हिरोपंती-2: टायगर श्रॉफ 'छोटी बच्ची हो क्या?' मीम व्हायरल होण्यामागची मजेदार कहाणी

फोटो स्रोत, Heropanti/social media viral photo
"क्या करूं सबकी आती नहीं, मेरी जाती नाही.... छोटी बच्ची हो क्या?...अगर कुछ हो जाता तो... "
अभिनेता टायगर श्रॉफचा हिरोपंती नावाचा एक चित्रपट 2014 साली आला होता. या चित्रपटात टायगरच्या तोंडी असलेला हा डायलॉग.
हिरोपंती चित्रपटापासूनच टायगरने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती.
दिग्गज अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा सुपुत्र असलेल्या टायगरचा पहिला चित्रपट म्हणून 2014 मध्ये हिरोपंती चित्रपटाची बरीच चर्चा झाली.
हिरोपंती हा खरंतर अल्लू अर्जुनच्या 'परुगू' या तेलुगू चित्रपटाचा रिमेक. हिरोपंतीच्या निमित्ताने त्यावेळी टायगरचं पदार्पण, त्याचा अभिनय, लूक्स, लवचिक शरीरयष्टी, अशक्यप्राय स्टंट आणि डान्स यांची चर्चा झाली.
अभिनेत्री क्रिती सेननचा हा पहिला हिंदी चित्रपट असल्याने त्याचीही चर्चा केली गेली. हिरोपंतीने बॉक्स ऑफिसवर ठीकठाक कमाई केली, त्याबद्दलही त्यावेळी बोललं गेलं होतं.
पण 8 वर्षांपूर्वी जेव्हा हिरोपंती आला, तेव्हा टायगरच्या तोंडच्या या डायलॉगची विशेष अशी चर्चा झाली नव्हती. पण मग आता लोकांमध्ये हा डायलॉग इतका का चर्चेत आहे?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त, 1
खरं तर सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट ट्रेंड होण्यासाठी वेळ, काळ, विषय अशी कोणतीही मर्यादा नसते. एखादी कन्सेप्ट पुढे आली, लोकांना ती आवडली की झाला ट्रेंड सुरू. पण हा ट्रेंड सुरू होण्याची कहाणी मात्र नेहमीच रंजक अशी असते.
'छोटी बच्ची हो क्या?'चंही अगदी सेम. 8 वर्षांनी हिरोपंती चित्रपटातला हा डायलॉग सोशल मीडियावर सध्या ट्रेंड होतोय. लोकांना पोट धरून हसायला लावणाऱ्या या ट्रेंडमागे नेमकं कोण आहे, त्याचं कारण काय आहे, याची कहाणीही तितकीच मजेदार आहे.
दीपेंद्र सिंगची मिमिक्री
दीपेंद्र सिंग नामक एक मिमिक्री कलाकार इन्स्टाग्रामवर आहे. दीपेंद्र हा अजय देवगण, अक्षय कुमार, सलमान खान, संजय दत्त, परेश रावल, नवाजुद्दीन सिद्दीकी तसंच सोनू निगम यांच्यासारख्या कलाकारांची मिमिक्री करून त्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करायचा. त्याच्या व्हीडिओंना पूर्वीपासूनच लोकांची पसंती मिळायची.
पण दीपेंद्रने केलेल्या टायगर श्रॉफच्या मिमिक्रीला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळाली.

फोटो स्रोत, Instagram
हिरोपंती चित्रपटात अभिनेता टायगर श्रॉफचं पात्र (बबलू सिंग) हा क्रिती सेननच्या पात्राला (डिम्पी चौधरी) उद्देशून हे वाक्य बोलतो. होतं असं की डिम्पी ही दिल्ली रेल्वे स्टेशनवर गुंडांच्या तावडीत सापडते. गुंड तिला घेऊन एका निर्मनुष्य ठिकाणी जातात. पण बबलू आणि डिम्पीचे वडील (प्रकाश राज) डिम्पीचा शोध घेत त्याठिकाणी पोहोचतात. मारधाड अॅक्शन करत बबलू तिला गुंडांच्या तावडीतून वाचवतो.
पण यानंतर रागावून बबलू डिम्पीच्या वडिलांसमोरच तिला सुनावतो. तो डिम्पीला म्हणतो, "छोटी बच्ची हो क्या? समझ नहीं आता की साथ रहो? कुछ हो जाता आज तो?"
दीपेंद्रने याच डायलॉगचा मिमिक्री व्हीडिओ बनवला. 'छोटी बच्ची हो क्या' मिमिक्रीचा व्हीडिओ दीपेंद्रने 13 फेब्रुवारी रोजी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता. हळुहळु हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. इथूनच या डायलॉगचा ट्रेंड सुरू झाला. नंतर यावरून अनेक मीम्सही बनले.
मीम्स व्हायरल
छोटी बच्ची हो क्या? डायलॉगचे अनेक मीम्स सध्या व्हायरल होत आहेत.
फिजा अहमद अकाऊंटवरून शेअर केलेल्या मीममध्ये म्हटलंय, "पोलिओ डोस देणाऱ्या काकू प्रत्येक घरामध्ये जाऊन ..."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
ऐश्वर्या ए नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या मीममध्ये म्हटलंय, "जेव्हा आपला "छोटी बच्ची हो क्या" डायलॉग आपल्यापेक्षाही जास्त प्रसिद्ध झाल्याचं टायगरला समजतं तेव्हा..."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
उर्वशी नामक एका युझरने ट्विटरवर लिहिलं, "22 वर्षांची मी शिनचॅन पाहत असताना आई मला म्हणते -"
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
प्रत्येक ट्रेंडवर खुमासदार ट्विट करणाऱ्या झोमॅटो फुड डिलिव्हरी अॅपनेही ट्रेंडचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला... ते म्हणाले, "प्रत्येक ट्रेंडवर ट्वीटची अपेक्षा ठेवता, छोटे बच्चे हो क्या?"
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
टायगरच्या डायलॉगचा पहिला व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर दीपेंद्रने त्याचे आणखी काही व्हीडिओ बनवले. या सगळ्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
एका मिमिक्री व्हीडिओमध्ये टायगर श्रॉफ हा अजय देवगण, परेश रावल आणि सलमान खान यांना 'छोटी बच्ची हो क्या' हा डायलॉग बोलायला शिकवत असतो. अखेर या व्हीडिओत टायगर चक्क सलमान खानलाच म्हणतो, "छोटी बच्ची हो क्या?"
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त, 2
'टायगर'ने घेतली दखल
टायगर श्रॉफच्या हिरोपंती चित्रपटाचा दुसरा भाग येत्या काही दिवसांत प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, पहिल्या चित्रपटातील डायलॉग अचानक व्हायरल होत असल्याचं पाहून टायगरलाही त्याची दखल घ्यावी लागली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 5
हिरोपंती चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात टायगर श्रॉफने चक्क हा डायलॉग लोकांना बोलून दाखवला. हा डायलॉग अचानक का ट्रेंड होतोय, मला काहीच कळत नाहीय, असं त्याने हसत-हसत म्हटलं.

फोटो स्रोत, Instagram
नंतर काही दिवसांत टायगरने मिमिक्री कलाकार दीपेंद्र सिंग याचीही भेट घेतली. दोघांच्या भेटीचे फोटो दीपेंद्रने त्याच्या अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त, 3
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)