Dunki : शाहरूख खाननं राजकुमार हिराणींना म्हटलं, माझ्यासाठीही काही काम असेल तर पाहा...

डंकी, शाहरुख खान, राजकुमार हिराणी, चित्रपट

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, डंकी

मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो, थ्री इडियट्स, पीके, संजू या चित्रपटांसारखे हिट चित्रपट देणाऱ्या राजकुमार हिराणी यांनी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे आणि या चित्रपटात शाहरुख खान आहे.

शाहरूख खान आणि राजकुमार हिराणी प्रथमच एका चित्रपटात काम करणार असल्यामुळे चाहत्यांना या प्रकल्पाविषयी कमालीची उत्सुकता लागली आहे. पण हा चित्रपट काय आहे, याचा विषय काय आहे, या सर्व गोष्टी गुलदस्त्यात आहे.

चित्रपटाची घोषणा देखील वेगळ्या अंदाजात

राजकुमार हिराणी आपल्या वेगळ्या शैलीसाठी ओळखला जातो, अगदी त्याच हटके अंदाजात त्याने या चित्रपटाबाबत सांगितले आहे.

राजकुमार हिराणी आणि शाहरुखचा एक व्हीडिओ रिलीज झाला आहे. या व्हीडिओत शाहरुख खान मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो, थ्री इडियट्स, पीके, संजू या पोस्टर्सकडे पाहत असतो.

डंकी, शाहरुख खान, राजकुमार हिराणी, चित्रपट

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, शाहरुख खान नव्या चित्रपटाच्या घोषणेत

पाठीमागून राजकुमार हिराणी येतो आणि तो शाहरुखला विचारतो की तू काय विचार करतोय. तेव्हा शाहरुख म्हणतो की आमीर खानने तुमच्यासोबत दोन चित्रपट केले आहेत, रणबीर कपूरने एक, संजय दत्तकडे तर मुन्नाभाई आहे. मग माझ्यासाठी पण काही आहे का?

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

तेव्हा राजकुमार हिराणी म्हणतो आहे ना. शाहरूखची उत्सुकता शिगेला पोहचते आणि तो विचारतो कॉमेडी आणि इमोशन्स आहे का, त्यावर हिराणी सांगतात हो आहे ना, भरपूर आहे.

शाहरूख खान पुन्हा विचारतो की रोमान्स आहे का, आणि यावेळी तो डीडीएलजे मध्ये राहुलची जी सिग्नेचर पोज आहे ती करतो. त्यावर हिराणी म्हणतो रोमान्स पण आहे पण जरा हे हातवारे करणे थांबव बाबा.

ही सर्व चर्चा झाल्यावर शाहरुख विचारतो की या चित्रपटाचे नाव काय त्यावर राजकुमार हिराणीचे उत्तर येते, 'डंकी.'

डंकी, शाहरुख खान, राजकुमार हिराणी, चित्रपट

फोटो स्रोत, Social Media

फोटो कॅप्शन, राजकुमार हिराणी आणि शाहरुख खान

आता याचा काय अर्थ आहे हे विचारू नका, कारण याचा अर्थ नेमका काय आहे हे शाहरुखला देखील कळले नाही. तोच शेवटी म्हणतो की माहीत नाही याचा काय अर्थ आहे पण घेऊन टाका.

तरीही त्यावर उत्तर देताना राजू हिराणी शाहरुखला देतात. ते म्हणतात, "कॉमेडी आहे, इमोशन्स आहे आणि रोमांस आहे. पण तुझी ती हात हवेत हात पसरवण्याची पोज प्लीज देऊ नकोस." त्यावर शाहरुख म्हणतो, "अरे सर, हातच कापून टाकतो वाटलं तर.. तुम्ही सांगा तरी."

या व्हीडिओच्या सुरुवातीला राजकुमार हिराणी यांच्याबरोबर काम करता आलं नाही म्हणून शाहरुखच्या मनात असलेलं शल्य दिसून येतं.

चित्रपच समीक्षक तरण आदर्श ट्वीट करतात, "डंकी चं शूटिंग या महिन्यात सुरू झालं. आता पुढचं शेड्युल पंजाबमध्ये आहे. चित्रपटाचं लेखन राजू हिराणी आणि अभिजात जोशी यांनी केलं आहे. निर्मिती राजू हिराणी, रेड चिली एंटरटेनंमेंट आणि जिओ प्रॉडक्शनचं आहे."

राजू हिराणी यांनी तापसी पन्नूलाही टॅग केलं आहे. तापसी पन्नूची भूमिका या चित्रपटात महत्त्वाची आहे. तापसीनेही ट्वीट करून ही माहिती दिली आहे. "शेवटी हे होतंय. शाहरुख खान आणि राजू हिराणी यांच्याबरोबर 'डंकी' या माझ्या नव्या चित्रपटाची घोषणा करताना मला फार आनंद होत आहे."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

'डंकी'च्या व्हीडिओ टीझरवर सुरज कुमार लिहितात, "जेव्हा बॉलिवूड दोन महान लोक एकत्र येतात तेव्हा समजून जायचं की काहीतरी भारी होणार आहे."

हीरा लिहिते, "माझं स्वप्न साकार होतं आहे. राजू हिराणी आणि शाहरुख दोघं एकत्र येताहेत. अनेक विक्रम मोडले जाणार आहे."

राजू हिराणी यांनी आतापर्यंत पाच चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. त्यांच्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. त्यांच्या चित्रपटाची लोक वाट पाहतात.

मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई, थ्री इडियिट्स, पीके आणि संजू या चित्रपटांचं त्यांनी आतापर्यंत दिग्दर्शन केलं आहे.

हे सर्वच चित्रपट तिकीटबारीवर हिट ठरले होते. शाहरुख खानचा शेवटचा चित्रपट झिरो आहे. हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज झाला होता.

डंकी चित्रपट 22 डिसेंबर 2023 ला प्रदर्शित होणार आहे. या घोषणानंतर शाहरुख खानच्या टाइमलाइनवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. आम्ही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहोत असं चाहते म्हणत आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)