स तुम्हाला एका वेगळ्याच जगात घेऊन जातं. 'रूद्र-द एज ऑफ डार्कनेस'मध्ये माझ्या भूमिकेसोबतच मेटाव्हर्सही एक महत्त्वाचा भाग असेल."

या सायकॉलॉजिकल क्राइम ड्रामामध्ये अजय देवगण एका पोलिसाच्या भूमिकेत आहे. सोबत इशा देओल आणि अतुल कुलकर्णीसारखे कलाकारही आहेत. ब्रिटीश सीरिज 'लूथर'च्या भारतीय रुपांतराला बीबीसी स्टुडिओज इंडियासुद्धा प्रोड्युस करत आहे.

कमल हासनही मेटाव्हर्सवर येत आहेत. ते फ्रँटिकोसोबत आपला नवीन डिजिटल अवतार म्हणजेच डिजिटल रिअलिटी स्पेस लॉन्च करत आहेत.

अजय देवगण

फोटो स्रोत, Getty Images

फ्रँटिको हे गेमवर आधारित मेटाव्हर्स आहे, ज्यामध्ये कमल हासनचं स्वतःचं वेगळं व्हर्चुअल जग असेल. ही एक डिजिटल रिअलिटी स्पेस असेल ज्या माध्यमातून जगभरातील त्यांचे फॅन्स त्यांच्याशी जोडले जातील, तसंच मर्चेन्डाइजही खरेदी करू शकतील.

कमल हासन यांनी आपल्या एका निवेदनात म्हटलं आहे, "मी मेटाव्हर्स या नावानं ओळखल्या जाणाऱ्या नवीन जगाला जाणून घेण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे."

तुम्हाला कदाचित माहीत असेल की, जस्टिन बीबर, मार्शमेलो, ट्रॅविस स्कॉटसारखे अनेक इंटरनॅशनल गायकांनी याआधीही मेटाव्हर्सवर कॉन्सर्ट केला आहे. दलेर मेहंदी मेटाव्हर्सवर परफॉर्म करणारे पहिले भारतीय कलाकार ठरलेत. त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मेटाव्हर्सवर परफॉर्म केलं. पार्टी नाइट नावानं त्यांनी एक म्युझिकल केलं.

भारतात अनेक मेटाव्हर्स स्टार्ट अप आल्यामुळे मेटाव्हर्स स्पेस वाढली आहे. म्युझिक कंपनी टी-सीरिजनं हंगामा टीव्हीसोबत जॉइंट व्हेंचरमध्ये मेटाव्हर्सवर येण्याची घोषणा केली. टी-सीरिजचे सर्वेसर्वा भूषण कुमार यांनी सांगितलं की, त्यांनी आपल्या पार्टनर 'हंगामा'सोबत बॉलिंग रोलिंग सेट केलं आहे. ते एनएफटी म्हणजेच डिजिटल कलेक्टेबल्स आणि 'मनी कॅन नॉट बाय'चा अनुभव देईल.

अर्थव्यवस्था बदलण्याची क्षमता

त्यामुळे भारतीय भाषांमधली दोन लाख गाणी आणि 65 हजार संगीत व्हीडिओ तसंच 150हून अधिक चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील. त्यांनी सांगितलं की, ही गोष्ट जगभरातील डिजिटल कलेक्टेबल्सला खरेदी करण्यासाठी तसंच व्यापार करण्यासाठी सक्षम बनवेल. तेच उत्पन्नाचंही साधन असेल.

मेटाव्हर्स

फोटो स्रोत, Getty Images

भूषण कुमार म्हणतात, "सध्या तरी मेटाव्हर्स गेमिंगवर अधिक लक्ष केंद्रित कर आहे. आपण सुरुवातीच्या टप्प्यांत आहोत. पण तरीही यामध्ये खूप संधी दडल्या हेत. आता आपल्याकडे एम अँड ई उद्योगांसाठी मेटाव्हर्सचा विस्तार करण्याची योग्य वेळ आलीये. मनोरंजन मेटाव्हर्सवर आल्यामुळे प्रेक्षकांना एक नवीन जागा मिळणार आहे."

टी सीरिजचे प्रमुख अधिक विस्तारानं सांगतात, "उदाहरण द्यायचं झाल्यास जर आता आपल्याला संगीतविषयक कार्यक्रमाचं आयोजन करत आहोत, तर लाइव्ह स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर करण्याऐवजी मेटाव्हर्सवर करू शकतो आणि प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देऊ शकतो. त्यामुळेच मला वाटतं की, मेटाव्हर्स मनोरंजन विश्वातही महत्त्वाचं ठरू शकतं. केवळ आपण योग्य पद्धतीने वाटचाल करून वेगळा विचार करायला हवा."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)