कृष्णजन्माष्टमी गोपाळकाला : कृष्णाचे लोणी खातानाचे आकर्षक चित्र रेखाटणारी मुस्लीम तरुणी

जासना सलीम

फोटो स्रोत, JASNA SALEEM

    • Author, इम्रान कुरेशी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

जासना सलीम त्यांच्या सर्वात आवडत्या विषयावर बोलू लागतात तेव्हा त्या प्रचंड आनंदी असतात. त्यांचा आवडीचा विषय म्हणजे, हातात लोण्याचं भांडं आणि चेहऱ्यावर लोणी लागलेला कृष्ण आहे.

जासना सलीम ही 28 वर्षीय तरुणी गेल्या सहा वर्षांपासून सातत्यानं हेच पेंटिंग तयार करत आहे. जासना यांनी स्वतः श्रीकृष्ण मंदिराला हे पेंटिंग भेट म्हणून दिलं आहे.

कृष्णांचं हे पेंटिंग स्वतः भेट म्हणून देण्याचं स्वप्न पूर्ण झाल्याचा जासना यांना प्रचंड आनंद आहे.

जासना यांनी 80 वर्षे जुन्या उलानाडू श्री कृष्ण स्वामी मंदिरात बाळकृष्णाचं पेंटिंग भेट दिलं होतं. हे मंदिर पत्तनमतिट्टा जिल्ह्याच्या पन्दलम शहरात असून या ठिकाणी कृष्णाची पूजा होते.

गुरूवायूर येथील प्रसिद्ध कृष्ण मंदिराला जासना यांनी हे पेंटिग दिल्याचं, मंदिर समितीला समजलं होतं. त्यानंतर त्यांनी स्वतःसाठीदेखील या पेंटिंगची मागणी केली.

जासना यांनी चित्रकलेचं कुठलंही प्रशिक्षण घेतलेलं नाही. त्यांच्या पतीनं त्यांना श्रीकृष्णाबाबत माहिती दिली आणि कृष्णाच्या गोष्टी ऐकवण्यास सुरुवात केली.

पेंटिंगची सुरुवात कशी झाली?

"मला श्रीकृष्णाच्या सौंदर्य आणि मोहक रुपाची जाणीव झाली त्यावेळी मला त्यांच्या जीवनाबाबत अधिक आश्चर्य वाटू लागलं. एके दिवशी श्रीकृष्णाचं चित्र पाहिलं आणि मीदेखील तसं चित्र काढायला सुरुवात केली. मी जीवनात पहिल्यांदात एखाचं चित्र काढलं होतं. त्यावेळी मी गर्भवती होते आणि केवळ कृष्णाबाबतच विचार करत असायचे आणि कृष्णाची चित्रंच पाहात असायचे," असं जासना यांनी बीबीसीबरोबर फोनवर बोलताना सांगितलं.

जासना सलीम

फोटो स्रोत, JASNA SALEEM

मात्र, जासना या हे चित्र घरी ठेवू शकत नव्हत्या. सासरच्या लोकांनी पाहिलं तर ते रागावतील, असं त्यांचे पती म्हणाले. "मी एका जुन्या विचारांच्या कुटुंबातील आहे. तरीही माझ्या सासरच्या मंडळींना, मी अशाप्रकारचे पेंटिग करण्याबाबत आक्षेप नाही," असं त्यांनी सांगितलं.

जासना यांना त्यांचं हे चित्र नष्ट करायचं नव्हतं. "मी तयार केलेलं कृष्णाचं ते पहिलंच चित्र होतं. मला ते नष्ट करायचं नव्हतं. त्यामुळं मी माझा मित्र नंबुदरीच्या कुटुंबाला ते भेट दिलं."

जासना सलीम

फोटो स्रोत, JASNA SALEEM

"मुस्लीम असूनही मी श्रीकृष्णाचं चित्र काढल्याचं पाहून, त्यांना आश्चर्य वाटलं. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, असंही ते म्हणाले," असं जासना सांगतात.

तेव्हापासून जासना सातत्यानं श्रीकृष्णाची चित्रं काढत आहेत.

बाळकृष्णाचेच पेंटिंग का?

श्रीकृष्णाचा अत्यंत मनोहारी वाटणारा चेहरा जासना यांच्यासाठी प्रेरणादायी ठरला. त्यांनी तयार केलेल्या पहिल्या पेंटिंगमध्ये त्यांनी कृष्णाचे हात बांधलेले होते. मात्र नंतर त्यांनी कृष्णाचा लोण्याच्या मटक्यात हात असलेला फोटो पाहिला. तेव्हापासून त्यांनी ते पेंटिंग तयार करायला सुरुवात केली.

जासना सलीम

फोटो स्रोत, JASNA SALEEM

मात्र, केवळ कृष्णाचे लोणी खातानाचे पेंटिगच का तयार करतात, याबाबतही जासना यांना विचारण्यात आलं. त्यावर "मटक्यात कृष्णाचा असलेला हात पाहता, त्यांना कोणीतरी ते घेऊन पळून जाईल याची भीती आहे असं वाटतं. शिवाय, हातात लोणी असलेलं हे चित्र अत्यंत सुंदर आहे, कारण यात एक असा व्यक्ती आहे, जो त्याच्या आवडीचा पदार्थ खाल्ल्यानं समाधानी आहे," असं त्या म्हणाल्या.

ड्रॉइंग तयार करायला सुरुवात केली त्यावेळी त्यांच्या मामाने त्यांना चित्र गुरुवायूर मंदिरात भेट देण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर गुरुवायूरहून आलेल्या अनेक लोकांनी, त्याठिकाणी पेंटिग पाहिल्याचं आणि ते आवडल्याचं जासना यांना सांगितलं.

जासना सलीम

फोटो स्रोत, JASNA SALEEM

"या पेटिंगबाबत सर्वात खास बाब म्हणजे, त्यांनी कृष्णाचं खट्याळ रूप यात दाखवलं आहे. हे चित्र पाहिल्यानंतर तुम्हाला आनंदाची अनुभूती होते," असं पुण्याच्या तत्वामासी संस्थेचे जेपीके नायर म्हणाले.

जासना सलीम

फोटो स्रोत, JASNA SALEEM

तत्वामासी संस्थेनं या पेंटिगसाठी प्रायोजकत्व दिलं आहे.

"यातून मिळणारं मानसिक समाधान, हाच माझा फायदा आहे," असं जासना म्हणतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)