क्रिकेटर अरुण लाल 66 व्या वर्षी अडकणार लग्नाच्या बेडीत

    • Author, प्रभाकर मणि तिवारी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

माजी क्रिकेटपटू आणि बंगाल क्रिकेट टीमचे प्रशिक्षक अरुण लाल 66 व्या वर्षी वैवाहिक जीवनाची दुसरी इनिंग्स सुरू करण्याच्या बेतात आहेत.

पहिली पत्नी रीना यांच्याबरोबर लाल यांनी नुकताच घटस्फोट घेतला आणि ते आता बुलबुल साहा या त्यांच्या मैत्रिणीशी विवाहबंधनात अडकणार आहेत.

बुलबुल साहा यांच्या घरच्यांबद्दल सध्या फारशी माहिती उपलब्ध नाही. बऱ्याच काळापासून त्या एका स्थानिक शाळेत शिक्षिका आहेत. लग्नाच्या पत्रिकाही वाटल्या गेल्या आहेत.

अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंना लग्नाचं आमंत्रण आहे. लग्न कोलकाताच्या धर्मतल्ला परिसरातल्या पंचतारांकित हॉटेलात होईल .

बीसीसीआय चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनाही लग्नाचं आमंत्रण आहे. बंगाल रणजी टीमचे प्रशिक्षक अरुण लाल 16 टेस्ट आणि 13 वनडे खेळले आहेत.

ते त्याच्या मित्रमंडळींमध्ये लाल या नावाने ओळखले जातात.त्यांनी रीना यांच्याशी लग्न केलं होतं. त्यानंतर एकमेकांच्या संमतीने वेगळे झाले होते.

तरीही ते दोघं एकत्र राहतात. त्यांची पहिली पत्नी बऱ्याच काळापासून आजारी आहे. अरुण लाल यांनी बुलबुल यांच्याबरोबर असलेल्या संबंधांचा कधीही इन्कार केला नाही.

बंगाल क्रिकेट टीमशी निगडीत लोक या गोष्टीला दुजोरा देतात.

लग्नाचा निर्णय

या संघाचा एक खेळाडू नाव न घेण्याच्या अटीवर बीबीसीशी बोलताना म्हणाला, "लाल जी बुलबुल बरोबर असलेल्या संबंधांचा नेहमी उल्लेख करायचे. त्यांनी हे संबंध कधीही नाकारले नाहीत. एक महिना आधी त्यांचा साखरपुडा झाला आणि आता पहिल्या बायकोच्या संमतीने त्यांनी या नात्याला नाव देण्याचं ठरवलं आहे. लग्नानंतर स्वागत समारंभही याच हॉटेलात होणार आहे."

बुलबुल रीना यांची नेहमीच भेट घेते असं अरुण लाल यांचे निकटवर्तीय सांगतात. आता रीना यांची सेवा करण्यासाठी बुलबुल अरुण लाल यांच्याशी लग्न करणार आहे.

बुलबुल कोलकात्याजवळ असलेल्या सियालदेहच्या जवळ एका खासगी शाळेत गेल्या सहा महिन्यापासून शिकवत आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.

त्या म्हणाल्या, "बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, अरुण लाल आणि माझ्या कुटुंबियांचे अत्यंत चांगले संबंध आहेत."

अरुण लाल यांनी बुलबुल यांच्याशी लग्नाशी निगडीत प्रश्नांवर काहीही बोलायला नकार दिला आहे. पत्रकारांशी बोलताना हे खासगी प्रकरण असल्याचं सांगून त्याविषयी टिप्पणी करण्यास नकार दिला.

तीन वर्षांआधी बंगाल टीम रणजी ट्रॉफी खेळत असताना पहिल्यंदा बुलबुल यांना पहिल्यांदा पाहिलं होतं.

आता लग्नानंतर अरुण, रीना आणि बुलबुल तिघंही एकाच घरात राहणार आहेत.

अरुण लाल यांनी तोंडाच्या कॅन्सरवर मात केली आहे. त्यांच्या कार्यकाळात 2020 मध्ये बंगालची टीम पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचली होती.

बंगालने आताच्या सीझनच्या क्वार्टरफायनल मध्ये प्रवेश केला आहे.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अरुण लाल यांनी 46.94 च्या सरासरीने 10421 धावा केल्या आहेत. त्यांचं करिअर फार काळ चाललं नाही.

मात्र भारतीय संघात आल्यावर ते फारशी चुणूक दाखवू शकले नाहीत. 1982 ते 1989 या काळात 16 कसोटी सामन्यात त्यांनी फक्त 729 धावा केल्या.

एकदिवसीय सामन्यात त्यांचा सर्वाधिक स्कोर 51 इतका होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर 30 शतक आणि 43 अर्धशतक आहेत.

अरुण लाल यांनी 1982 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात कसोटीत पदार्पण केलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)