देवेंद्र फडणवीस : दिवाळी झाल्यावर मी बॉम्ब फोडणार

@Dev_Fadnavis

फोटो स्रोत, @Dev_Fadnavis

राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनीही या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

"जयदीप राणा या व्यक्तीचा मी ट्विटरवर फोटो टाकला आहे. ड्रग्ज संदर्भात राणा यांना अटक करण्यात आली आहे. तो सध्या साबरमती जेलमध्ये आहेत. त्याचे संबंध महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आहेत," असा आरोप मलिक यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले, "फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नदी स्वच्छतेविषयीच्या मोहिमेचं गाणं गायलं होतं. या गाण्याचे फायनान्स हेड जयदीप राणा होते. देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणा यांचे चांगले संबंध आहेत."

देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्ज व्यवसायाशी काय संबंध आहेत, त्यांचे आणि जयदीप राणाचे काय संबंध आहेत, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मलिक यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांना प्रत्युत्तर देताना म्हटलं, "दिवाळीच्या सुरूवातीला लवंगी फटका वाजवून काहीतरी मोठं केल्याचा आव नवाब मलिक आणत आहेत. चार वर्षांपूर्वीचा फोटो आहे, तो आज सापडलाय. रिव्हरमार्चने याचा खुलासा केलाय की तो व्यक्ती क्रिएटिव्ह टीमने हायर केला. त्यावेळी हे फोटो काढलेत.

भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल, महाराष्ट्र

फोटो स्रोत, NAWAB MALIK/FACEBOOK

फोटो कॅप्शन, नवाब मलिक

"मलिक यांनी माझ्या पत्नीसोबतचा फोटो टाकला यावरून त्यांची मानसिकता दिसते. एखाद्या तिसऱ्या व्यक्तीशी फोटो दिसल्यास भाजपचा ड्रग्ज पेडलरशी संबंध असं तुम्ही म्हणत असाल, तर नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरी ड्रग्ज सापडले. मग ज्यांच्या घरी ड्रग्ज सापडले त्यांच्या पार्टीला ड्रग्ज माफिया म्हणायचं का?"

"दिवाळी झाल्यानंतरच बॅाम्ब मी फोडणार आहे. मा काचेच्या घरात राहात नाही. दिवाळी झाल्यावर नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी काय संबंध आहेत, याची पुरावे मी शरद पवार आणि जनतेला देईल," असंही फडणवीस म्हणाले.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

अमृता फडणवीस यांनीही ट्विट करत मलिकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

"चोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा? कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते," असं अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

"देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे निरज गुंडे यांच्यामार्फत पैसे उकळले जायचे. देवेंद्र यांची निरज गुंडे यांच्याशी उठबस होती. हा देवेंद्र फडणवीस यांचा 'वाझे'सगळीकडे फिरत होता. ड्रग्जचा मास्टरमाईंड महाराष्ट्राचा पूर्व मुख्यमंत्री आहे का? असा प्रश्न मनात उपस्थित होतो," असंही मलिक म्हणाले होते.

या आरोपावंर फडणवीस म्हणाले, "माझ्यापेक्षा जास्त वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नीरज गुंडे यांच्या घरी गेले आहेत. मला वाटतं, या दोघांचे पूर्वीपासूनचे संबंध आहेत. नवाब मलिकांनी निरज गुंडेबाबत उद्धव ठाकरेंना विचारावं."

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी नुकतीच वानखेडे कुटुंबीयांची भेट घेतली.

याविषयी बोलताना मलिक म्हणाले, "हलदर म्हणाले की समीर दाऊद वानखेडे यांनी धर्मपरिवर्तन केलं नाही. हलदर एका घटनात्मक पदावर आहेत. असं असतानाही ज्या व्यक्तीवर (समीर वानखेडे) संशय आहे, त्याच्या घरी जातात आणि त्याला क्लीन चीट देतात. अरुण हलदर त्यांच्या मर्यादा ओलांडत आहे. हलदर यांची वर्तणूक संशयाच्या भोवऱ्यात आहे."

"याप्रकरणी आम्ही देशाचे राष्ट्रपती आणि सामाजिक न्याय मंत्री यांच्याकडे तक्रार करणार आहोत. या घटनाक्रमाची चौकशी करा, अशी मागणी करणार. जास्त बोललात तर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकू, अशी धमकीही त्यांनी मला दिलीय."

क्रांती रेडकर आणि रामदास आठवले
फोटो कॅप्शन, क्रांती रेडकर आणि रामदास आठवले

समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली होती. त्यानंतर आठवले यांनी वानखेडे कुटुंबाला पाठिंबा दर्शवला होता.

याविषयी बोलताना मलिक म्हणाले, "रामदास आठवले यांच्यावर अनुसूचित जातींना न्याय देण्याची जबाबदारी आहे. पण, ते स्वत: दाऊद वानखेडे यांच्यासोबत बसून पत्रकार परिषद घेतात. हे दुर्दैवी आहे."

मी समीर वानखेडे यांची लहान मुलं, त्यांची दुसरी पत्नी यांची नावं किंवा फोटो सोशल मीडियावर शेयर केलेले नाहीत, असंही मलिक यांनी यावेळी स्पष्ट केलं.

माझे जावई साडेआठ महिने जेलमध्ये होते. माझ्या जावयावरचं प्रकरण रद्द करण्यासाठी हायकोर्टात जाऊ. पुढची कायदेशीर लढाई लढणार, असंही मलिक म्हणाले.

नवाब मलिक हे बिघडलेले नवाब - अमृता फडणवीसांचा टोला

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिले आहे. नवाब मलिकांनी अमृता फडणवीस यांचा आणि एका व्यक्तीचा फोटो ट्वीट केला होता.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

फोटोतील ही व्यक्ती ड्रग पेडलर आहे असं ते म्हणाले होते. त्यावरून अमृता फडणवीस यांनी नवाब मलिकांना उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, आम्ही ज्या जनजागृती मोहीमेत काम केलं होतं.

त्या मोहीमेवेळी जे गाणं शूट केलं होतं. त्यावेळी सेटवर ती व्यक्ती आली होती. आम्ही सेटवर सर्वांसोबतच फोटो काढले होते. असं त्या म्हणाल्या.

नवाब मलिक हे बिघडलेले नवाब आहेत असंही त्या म्हणाल्या.

जिनके घर शीशे के होते है... - राऊत

आम्ही नवाब मलिक यांच्या पाठीशी आहोत, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आमच्याही हातात दगड असू शकतात. तुमची घरं फुटू शकतात, आम्ही कधीच कमरेखाली टिकी केली नाही. महाराष्ट्रात अशी चिखलफेक होऊ नये. भाजप नेत्यांची शरद पवार यांच्यावरील टीका अयोग्य आहे, असंही राऊत म्हणाले आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)