You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'रशियानं चीनकडे मागितली लष्करी आणि आर्थिक मदत'
फायनान्शियल टाइम्स आणि न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार रशियाने चीनकडे लष्करी आणि आर्थिक मदत मागितली आहे.
चीननं युक्रेनमध्ये रशियासाठी लष्करी सामुग्री पाठवावी अशी रशियाची मागणी आहे.
फायनान्शियल टाइम्सनं एका अमेरिकन अधिकाऱ्याच्या हवाल्याने लिहिलं आहे की, रशिया युक्रेनवर हल्ला केल्यापासूनच चीनकडून युद्धसामुग्रीची मदत मागत आहे.
अर्थात, रशिया कोणत्या पद्धतीच्या उपकरणांची मागणी करत आहे, हे या रिपोर्टमध्ये स्पष्ट केलं नाहीये.
चीन या प्रकरणी रशियाची मदत करण्याची शक्यता असल्याचंही म्हटलं आहे.
न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तात एका अमेरिकन अधिकाऱ्याच्या हवाल्याने लिहिलं आहे की, रशिया आपल्यावर लादण्यात आलेल्या निर्बंधांचा प्रभाव कमी करण्यासाठी आर्थिक मदतीची मागणी करत आहे.
युक्रेनवर रशियानं हल्ला केल्यापासून आतापर्यंत चीनने स्वतःला तटस्थ दाखविण्याचा प्रयत्न केला आहे, पण या हल्ल्याची निंदाही केली नाहीये.
सोमवारी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन चिनी परराष्ट्र अधिकारी यांग जीएश यांच्यासोबत रोममध्ये भेटून चर्चा करू शकतात.
रविवारी (13 मार्च) एनबीसीसोबत साधलेल्या संवादात म्हटलं की, चीन किंवा अन्य कोणताही देश रशियाला झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई करू शकणार नाही, याची काळजी अमेरिका घेईल.
रशिया- युक्रेन युद्धाचा 19वा दिवस
रशिया-युक्रेन युद्धाचा आज 19वा दिवस आहे. आतापर्यंत या संघर्षात काय काय घडलं आहे?
ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे की, रशियानं ब्लॅक सीच्या किनाऱ्यावर नियंत्रण मिळवत युक्रेनला आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारातून वेगळं पाडलं आहे.
टीव्हीवरून जनतेला संबोधित करताना राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित केलं जावं, असं आवाहन नाटोला केलं आहे. जर असं केलं नाही तर नाटो क्षेत्रातही रशियाचे बॉम्बगोळे कोसळू शकतात, असंही त्यांनी म्हटलं.
रशिया आणि युक्रेनदरम्यान सोमवारपासून (14 मार्च) पुन्हा एकदा चर्चा सुरू होईल. ही चर्चा व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होईल.
अमेरिकन राष्ट्रपती जो बायडन यांनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी युक्रेनबद्दलची आपली बांधिलकी व्यक्त केली.
रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध सुरू झाल्यानंतर आतापर्यंत रशियन सैन्याच्या तुकड्यांनी कित्येक शहरं आणि गावांवर ताबा मिळवला आहे. या भागात अडकलेले लोक मदतीसाठी याचना करत आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)