2-DG : कोरोनावरचं भारताच्या DRDOने शोधलेलं औषध नेमकं काय आहे आणि ते कसं काम करतं?

2डीजी औषध

फोटो स्रोत, ANI

2डीजी हे औषध भारताच्या संरक्षण आणि विकास प्राधिकरणाने (DRDO) बनवलंय. कोव्हिड 19 च्या रुग्णांसाठी या औषधाचा वापर करायला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. या औषधाच्या एका सॅशेची किंमत 990 रुपये असेल असं ANI वृत्तसंस्थेने म्हटलंय.

या औषधाचा वापर कसा करावा यासाठीच्या मार्गदर्शक सूचना DRDO ने 1 जून रोजी प्रसिद्ध केल्या.

सौम्य ते गंभीर परिस्थिती असणाऱ्या कोव्हिड - 19 रुग्णांना डॉक्टरांनी लवकरात लवकर हे औषध द्यावं, असं यात म्हटलंय.

DRDOच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसीन अँड अलाइड सायन्सेस (INMAS) या औषध उत्पादन करणाऱ्या विभागाने डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीजसोबत मिळून 2-डीजी हे औषध विकसित केल्याचं राजनाथ सिंह यांच्या कार्यालयानं ट्वीट करून सांगितलं होतं.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

हे औषध कोव्हिड रुग्णांचं ऑक्सिजनवर अवलंबून राहणं कमी करतं. हे औषध डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लियर मेडिसीन अँड अलाइड सायन्स (INMAS) आणि हैदराबादच्या सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीने संयुक्तरीत्या विकसित केलं आहे.

2-deoxy-D-glucose (2-DG) असं या औषधाला नाव देण्यात आलं आहे. हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लेबॉरेटरी या औषधाची निर्मिती करणार आहे.

भारतात कोव्हिडची दुसरी लाट आली आहे. शहरापासून आता गावापर्यंत ही लाट पसरताना दिसतेय. अशा परिस्थितीत कोव्हिड विरोधातल्या लढ्यात आणखी एक औषध मिळणं, महत्त्वाचं मानलं जातंय.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

2 DG औषधाच्या वापरासाठी DRDO ने दिलेल्या सूचना

डॉक्टरांच्या निगराणीखाली असणाऱ्या आणि उपचार घेणाऱ्या रुग्णांना हे औषध देता येईल.

  • सौम्य ते गंभीर परिस्थिती असणाऱ्या कोव्हिड - 19 रुग्णांना डॉक्टरांनी लवकरात लवकर हे औषध द्यावं. जास्तीत जास्त 10 दिवस हे औषध देता येईल.
  • आटोक्यात नसणारा मधुमेह, गंभीर हृदयविकार, ARDS, यकृत आणि किडनीचे विकार असणारे रुग्ण यांच्यावर या 2DG औषधाच्या चाचण्या घेण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या रुग्णांना हे औषध देताना काळजी घ्यावी.
  • गर्भार आणि स्तनदा मातांना आणि 18 वर्षांखालील रुग्णांना हे औषध देऊ नये.
X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

2DG च्या चाचण्यांमध्ये काय आढळलं?

2-DG औषधांच्या मेडिकल चाचण्या झाल्या आहेत आणि ज्या रुग्णांवर औषधांच्या चाचण्या झाल्या त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाल्याचं दिसून आल्याचा दावा करण्यात आला आहे.

इतकंच नाही तर हे औषध घेणाऱ्या रुग्णांना फारशी ऑक्सिजनचीही गरज पडली नसल्याचं आढळलं. याशिवाय, हे औषध घेणाऱ्या रुग्णांची कोव्हिड आरटीपीसीआर चाचणी इतर रुग्णांच्या तुलनेत कमी दिवसात निगेटिव्ह येत असल्याचंही संशोधकांचं म्हणणं आहे.

डीआरडीओच्या संशोधकांनी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात या औषधावर काम सुरू केलं होतं. त्या प्रयोगात या औषधातले रेणू कोरोनाच्या Sars-CoV-2 विषाणूला आळा घालण्यात मदत करत असल्याचं आढळून आलं.

एप्रिल 2020 च्या प्रयोगाच्या आधारावर मे 2020 मध्ये औषधाच्या दुसऱ्या टप्प्याच्या चाचणीला परवानगी मिळाली होती.

रुग्णांसाठी औषध सुरक्षित

डीआरडीओने डॉक्टर रेड्डीज लॅबच्या सहकार्याने कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांवर या औषधाच्या क्लिनिकल चाचण्या सुरू केल्या. मे 2020 ते ऑक्टोबर 2020 या दरम्यान 2-DG औषधाच्या दुसऱ्या टप्प्याची चाचणी झाली.

या टप्प्यात रुग्णांसाठी हे औषध सुरक्षित असल्याचं म्हणजेच औषधामुळे कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णाला अपाय होत नसल्याचं आढळलं. शिवाय, त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही आढळली.

औषध फोटो

फोटो स्रोत, Pib

देशभरातल्या 6 हॉस्पिटलमध्ये फेज-IIa च्या चाचण्या घेण्यात आल्या तर 11 हॉस्पिटल्समध्ये फेज-IIb च्या चाचण्या घेण्यात आल्या. फेज IIb मध्ये औषधाची मात्रा बदलण्यात आली होती. चाचणीच्या या दुसऱ्या टप्प्यात एकूण 100 कोव्हिड रुग्णांवर औषधाची चाचणी झाली.

चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात कोव्हिड रुग्णांवर सध्या जे उपचार करण्यात येतात त्या तुलनेत 2-DG औषध दिलेल्या रुग्णांमध्ये आजाराची लक्षणं लवकर बरी होत असल्याचं आढळलं. या औषधामुळे रुग्ण जवळपास अडीच दिवस आधी बरा होत असल्याचं दिसलं.

2-DG औषधाच्या चाचण्यांचे टप्पे

पहिला टप्पा - फेज-I

डीआरडीओच्या संशोधकांनी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात या औषधावर काम सुरू केलं होतं. त्या प्रयोगात या औषधातले रेणू कोरोनाच्या Sars-CoV-2 विषाणूला आळा घालण्यात मदत करत असल्याचं आढळून आलं. एप्रिल 2020 च्या प्रयोगाच्या आधारावर मे 2020 मध्ये औषधाच्या दुसऱ्या टप्प्याच्या चाचणीला परवानगी मिळाली होती.

दुसरा टप्पा - फेज-II

डीआरडीओने डॉक्टर रेड्डीज लॅबच्या सहकार्याने कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांवर या औषधाच्या क्लिनिकल चाचण्या सुरू केल्या. मे 2020 ते ऑक्टोबर 2020 या दरम्यान 2-DG औषधाच्या दुसऱ्या टप्प्याची चाचणी झाली.

या टप्प्यात रुग्णांसाठी हे औषध सुरक्षित असल्याचं म्हणजेच औषधामुळे कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णाला अपाय होत नसल्याचं आढळलं. शिवाय, त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही आढळली.

औषध

फोटो स्रोत, Pib

देशभरातल्या 6 हॉस्पिटलमध्ये फेज-IIa च्या चाचण्या घेण्यात आल्या तर 11 हॉस्पिटल्समध्ये फेज-IIb च्या चाचण्या घेण्यात आल्या. फेज IIb मध्ये औषधाची मात्रा बदलण्यात आली होती. चाचणीच्या या दुसऱ्या टप्प्यात एकूण 110 कोव्हिड रुग्णांवर औषधाची चाचणी झाली.

चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात कोव्हिड रुग्णांवर सध्या जे उपचार करण्यात येतात त्या तुलनेत 2-DG औषध दिलेल्या रुग्णांमध्ये आजाराची लक्षणं लवकर बरी होत असल्याचं आढळलं. या औषधामुळे रुग्ण जवळपास अडीच दिवस आधी बरा होत असल्याचं दिसलं.

तिसरा टप्पा - फेज-III

दुसऱ्या टप्प्याच्या यशानंतर DGCI ने नोव्हेंबर महिन्यात औषधाच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीला परवानगी दिली. तिसऱ्या टप्प्यात देशभरातल्या 27 कोव्हिड हॉस्पिटल्समधल्या 220 कोरोना रुग्णांवर चाचणी घेण्यात आली.

डिसेंबर 2020 मार्च 2021 या दरम्यान तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्या झाल्या. यात दिल्ली, उ. प्रदेश, प. बंगाल, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडूतल्या हॉस्पिटल्सचा समावेश होता.

तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्यांचा तपशीलवार अहवाल DGCI ला सादर करण्यात आला. या औषधामुळे कोव्हिडची लक्षणं बरी होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जास्त होतं. तसंच ज्या रुग्णांना 2-DG औषध देण्यात आलं त्यापैकी 42% रुग्णांना तिसऱ्या दिवसानंतर ऑक्सिजनची गरज भासली नाही.

मात्र, ज्यांना हे औषध दिलेलं नव्हतं अशा केवळ 31% रुग्णांनाची ऑक्सिजनची गरज संपली. शिवाय, 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्येही हाच ट्रेंड दिसला.

त्यानंतर DGCI ने 1 मे रोजी मध्यम ते गंभीर कोव्हिड रुग्णांसाठी अनुषांगिक उपचार (adjunct therapy) म्हमून या औषधाच्या आपातकालीन वापरासाठी मंजुरी दिली.

चाचण्या कुठे आणि केव्हा झाल्या?

कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान आयएनएमएएस-डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये प्रयोगशाळेत चाचण्या सुरू केल्या. या कामात हैदराबादच्या सेंटर फॉर सेल्युलर अँड मायक्रो बायॉलॉजी लॅबने डीआरडीओला मदत केली.

या चाचण्यांदरम्यान हे लक्षात आलं की कोरोनाचा संसर्ग रोखण्यात हे औषध किमयागार ठरू शकतं.

आयएनएमएएस-डीआरडीओच्या डॉ.सुधीर चांदना आणि आणि डॉ. अनंत भट्ट यांनी या औषधाच्या निर्मितीत मोलाची भूमिका बजावली आहे.

बीबीसी पंजाबचे सहयोगी पत्रकार सत सिंह यांच्याशी बोलताना डॉ. सुधीर चांदना यांनी सांगितलं की, गेल्या वर्षी संपूर्ण देशात लॉकडाऊन असताना हैदराबादमध्ये जाऊन डॉ. अनंत यांनी प्रयोगशाळेत चाचण्या केल्या. याआधीही डीआरडीओच्या प्रयोगशाळेत या औषधाचा उपयोग अन्य आजारांच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये करण्यात आला. ब्रेन ट्यूमर झालेल्या रुग्णांच्या उपचारादरम्यान हे औषध वापरण्यात आलं होतं. फेज थ्री चाचण्यांसाठी हे तंत्रज्ञान डॉ.रेड्डीज कंपनीकडे सोपवण्यात आलं.

डॉ. चांदना आयएनएएमएसस-डीआरडीओच्या रेडिएशन बायोसायन्स विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. पहिल्या टप्प्यातील प्रयोगशाळेतील चाचण्यांच्या आधारे ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने फेज२ चाचण्यांसाठी मान्यता दिली. हे काम २००० मे महिन्यातच सुरू झालं.

दुसऱ्या टप्प्यात आयएनएमएएस-डीआरडीओने डॉ. रेड्डीज कंपनीच्या साथीने चाचण्या घेतल्या. सहा महिने चाचण्या चालल्या. हे औषध कोरोना रुग्णांसाठी उपयोगी ठरू शकतं हे स्पष्ट झालं. दुसऱ्या टप्प्यात 17 रुग्णालयांमधल्या 110 रुग्णांवर या चाचण्या घेण्यात आल्या.

हे औषध कधीपासून बाजारात मिळू लागेल?

हे औषध ग्लुकोज अनालॉग आणि जेनेरिक मॉलिक्यूल यापासून तयार झालं आहे, त्यामुळे भारत सरकारला या औषध निर्मितीची चिंता नाही.

हे औषध पावडर स्वरुपात असेल आणि पाण्यात घोळवून घेता येईल जसं ग्लुकोज प्यायलं जातं.

भारतीय बाजारात हे औषध कधी उपलब्ध हे डॉ.रेड्डीज लॅब कंपनीवर अवलंबून असेल. डीआरडीओच्या चाचणी प्रक्रियेत डॉ. रेड्डीज लॅब सहयोगी कंपनी होती.

ऑक्सिजन पुरवठा,

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा ही चिंतेची बाब आहे

रुग्णांनी वा त्यांच्या नातलगांनी त्यांच्या हॉस्पिटलला [email protected] या ईमेल आयडीवर या औषधासाठी संपर्क करण्यास सांगावं, असं DRDO ने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलंय.

या औषधाच्या एका सॅशेची किंमत 990 रुपये असेल असं ANI वृत्तसंस्थेने म्हटलंय. सरकारी हॉस्पिटल्स, केंद्र आणि राज्य सरकारांना हे औषध कमी दराने देण्यात येणार असल्याचं या बातमीत म्हटलंय.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

2-DG औषध कसं काम करतं?

या औषधाचं स्वरूप साधं असल्याने अगदी सहज उत्पादन करता येतं. त्यामुळे देशभरात मुबलक प्रमाणात औषध उपलब्ध करता येईल, असा संशोधकांचा दावा आहे.

हे औषध पावडर स्वरूपात आहे. औषध पाण्यात विरघळून देतात. हे औषध विषाणूचा संसर्ग झालेल्या पेशीमध्ये जमा होतं. त्यानंतर व्हायरल सिंथेसिस आणि एनर्जी प्रोडक्शनला आळा घालून विषाणूची वाढ थांबवतं. केवळ संक्रमित पेशीमध्येच जमा होणं, या औषधाचा विशेष गुण मानला जातोय.

कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतंय. शिवाय, मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज भासतेय. अशा वेळी हे औषध संक्रमित पेशीला टार्गेट करून काम करत असल्याने कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचवण्यात हे औषध मोलाचं ठरेल, असं संशोधकांचं म्हणणं आहे.

ऑक्सिजन

फोटो स्रोत, Getty Images

2-डीजीच्या वापरावर प्रतिबंध कुठले?

या औषधाचा उपयोग सर्व प्रकारच्या रुग्णांवर केला जाऊ शकत नाही. डॉ.अनंत भट्ट यांनी बीबीसीला सांगितलं की, चाचणी प्रक्रियेदरम्यान गरोदर महिला आणि किडनीचा आजार असलेल्या रुग्णांना हे औषध देण्यात आलं नाही.

ऑक्सिजन पुरवठा,
फोटो कॅप्शन, गरोदर स्त्रियांना हे औषध घेता येणार नाही

किडनी आणि यकृताचे आजार असणारे रुग्ण, 18 वर्षांखालील रुग्ण, स्तनदा माता आणि गरोदर स्त्रिया यांना या औषधाचं सेवन करता येणार नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)