WTC Final: मधु इथे, चंद्र तिथे; जसप्रीत-संजनाची अनोखी कहाणी

फोटो स्रोत, INSTAGRAM/JASPRIT BUMRAH
जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन ही जोडी एकाच कामासाठी इंग्लंडमध्ये आहेत पण त्यांना स्वतंत्र राहावं लागत आहे.
भारतीय संघ शंभरहून अधिक दिवसांच्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. खेळाडूंची पत्नी, मुलं त्यांच्याबरोबर राहतात. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचं काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं.
बुमराहची पत्नी संजना गणेशन जसप्रीतबरोबर इंग्लंडमध्ये दाखल झाली. मात्र संजना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचं प्रक्षेपणकर्त्या स्टार स्पोर्ट्स टीमचा भाग असल्याने तिला वेगळं राहावं लागत आहे. प्रक्षेपणकर्त्या कंपनीसाठी कार्यरत लोकांसाठी स्वतंत्र बायोबबल आहे. संजना त्या बायोबबलमध्ये असल्याने मधु इथे चंद्र तिथे अशी या दोघांची स्थिती आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या दिवशी खेळ सुरू झाला. समालोचनादरम्यान इसा गुहा आणि सुनील गावस्कर यांच्यात संजना-जसप्रीत जोडीबद्दल बोलणं झालं.
संजना नवऱ्याबरोबर वेगळी राहत आहे का? असं इसा यांनी विचारलं. यावर गावस्कर यांनी होकारार्थी उत्तर दिलं. प्रक्षेपणकर्त्या कंपनीच्या कार्यक्रमाचा भाग असल्याने संजना आता काही मजले खाली असलेल्या स्वतंत्र बायोबबलमध्ये असल्याचं गावस्कर यांनी सांगितलं.
साऊदॅम्टन इथल्या मैदानाजवळच राहण्याची व्यवस्था असल्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी या मैदानाला प्राधान्य देण्यात आलं.
काही दिवसांपूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठीच्या प्रमोशनपर कार्यक्रमात संजना आणि जसप्रीत एकत्र दिसले होते. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच ही जोडी एकत्र दिसली. कार्यक्रमाचं स्वरुप कसं असेल हे निवेदक म्हणून समजून सांगताना जसप्रीतने विचारलं- कॅमेऱ्याकडे बघू का तुझ्याकडे? जसप्रीतच्या या प्रश्नातला मिश्कीलपणा संजनाला कळला. सोशल मीडियावर हा व्हीडिओ व्हायरल झाला होता.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
15 मार्च रोजी जसप्रीत-संजना यांचं गोव्यात लग्न झालं. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेतून बुमराहला विश्रांती देण्यात आली. त्याआधी टेस्ट सीरिजच्या चौथ्या कसोटीवेळी बुमराहने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली होती. तेव्हापासून बुमराहच्या लग्नाची चर्चा सुरू झाली होती.
टेस्ट,वनडे आणि ट्वेन्टी-20 अशा तिन्ही प्रकारात टीम इंडियाचं मुख्य अस्त्र झालेला आणि इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा हुकूमी एक्का अशी जसप्रीतची ओळख आहे.

फोटो स्रोत, Hindustan Times
क्रिकेटविश्वात जसप्रीतची बॉलिंग अक्शन हा कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय असतो. जसप्रीतची अक्शनमुळे भलेभले बॅट्समन गोंधळतात आणि विकेट गमावतात.
वेग आणि अचूकता यामुळे जसप्रीतने अल्पावधीत तिन्ही फॉरमॅटमध्ये आपला ठसा उमटवला आहे. विकेट्स पटकावणं आणि रन्स रोखणं या दोन्ही आघाड्या जसप्रीतने चोख सांभाळल्या आहेत.
कोण आहे संजना गणेशन?
1. मॉडेलिंग आणि त्यानंतर स्पोर्ट्स अँकर झालेल्या संजनाने पुण्यातल्या सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजमधून इंजिनियरिंगची डिग्री घेतली. उत्तम विद्यार्थी असणाऱ्या संजनाने सुवर्णपदकही पटकावलं होतं.
2. सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ती काही वर्ष काम करत होती. मॅनेजमेंट स्पीकर गणेश रामास्वामी आणि डॉ. सुषमा गणेशन यांची संजना ही मुलगी. संजनाला बहीणही आहे आणि तिचं नाव शीतल आहे.
3. 2012मध्ये संजना फेमिना स्टाईल दिवा फॅशन शो मध्ये सहभागी झाली होती.
4. संजना फेमिना ऑफिशियली गॉजिअस स्पर्धेत सहभागी झाली आणि तिने जेतेपदाचा किताबही पटकावला.
5. संजनाने एमटीव्ही चॅनेलवरच्या स्पिल्टव्हिला7मधून टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलं.
6. प्रीमिअर बॅडमिंटन लीग स्पर्धेची निवेदिका म्हणून तिने काम पाहिलं आहे.
7. बॅडमिंटननंतर संजनाकडे क्रिकेटविषयक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन सोपवण्यात आलं. 'मॅचपॉइंट' आणि 'चिकी सिंगल्स' या कार्यक्रमाचं अँकरिंग संजनाने केलं आहे.
8. इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेचा लिलावावेळी स्टार स्पोर्ट्ससाठी अँकरिंगचं काम संजनाने केलं आहे.
9. इंडियन सुपर लीग या फुटबॉल स्पर्धेसाठीही संजनाने अँकर म्हणून काम केलं आहे.
10. 2019 वर्ल्डकप काळात संजना स्टार स्पोर्ट्सच्या टीमचा भाग होती आणि इंग्लंडमधून विविध शो तिने सादर केले होते.
11. इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाची अँकर म्हणून द नाईट क्लब या शोचं अँकरिंग ती करत असे. 2020 मध्ये दुबईत झालेल्या आयपीएल स्पर्धेदरम्यान संजना केकेआर कँपचा भाग होती.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








