You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काश्मीरमध्ये बहरले ट्युलिप्स, फुलांचे गालिचे पहायला पर्यटकांची गर्दी, पाहा फोटो-
काश्मीरमध्ये ट्युलिपच्या बागांना बहर आलाय. 23 मार्चपासून काश्मिरमधली ट्युलिप गार्डन्स पर्यटकांसाठी खुली झाली आहेत.
लांबवर पसरलेलेले ट्युलिपचे हे रंगीबेरंगी गालिचे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होतेय.
आशिया खंडातल्या या सर्वात मोठ्या ट्युलिप गार्डनमध्ये 15 लाखांपेक्षा जास्त फुलं उमलली आहेत.
ट्युलिपची ही फुलं भारतात नेदरलँडमधून एअरलिफ्ट करून आणण्यात आली होती.
ही बाग आहे श्रीनगरमधल्या दाल लेकच्या किनाऱ्याजवळ. जबरवान डोंगरांच्या कुशीमध्ये वसलेली ही बाग 30 हेक्टर क्षेत्रात पसरलेली आहे.
फुलांची शेती आणि पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी 2007 साली ट्युलिप गार्डन सुरू करण्यात आलं.
भारताच्या विविध भागांमधून पर्यटक ही फुलं पाहण्यासाठी काश्मीरला येतात. सुंदर फुलं समोर असताना लोकगीतं ऐकण्याचा आनंदही इथे घेता येतो.
कोरोनाच्या जागतिक साथीचा फटका गेली दोन वर्षं काश्मीरच्या पर्यटनालाही बसला. पर्यटन हे काश्मिरी लोकांसाठीचे उत्पन्नाचं एक महत्त्वाचं माध्यम आहे.
पण आता हळुहळू परिस्थिती सुधारतेय. उमललेली फुलं, चहुकडे पसरलेला त्यांचा गंध आणि पर्यटकांची गर्दी यामुळे काश्मीरच्या लोकांन पर्यटनाच्या या हंगामाकडून मोठ्या आशा आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)