कोरोना: नरेंद्र मोदींना 9 सूचना, प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लिहिलं मोदींना पत्र

सेंट्रल व्हिस्टा, कोरोना, ऑक्सिजन पुरवठा

फोटो स्रोत, TWITTER/OM BIRLA

फोटो कॅप्शन, सेंट्रल व्हिस्टा

सेंट्रल विस्टाचं काम थांबवून त्यासाठीचा निधी लशी आणि ऑक्सिजनसाठी वळवावा अशी मागणी देशातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. कोरोना संकटासंदर्भात देशातल्या प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांचं पंतप्रधानांना सामूहिक पत्र लिहिलं आहे.

या पत्रात नऊ मुद्दे मांडण्यात आले आहेत. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, एच. डी. देवेगौडा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी एकत्रितपणे हे पत्र लिहिलं आहे.

या पत्रात मांडलेले मुद्दे

  • केंद्राने देशांतर्गत किंवा जगभरातून लसी शक्य तिथून प्राप्त कराव्यात
  • सगळ्यांना मोफत लसीकरणाचा कार्यक्रम ताबडतोब जाहीर करावा
  • लस निर्मितीसाठी लायसन्सिंगची आवश्यकता रद्द करून, उत्पादन क्षमता वाढवावी
  • अर्थसंकल्पातले 35 हजार कोटी लशींसाठी खर्च करावे.
  • सेंट्रल विस्टाचं काम थांबवून त्यासाठीचा निधी लशी आणि ऑक्सिजनसाठी वळवावा
  • PM Cares या खासगी गोपनीय ट्रस्ट निधीमधला पैसा लशी, ऑक्सिजन आणि वैद्यकीय उपकरणांसाठी ताबडतोब द्यावा
  • सर्व बेरोजगारांना महिन्याला 6000 रुपये द्यावे
  • सर्व गरजूंना महिन्याला मोफत धान्य द्यावं
  • शेतकरी कायदे रद्द करावेत, जेणेकरून लाखो 'अन्नदाते' कोरोना साथीला बळी पडण्यापासून वाचवता येतील.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)