KGFचा खरा रॉकी 'रावडी थंगम' होता? त्याला ज्युनिअर वीरप्पन का म्हणायचे?

'दुनिया की सबसे बडी योद्धा मां होती है....'
केजीएफ चॅप्टर -1 चा हा डायलॉग आठवत असेल. आपल्या आईच्या प्रेमाबद्दल बोलणारा हा डॉन सर्वांच्यात लक्षात राहिला.
पण या गोष्टीचा आणि सुरुवातीला जो आईबद्दलचा डायलॉग सांगितला त्याचा आणि केजीएफच्या रॉकीचा आणि केजीएफच्या खरा रॉकी ज्याला म्हटलं जातं त्या थंगम रावडीचा काय संबंध असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडला असेल तर त्याचं हे उत्तर आहे की जसा चित्रपटातला रॉकी हा मातृभक्त होता तसाच केजीएफचा थंगम रावडी हा देखील मातृभक्त होता असं म्हटलं जातं.
थंगम रावडी हाच केजीएफचा रॉकी आहे का अशी अनेक लोकांनी विचारणा केली. केजीएफची कहाणी ही काल्पनिक आहे असं स्पष्टीकरण निर्माते-दिग्दर्शकांनी दिलं तरी केजीएफच्या रॉकीचे पात्र कुणाच्या तरी आयुष्यावर आधारित असेल असं चाहत्यांना वाटतं आणि त्यातूनच अनेक जण रॉकी आणि खऱ्या रॉकीत साम्य शोधण्याचा प्रयत्न केला.
चाहत्यांच्या या थेअरीला बळकटी मिळाली ती म्हणजे थंगम रावडीच्या आईने केजीएफच्या निर्मात्यांवर केस टाकल्यामुळे. या चित्रपटात आपल्या मुलाचं म्हणजे थंगमचं जे पात्रं रंगवण्यात आलं आहे ते नकारात्मक असल्याची केस कोर्टात केली होती.
कोण आहे हा थंगम रावडी?
नव्वदच्या काळात कुख्यात झालेला हा थंगम सोने लुटत असे. कोलारमधूनच त्याची गँग काम करायची. थंगमला ज्युनिअर वीरप्पन देखील म्हटलं जायचं.
इंडिया टुडेने 1997 ला एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की 25 वर्षीय थंगमची खासियत ही सोनं चोरी करणं आहे. थंगम टाटा सुमोतून चोरी करायचा आणि दिवसा ढवळ्या चोरी दरोडा टाकायचा.
फक्त चार वर्षांत त्याच्या नावावर 42 गुन्हे दाखल करण्यात आले होते. पण या थंगमला लोकांचा पाठिंबा असे, त्याने आपली रॉबिनहूड इमेज जपली होती. त्यामुळे तो लुटीतला काही भाग गरिबांमध्ये वाटत असे. या थंगमविरोधात शूट अट साइटची ऑर्डर निघाली होती.
1997मध्ये पोलिसांच्या एनकाउन्टरमध्ये थंगम मारला गेला.
थंगमच्या आईने काय दावा केला?
केजीएफ हा चित्रपट थंगमच्या आयुष्यावर आहे असं थंगमची आई पॉली यांचं म्हणणं आहे.
केजीएफ चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा थंगमच्या आईने कोर्टात केस टाकली होती. थंगमचे पात्र नकारात्मकरीत्या रंगवण्यात आल्याचं त्यांनी आपल्या याचिकेत म्हटलं होतं. तसेच त्याच्या आयुष्यावर चित्रपट काढण्यासाठी परवानगी देखील घेतली नव्हती असं त्यांनी म्हटलं होतं.

फोटो स्रोत, FACEBOOK/YASH
पण केजीएफ चित्रपटाचा दिग्दर्शक प्रशांत नीलने वेळोवेळी हा दावा फेटाळला होता. त्याचं म्हणणं होतं की थंगमच्या आयुष्याशी या चित्रपटाचा काही संबंध नाही.
याआधी कन्नडमध्ये थंगमच्या जीवनावर कोलार नावाचा चित्रपट येऊन गेला आहे. त्यात थंगमची कथा दाखवण्यात आली आहे.
न्यू इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये प्रशांत म्हणाला होता की, कोलारच्या निर्मात्यांनी आमच्याशी संपर्क साधला होता. आणि त्यांनी सांगितले की थंगमच्या कथेशी निगडित अधिकार आमच्याकडे आहेत. मी त्यांना सांगितले की मी त्याच्या आयुष्यावर आधारित चित्रपट मी बनवणार नाही असं वचन मी त्यांना दिलं होतं. खरं तर मला हे देखील माहित नाही थंगमची कथा नेमकी कशी आहे?
थंगम आणि रॉकीत काय साम्य?
थंगमच्या आयुष्यात महत्त्वाची व्यक्ती होती त्याची आई. अनेक जण तर थंगमच्या गॅंगला 'पॉली गॅंग' असंच म्हणत असत. केजीएफमध्ये रॉकीच्या आईचं तो लहान असतानाच निधन होतं आणि ती त्याच्याकडून जगातला सर्वांत शक्तिशाली व्यक्ती होण्याचं वचन घेते.

फोटो स्रोत, K.G.F: CHAPTER 2, TRAILER/YOUTUBE
रॉकीला कुणी भाऊ-बहिण नाहीत असं दाखवण्यात आलं आहे, थंगमला तीन भाऊ होते. ते चौघेही एन्काउंटरमध्ये मारले गेले.
चारही भावाना पोलिसांनी मारले एनकाउन्टरमध्ये
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार 1997 मध्ये आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात थंगमला पोलिसांनी कंठस्नान घातले होते.
त्यानंतर त्याचे दोन भाऊ दोपी आणि जयकुमार यांना पोलिसांनी एन्काउन्टरमध्ये मारले. त्यानंतर त्यांचा भाऊ सगायम हा एकटाच उरला आणि तो बदला घेण्यासाठी आतुर झाला होता.
पोलिसांनी सगायमला बंगळुरूचे उपनगर असलेल्या राममूर्तीनगरमध्ये शोधून काढले. पोलिसांनी त्याला शरण येण्यास सांगितले पण त्याने फायरिंग सुरू केले पोलिसांनी देखील फायरिंग केले त्यात त्याचा मृत्यू झाला. अशा रीतीने सहा वर्षात एकाच कुटुंबातील चार जण पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले गेले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








