आर्यन खान : किरण गोसावीच्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी

फोटो स्रोत, Sachin sawant/twitter
कॉर्डिला क्रुजवरील ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक करण्यात आली. आर्यन खानला जेव्हा एनसीबीच्या कार्यालयात आणले जात होते, त्यावेळी किरण गोसावी ही व्यक्ती आर्यन खानला हाताला धरुन एनसीबीच्या कार्यालयात घेऊन जात असल्याचे समोर आलं.
त्यानंतर किरण गोसावीबाबत अनेक प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले होते. किरण गोसावी ही व्यक्ती स्वतंत्र साक्षीदार असल्याचं एनसीबीने सांगितलंय, परंतु याच किरण गोसावीच्या विरोधात आता पुणे पोलिसांनी लुक आऊट नोटीस काढली आहे.
2 ऑक्टोबरला एनसीबीने कॉर्डिला क्रुझवर छापा टाकून आठ जणांना अटक केली. या कारवाईवेळी एनसीबीच्या टीमसोबत काही स्वतंत्र साक्षीदार होते. त्यापैकी मनिष भानुशाली आणि किरण गोसावी हजर असल्याचं एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.
किरण गोसावी यांचा आर्यन खान सोबतचा सेल्फीदेखील व्हायरल झाला होता. त्यावेळी किरण गोसावी कोण आहेत, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. किरण गोसावींच्या विरोधात 29 मे 2018 ला पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2015 मध्ये देखील ठाण्यातील कापुरबावडी पोलीस स्टेशनमध्ये गोसावींच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. अंधेरीमध्ये देखील 2007 साली गोसावींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
किरण गोसावी कोण आहेत?
किरण गोसावी हे स्वतः प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असल्याचं सांगतात. पुण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये किरण गोसावी केपीजी ड्रिम्स सोल्युशन्स नावाची फर्म मुंबईतील घाटकोपर भागात चालवत असल्याचं सांगण्यात आले आहे. किरण गोसावींच्या विरोधात पुण्यातील चिन्मय देशमुख यांनी 2018 मध्ये फसवणुकीची तक्रार दिली होती.
चिन्मय यांनी फेसबुकवर एक जाहीरात पाहिली होती. त्यात गोसावी यांची फर्म तरुणांना मलेशियामध्ये हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जॉब देत असल्याचं म्हंटलं होतं. चिन्मय यांनी याच जाहीरातीवरुन गोसावींना संपर्क केला होता. त्यानंतर त्यांना मुंबईला बोलावून घेऊन कागदपत्रं घेण्यात आली होती. तसंच 3 लाख रुपये डिपॉझिट घेण्यात आले होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
बीबीसी मराठीशी बोलताना चिन्मय म्हणाले, "मला मलेशियाचं तिकीट देण्यात आलं परंतु मला एअरपोर्टवर कोणी भेटायला आले नाही. मला टुरिस्ट व्हिसा देण्यात आला होता. मलेशियात करण्यात आलेलं हॉटेल बुकींग कॅन्सल केल्याचं सांगण्यात आलं.
त्यानंतर मी स्वतःच्या खर्चाने मलेशियामध्ये राहिलो. दररोज उद्या जॉब देतो असं सांगून फसवण्यात आलं. माझा व्हिसा संपत आल्याने मी स्वखर्चाने पुण्यात आलो. त्यानंतर फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. माझ्यासारख्या अनेकांना गोसावीने फसवलं आहे. देशातील विविध भागातून लोक फसवणुक झाल्याचं सांगत आता पुढे येत आहेत."
किरण गोसावींच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यात पुणे पोलिसांनी कोर्टात चार्जशिट देखील दाखल केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून गोसावी फरार होते. पुणे पोलिसांनी आता त्यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस काढली असल्याची माहिती पुण्यातील झोन एकच्या उपायुक्त प्रियांका नारनवरे यांनी बीबीसी मराठीला दिली. त्याचबरोबर गोसावींचा शोध घेण्यासाठी काही टिम्स रवाना केल्याचं देखील त्या म्हणाल्या.

फोटो स्रोत, Twitter
बीबीसी मराठीने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीत समीर वानखेडे यांना किरण गोसावींबाबत प्रश्न विचारण्यात आला. छापा टाकताना दोन नाही तर नऊ पंच होते असं वानखेडे म्हणाले, तसंच 'एनसीबीने याबाबात स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली त्यामुळे त्यावर मी जास्त काही बोलणार नाही' असं देखील वानखेडे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








