सानिया मिर्झानं शोएब मलिकसाठी वाजवलेल्या टाळ्यांवरून सोशल मीडियावर वाद का?

टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत सेमिफायनल पाहणाऱ्यांमध्ये सानिया मिर्झा एकमेव भारतीय असेल की नाही, हे आताच नक्की काही सांगितलं जाऊ शकत नाही. मात्र, सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चेमागं एक कारण आहे.

नामिबिया विरोधात अखेरचा सामना खेळत असलेल्या भारतावर या सामन्याच्या कामगिरीचा फारसा काही परिणाम होणार नाही. त्याचं कारण म्हणजे सेमिफायनलमध्ये प्रवेश करणाऱ्या संघाची नावं आधीच निश्चित झाली आहेत.

इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया हे संध या स्पर्धेच भारताच्या पुढं गेले आणि कॅप्टन विराट कोहलीचा संघ स्पर्धेतून फार आधीच बाहेर पडला.

आता सानिया मिर्झाबाबत होत असलेल्या चर्चेबाबत. सानिया मिर्झाचा पती शोएब मलिकनं रविवारी (7 नोव्हेंबर) स्कॉटलँड विरोधात 18 चेंडूंवर 54 धावांची तडाखेबाज खेळी केली. त्या सामन्याला सानिया मिर्झा स्टेडियममध्ये उपस्थित होती.

शोएब मलिकसाठी सानियानं चीअरदेखील केलं. उत्साह वाढवण्यासाठी तिनं टाळ्या वाजवल्या आणि सोशल मीडियावर विशेषत: ट्विटरवर एकच गोंधळ सुरू झाला.

सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

@tweetsbytahreem ट्विटर हँडलवर, "सानिया मिर्झा स्टेडियममध्ये होती आणि शोएब षट्कार खेचत होता," अशी पोस्ट करण्यात आली.

क्रिकेटपटू म्हणून शोएबच्या कामगिरीवर सानिया स्टेडियममध्ये असल्यानं किंवा नसल्यानं काय फरक पडतो, याबाबत काही बोलू शकत नाही.

मात्र, @yehtuhogaaa या ट्विटर हँडलनं, "शोएब मलिकनं खेळी झाल्यानंतर ज्या पद्धतीनं सानिया मिर्झाच्या दिशेनं बॅट उंचावली आणि ज्या पद्धतीनं त्यांचा मुलगा वडिलांना पाहण्यासाठी आईच्या जवळ जात होता, तो सर्व पाहून छान वाटलं," असं पोस्ट केलं.

@Diet_Planner__ नावाच्या ट्टिवटर हँडरवर, "सानिया मिर्झा ज्या पद्धतीनं पतीला विक्रम मोडताना पाहत होती, त्याचप्रकारे मला माझ्या पतीचं यश पाहायचं आहे," अशी प्रतिक्रिया देण्यात आली.

तर, "सानिया मिर्झाची टीम टीम वर्ल्ड कपच्या बाहेर पडली तरी ती पतीच्या फलंदाजीचा आनंद घेत आहे," असं @Msohailsays या ट्विटर हँडलवर सोहेल यांनी पोस्ट केलं.

"सानिया मिर्झा भारताचा पराभव विसरून पतीच्या समर्थनार्थ मैदानावर उपस्थित आहे, हे उल्लेखनीय आहे," अशी प्रतिक्रिया

@Chlo_shaba_kato हँडलवर व्यक्त करण्यात आली.

अब्दुल्लाह खान (@Abdulla87094452) यांनी "शोएब मलिकनं स्पर्धेत सर्वात वेगवान अर्धशतक केल्यानंतर सानिया मिर्झा" अशी पोस्ट केली.

"सेमिफायनलमध्ये जाणारी सानिया मिर्झा एकमेव भारतीय आहे", असं @ChEitizazAshraf या हँडलवर म्हटलं आहे.

स्कॉटलँड विरोधात पाकिस्तानचा विजय

टी 20 वर्ल्डकपमध्ये रविवारी झालेल्या स्कॉटलँड विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानच्या विजयाचं श्रेय ऑलराउंडर शोएब मलिकलाच देण्यात आलं.

चाळीशीमध्ये पोहोचलेला शोएब मलिक पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा अविभाज्य भाग आहे.

क्रिकेट जगतात शोएबच्या फिटनेसचं उदाहरण दिलं जातं. शाहीन शाह आफ्रिदीसारख्या संघातील तरुण सहकाऱ्यांच्या जन्माच्या पूर्वीपासून शोएब क्रिकेट खेळत आहे.

पाकिस्ताननं रविवारी (7 नोव्हेंबर) स्कॉटलँडच्या विरोधात सलग पाचवा विजय मिळवला. त्यात शोएब मलिकच्या तडाखेबाज 18 चेंडूंवरील 54 धावांचा मोलाचा वाटा होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)