Google Doodle : गूगल येण्यापूर्वी आपलं आयुष्य कसं होतं?

गूगल आपल्या होमपेजवर एखाद्या निमित्तानं डूडल प्रसिद्ध करतं. पहिलं डूडल आजपासून बरोबर 23 वर्षांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आलं होतं. त्यानिमित्तानं हे वृत्त पुन्हा देत आहोत :
काही लोकांना जास्त थंडी का वाजते? नव्या कोऱ्या पुस्तकांना खास असा गंध का येतो? प्रेम म्हणजे काय असतं?
गुगलच्या स्थापनेपासून गेल्या वीस वर्षात, या आणि अशा प्रश्नांची उत्तरं गुगल आपल्याला पुरवत आलं आहे. गुगल हे आता विशेषनाम झालं आहे. मात्र काही दिवसांपूर्वी गुगलला 5 अब्ज डॉलर इतक्या मोठा रकमेचा दंड भरावा लागला. आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकण्यासाठी त्यांनी काढलेली क्लृप्ती महागात पडली आहे.
संशोधनावरआधारित कामं गुगलच्या आगमनानंतर खूपच सोपी झाली. गुगल नसतं तर या मंडळींचं काय झालं असतं ही कल्पनी करवत नाही.
पत्रकार गॅरेथ ह्यूज यांनी 1974 ते 2006 या काळात नॉर्थ वेल्स भागातल्या डेली पोस्ट न्यूजपेपरसाठी वार्ताहर म्हणून काम केलं. या लेखाच्या लेखकाचे ते वडील होत.

फोटो स्रोत, GARETH HUGHES
मला असंख्यविध विषयांवर लिहावं लागत असे. मला सगळ्यातलं सगळं यावं अशी कुणाचीही अपेक्षा नसे. माझ्याकडे विश्वकोश असे. जवळच एक ग्रंथालय होतं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्याकडे माहितीचं भांडार आहे अशा माणसांना मी ओळखत असे. प्रत्येक गावात कुणी ना कुणी आपल्या ओळखीचं आहे असा विचार करून मला आनंद होत असे.
लिव्हरपूलमध्ये एक सेंट्रल लायब्ररी होती. ते प्रत्येक बातमीचं कात्रण जतन करत असत. तुम्हाला एखाद्या विषयाशी संबंधित काही हवं असेल तर ग्रंथपालांना सांगितलं की ते शोधून फॅक्स करत असत. फारच चांगली माणसं होती.
माझ्याकडे सगळा दस्तावेज असे. कडाक्याच्या थंडीत आसपास फारशी वस्ती नाही अशा एका घरी चिमुरडीचा जन्म झाला. साखरेच्या लहान पोत्याएवढंही तिचं वजन नव्हतं. रुग्णवाहिकेतून नेताना कॉटनच्या शालीत तिला गुंडाळलं होतं. बर्फाच्छादित रस्ते ओलांडत रुग्णवाहिका रुग्णालयापर्यंत पोहोचली. ती चिमुरडी जगेल याची कोणालाच शाश्वती नव्हती.
सहा महिन्यांनंतर त्या मुलीला घरी सोडलं तेव्हा मी एक बातमी केली होती. अनेक वर्षांनंतर कात्रणं चाळत असताना मला ती बातमी सापडली. माझ्या लक्षात आलं की काही दिवसातच ती मुलगी 21वर्षांची होईल. मी काही नंबर मिळवले. स्थानिक पोस्टऑफिसला संपर्क केला. ती मुलगी माझ्या कार्यालयापासून काही मिनिटांवर राहत होती हे मला समजलं.
तोपर्यंत गुगल आलं होतं याचा निश्चितच फायदा झाला. परंतु थेट संपर्क, बोलणं होण्याची त्याला सैर नाही.

फोटो स्रोत, Getty Images
बॅरिस्टर हिलरी हेलब्रॉन क्युसी यांनी ज्युनियर बॅरिस्टर म्हणून 1972मध्ये काम करायला सुरुवात केली. त्या आता लंडनमधल्या ब्रिक कोर्ट चेंबर्सच्या सदस्य आहेत. कमर्शियल लॉ आणि इंटरनॅशनल आर्बिट्रेशन यात त्यांनी काम केलं आहे.
ज्युनियर बॅरिस्टर असताना, तुम्हाला सूचना मिळतात, तुमचा अभ्यास तुम्हालाच करावा लागतो. विधि अहवाल, पाठ्यपुस्तकं, ग्रंथालयात जाणं. अन्य संशोधनासाठी मिडल टेंपलला जावं लागत असे. तिथे येणाऱ्या केसमधून एखादा धागा मिळत असे.
आता विधि अहवाल ऑनलाईन उपलब्ध आहेत. माझ्या बुकशेल्फमध्ये विधि अहवाल आहेत. ते दिसायला छान दिसतात पण प्रत्यक्षात त्यांचा काही उपयोग नाही.
ऑनलाईन संग्रहीकरणामुळे खूप सारा वेळ वाचला आहे. हे सोयीस्कर आहे. पण आता प्रचंड प्रमाणात माहिती उपलब्ध आहे. माहितीची शहानिशा करण्यात वेळ जातो. तुम्हाला काळजीपूर्वक राहावं लागतं.
त्या काळी जाहिरात करता येत नसे. विपणनाची कल्पना औपचारिक आहे. चांगलं काम करूनच तुम्ही माणसं जोडू शकत होतात. क्लाएंट परत येतील या आशेवर काम चालायचं.
ग्रंथपाल दशकांपूर्वी न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररीतील मंडळी मानवी गुगलसारखं काम करत. सदस्यांचे प्रश्न ते टिपून घेत असतं. हाताशी असलेल्या संसाधनांमधून ते माहिती हुडकून काढत. गेल्या काही वर्षात, तिथल्या कर्मचाऱ्यांनी बॉक्स कार्डची व्यवस्था अंगीकारली आहे. लायब्ररीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचा तपशील दिला जातो.

फोटो स्रोत, Getty Images
1948मध्ये एका वाचकाने विचारलेला प्रश्न काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर टाकण्यात आला होता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त, 1
कॅन माइस थ्रो अप? असं 1949मध्ये एका माणसाने विचारलं होतं. त्यामागची कारणं माहिती नाही. त्यांनी हो असं उत्तर दिलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त, 2
विषारी सापाने स्वत:लाच दंश केला तर तो मरतो का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त, 3
1949मध्ये एका माणसाने विचित्र वाटावा असा हा प्रश्न विचारला होता. 2018मध्ये गुगल केल्यानंतर त्याचं उत्तर मिळालं- नक्की कोणालाच ठाऊक नाही याबद्दल.
हाय नून कोणत्यावेळी होते?
उत्तर आहे दुपारी 12 वाजता
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त, 4
18व्या शतकातल्या चित्रांमध्ये खूप साऱ्या खारी दाखवलेल्या दिसतात. चित्रकाराचा त्या चावा कसं घेत नाहीत? चित्र काढताना खारींची पळापळ होऊ नये म्हणून ते काय करतात?
गुगलने असं सांगितलं की त्याकाळी स्त्रिया खारींना पाळत असत. कदाचित याच्यातच त्याचं उत्तर असावं.
अभ्यास, संशोधन
1970च्या दशकात जेनिस येलिन यांनी बोस्टनमधल्या प्राचीन न्यूबिअन स्टडीजमध्ये पीएचडी पूर्ण केली. मॅसाच्युसेट्समधल्या बाब्सन कॉलेजात त्या आता प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. "गुगलने सगळं काही बदललं. संग्रहालय किंवा ग्रंथालयात न जाता, वेळ न घालवता मला जगातली कोणतीही माहिती चुटकीसरशी मिळू शकते. संशोधन करण्यासाठी लागणारा वेळ 80 टक्क्यांनी कमी झाला"

फोटो स्रोत, JANICE YELLIN
"दिवसभराची आखणी करावी लागत असे. आता मी माझ्या डेस्कवर बसून शांतपणे काम करू शकते. मी एखाद्या विषयावर काम करत असेन आणि त्याची पुरेशी माहिती माझ्याकडे नसेल तर मला सगळं बाजूला ठेऊन ग्रंथालयात जावं लागत असे. पण त्यामुळेच ग्रंथालयातल्या लोकांशी बंध तयार होत असे. एखाद्याच्या कारकीर्दीच्या विकासाबाबत सांगायचं तर त्यामध्ये प्रचंड मूल्यव्यवस्था होती. ऑनलाईन काम करणं हे एकलकोंडं करणारी भावना आहे. माणसं आणि पुस्तकांच्या संगतीत वेळ व्यतीत करणं सुरेख असतं. युवा मंडळींकडे असं नेटवर्क नाही".
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)