कोव्हॅक्सिन लशीच्या लहान मुलांवरील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना मंजुरी

फोटो स्रोत, Getty Images
भारतात लहान मुलांवर कोरोनाविरोधी लशीची चाचणी सुरू होणार आहे. औषध महानियंत्रकांनी (DCGI) लहान मुलांवर कोव्हिडविरोधी लशीच्या चाचणीला मंजूरी दिली आहे.
'कोव्हॅक्सीन' लस निर्माण करणारी कंपनी भारत बायोटेक, 2 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांवर लशीची चाचणी करणार आहे. गुरूवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिलीये.
भारतात कोव्हिड-19 च्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. कोरोनासंसर्गाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाची लागण झाल्याचं प्रमाण वाढलंय.
पहिली लाट ज्येष्ठ नागरिक आणि दुसरी लाट तरूण वर्गासाठी धोकादायक ठरली त्यामुळे तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
कशी होणार लहान मुलांवर चाचणी?
- 2 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांवर लशीची चाचणी होणार
- दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी
- 525 स्वयंसेवकांवर केली जाणार चाचणी
- ही लस स्नायूंमधून दिली जाणार आहे
- लशीचे दोन डोस शून्य आणि 28व्या दिवशी दिले जाणार
औषध महानियंत्रकांच्या तज्ज्ञांच्या समितीने लहान मुलांवर लशीची चाचणी करण्यासाठी परवानगी द्यावी अशी शिफारस औषध महानियंत्रकांना केली होती.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, याचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर भारत बायोटेकला चाचणीसाठी मंजूरी देण्यात आलीये.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








