इलॉन मस्क 'ट्विटर' खरेदी करणार नाहीत, 'या' कारणामुळे व्यवहार बारगळला

फोटो स्रोत, Getty Images
ट्विटर खरेदी करण्याआधीच व्यवहार फिस्कटल्याचं समोर आलंय. कारण इलॉन मस्क हे ट्विटर खरेदीसाठीची 44 बिलियन डॉलरची बोली संपवण्याच्या विचारात आहेत. ट्विटरनं कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केलाय.
ट्विटरकडून स्पॅम आणि फेक अकाऊंटची माहिती पुरवली जात नसल्याचं कारण देत इलॉन मस्कनं ट्विटर खरेदीचा व्यवहारातून माघार घेतलीय.
तर ट्विटर करार लागू करण्यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबण्याच्या तयारीत आहे.
जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक, इलेक्ट्रिक कारचे प्रणेते, माणसाला अंतराळात न्यायचं स्वप्न प्रत्यक्षात साकारणारे इलॉन मस्क ट्विटरचे सर्वेसर्वा होतील, अशा चचा सुरू झाल्या होत्या. कारण एप्रिल महिन्यात इलॉन मस्क यांनी तब्बल 44 बिलियन डॉलर्स एवढी प्रचंड रक्कम खर्चून ट्विटर खरेदी करत असल्याचं जाहीर केलं होतं. बोर्ड ऑफ ट्विटरने सुद्धा या व्यवहाराला मंजुरी दिली होती.
ट्विटरच्या वाढीसाठी प्रचंड संधी असल्याचं मस्क यांनी म्हटलं होतं. मजकुरावरील निर्बंध उठवणं तसंच फेक अकाऊंट्स मोडीत काढणं अशा अनेक गोष्टी करणार असल्याचं मस्क यांनी स्पष्ट केलं होतं.
ट्विटर बोर्ड कंपनीच्या शेअरहोल्डर्सना या करारावर अंतिम मोहोर उमटवण्यासाठी मतदान करण्याचं आवाहन करणार होतं.
फोर्ब्स मासिकाने तयार केलेल्या जगातील श्रीमंत व्यक्ती म्हणून नोंद होणाऱ्या मस्क यांच्या नावावर 273.6 बिलिअन डॉलर्स एवढी प्रचंड संपत्ती आहे. इलेक्ट्रिक कारची निर्मिती करणाऱ्या टेस्ला कंपनीचे ते प्रमुख आहेत. स्पेसएक्स कंपनीचेही ते प्रमुख आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी निर्भयपणे बोलण्याचं स्वातंत्र्य असावं. मानवतेसाठी ट्वीटर हे काम करेल असा विश्वास मस्क यांनी व्यक्त केला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
नवनवी फीचर्स, युझर्सचा विश्वास वाढवण्यासाठी अल्गोरिदम प्रणाली खुली करणं, स्पॅम बॉट्सचं निर्मूलन अशा अनेक गोष्टींवर भर देणार असल्याचं मस्क यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
समाजाच्या विविध स्तरातून ट्वीटरवर वेगवेगळ्या पद्धतीने दडपण येत आहे. उजव्या तसंच डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून ट्वीटरवर टीका होत आहे.
गेल्या वर्षी ट्वीटरने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर बंदी घातली होती.
मस्क यांचे ट्वीटरवर 80 मिलिअन फॉलोअर्स आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








