राजेंद्र राऊत : 'आमंत्रण न करता 5 हजार लोक जमले, कोरोना नसता तर 1 लाख लोक आले असते'

आमदार राजेंद्र राऊत यांच्या मुलाचा लग्न सोहळा

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, आमदार राजेंद्र राऊत यांच्या मुलाचा लग्न सोहळा
    • Author, नीलेश धोत्रे
    • Role, बीबीसी मराठी

राज्यात कोरोनाचे नियम कायम असताना सोलापूरच्या बार्शीमध्ये रंगलेल्या एका राजकीय विवाह सोहळ्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या दोन्ही मुलांचा विवाह रविवारी 25 जुलैला बार्शीतल्या लक्ष्मी सोपान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ग्राउंडवर पार पडला.

राज्यात होणाऱ्या कुठल्याही मोठ्या नेत्याच्या मुलांच्या लग्नांप्रमाणेच हा सोहळा होता.

डेल्टा प्लस' व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं संपूर्ण राज्यात 24 जून पासून पुन्हा एकदा तिसऱ्या गटातले कोरोना निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार लग्नासोहळ्यासाठी फक्त 50 जणांना उपस्थित राहण्याची परावनगी आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

पण या लग्नाला मात्र हजारो लोक उपस्थित राहिले. विशेष म्हणजे या काही हजारांमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसंच सत्ताधारी आणि विरोधी पक्षातले आमदार-खासदारसुद्धा होते.

दरम्यान, याप्रकरणी राऊत यांच्या दोन्ही मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणजीत राऊत आणि रणवीर राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

आमदार राजेंद्र राऊत यांच्या मुलाचा लग्न सोहळा

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, हर्षवर्धन पाटील या लग्न सोहळ्याला उपस्थित होते.

पण या गर्दीबाबात जेव्हा आमदार राजेंद्र राऊत यांना बीबीसी मराठीनं विचारलं तेव्हा ते म्हणाले,

"मी तर लग्नाच्या पत्रिकासुद्धा छापल्या नव्हत्या. फक्त देवापुढे ठेवण्यासाठी आणि मुंबईत काही मित्रांना देण्यासाठी काही पत्रिका आणल्या. पण कुठून तरी हे निमंत्रण व्हॉट्स अॅपवर व्हायरल झालं. मी लोकांना घरूनच आशिर्वाद द्या, अशी विनंती केली होती. पण आता आलेल्या लोकांना थोडी माघारी पाठवता येतं."

पण तुम्ही तर लग्नाची जय्यत तयारी केली होती. तयारी पाहून तुम्ही हजारो लोक येतील असं अपेक्षित धरल्याचं दिसून येतंय, असं विचारल्यावर आमदार राऊत म्हणाले,

"पत्रिका व्हायरल झाल्यानंतर लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही एवढी तयारी केलं. आम्हाला जाणीव आहे कोरोनाची. आम्ही काळजीही घेतली. आता राजकारणी म्हटलं की लोकांची आमच्या कार्याला येण्याची भावना असते. राजकारणात गेलं की स्वतःचं आयुष्य स्वतःचं राहत नाही, संपूर्ण तालुका कुटुंबासारखा होतो.

मी गेली 30 वर्ष राजकारणात आहे. आता आलेल्या लोकांची सोय केली नाही तर तिकडूनसुद्धा लोक नावं ठेवणार. आम्ही कात्रीत सापलो होते. आम्हाला कुणाच्याच भावना दुखवून चालणार नाही. तरीसुद्धा नाही म्हणता 5 ते 7 हजार लोक आले होते. तोच जर कोरोना नसता तर लाखभर आले असते."

राऊतांच्या दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल

पण या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा मात्र राजेंद्र राऊत यांच्याकडे काम करणाऱ्या योगेश पवार या तरुणाच्या नावे दाखल केला आहे. योगेश पवार यांनीच या लग्न सोहळ्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती.

योगेश पवार यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये राऊत यांच्या दोन्ही मुलांचीही नावं आहेत. रणजीत राऊत आणि रणवीर राऊत यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार राजेंद्र राऊत यांच्या मुलाचा लग्न सोहळा

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, लग्न सोहळ्यातील एक क्षण

राऊत म्हणतात, की राजकीय सभा होतात. कार्यक्रम होतात. त्यावेळीसुद्धा इथं आयोजकांवरच गुन्हे दाखल होतात. नेत्यांवर होत नाहीत.

पण हे लग्न होतं राजकीय सभा नव्हती, राऊत कुटुंबियांचा हा जर खासगी कार्यक्रम असेल तर त्याची जबाबदारी राऊत कुटुंबियांची नाही का, असा प्रतिसवाल केल्यावर मात्र "आता तुमची इच्छा असेल तर करा राऊत कुटुंबियांवर गुन्हा दाखल," असं उत्तर राऊत यांनी बीबीसीशी बोलताना दिलं होतं.

लग्न सोहळ्यात करण्यात आलेली आसनव्यवस्था

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, लग्न सोहळ्यात करण्यात आलेली आसनव्यवस्था

योगेश राऊत यांनी 23 जुलैला पोलिसांकडे 25 तारखेला होणाऱ्या या विवाह सोहळ्याची लेखी परवानगी मागितली होती. लक्ष्मी सोपान बाजार समितीमध्ये याच बाजार समितीचे अध्यक्ष रणजीत राऊत आणि त्यांच्या भावाच्या लग्नासाठी ही परवानगी मागण्यात आली होती.

पोलिसांना गर्दीची पूर्व कल्पना होती का?

पोलिसांना या सोहळ्यात होणाऱ्या संभाव्य गर्दीची पूर्व कल्पना होती. त्यामुळेच पोलिसांनी त्यांना लग्नाच्याआधीच नोटीस बजावून कोरोना नियमांचं पालन करा, असं सांगितलं होतं, असं सोलापूरच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं बीबीसी मराठीला नाव न सांगण्याचा अटीवर सांगितलं.

पण कोरोनाचे निर्बंध मोडल्या प्रकरणी आमदार राजेंद्र राऊत किंवा त्यांच्या कुटुंबियांवर काही कारवाई करण्यात आली आहे का, याबाबत मात्र पोलीस बोलण्यास तयार नाहीत.

मोर्चे, आंदोलनं, दौरे, सोहळे आणि लग्न

24 जून पासून राज्यात पुन्हा एकदा तिसऱ्या गटातले कोरोना निर्बंध लागू झाले आहेत. पण त्यानंतरही राज्यात राजकीय कार्यक्रम, सभा, नेत्यांचे दौरे, सोहळे, आंदोलनं, मार्चा असं सगळं होत आहे. एकही पक्ष किंवा नेता त्याला अपवाद नाही.

24 जूननंतरच भाजपने ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठिकठिकाणी आंदोलनं केली.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

अजित पवार उद्घाटनांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहत आहेत.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महागाईविरोधात आंदोलनं केली.

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

काँग्रेसचे पक्ष प्रवेश आणि सत्कार समारंभ सुरू आहेत. आंदोलनंसुद्धा केली जात आहेत.

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे उद्घाटनं आणि सत्कार करताना दिसून आले आहेत.

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

X पोस्टवरून पुढे जा, 6

X पोस्ट समाप्त, 6

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रीया सुळे तर लग्नांनासुद्धा हजेरी लावताना दिसून आल्या.

X पोस्टवरून पुढे जा, 7
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 7

'काही लोक जास्त समान'

या विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा सुरू झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून प्रशासन आणि यंत्रणेवर टीका केली आहे.

प्रशासनासाठी काही लोक हे जास्तच समान आहेत हे राजेंद्र राऊत यांनी सिद्ध करून दाखवल्याचं चौधरी यांनी म्हटलं आहे.

तिसऱ्या गटाचे नियम

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी पुढील उपाययोजना करण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहेत.

  • पात्र नागरिकांपैकी 70 टक्के लसीकरण पूर्ण करण्यावर भर देण्यात यावी, यासाठी जनजागृती करावी.
  • कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट या पद्धतीचा अवलंब करणे.
  • हवेमधून पसरू शकणाऱ्या कोरोनाच्या प्रकारांना टाळण्यासाठी कार्यालयांच्या ठिकाणी हवेशीर वातावरण ठेवावं.
  • मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या RT-PCR चाचण्या करणे.
  • कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर दंड आकारणे.
  • गर्दी होईल असे कार्यक्रम किंवा घटना टाळणे.
  • कंटेनमेंट झोन तयार करताना ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, त्याच ठिकाणी निर्बंध लावता येतील, याचा विचार करावा.

यापैकी कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर दंड आकारणे आणि गर्दी होईल असे कार्यक्रम किंवा घटना टाळणे हे दोन नियम फार महत्त्वाचे आहेत.

पण ते फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का, राजकारणी आणि त्यांच्या कार्यक्रमांसाठी वेगळी नियमावली आहे का, असे दोन प्रमुख सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)