You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस: 'अहंकार बाजूला ठेऊन राहुल गांधींचा सल्ला ऐकल्याबद्दल मोदी सरकारचे आभार' - काँग्रेस
देशात 1 मेपासून 18 वर्षांपुढील सर्वांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. या निर्णयाचे काँग्रेसने स्वागत केले आहे. पण त्याचबरोबर काँग्रेसने हे देखील म्हटले आहे की 18 वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण करावे अशी सूचना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली होती.
तसेच लस उत्पादकांचा आर्थिक भार कमी होण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलावीत असा सल्ला देखील राहुल गांधी यांनी दिला होता. हे दोन सल्ले मोदी सरकारने आपला अहंकार बाजूला ठेवून मान्य केले त्याबद्दल त्यांचे आभार असं काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलहून म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंनीही मानले आभार
केंद्र शासनाने 18 वर्षे वयापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर करून आपल्या मागणीचा विचार केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री यांचे आभार मानले आहेत.
राज्यात या अनुषंगाने पूर्ण नियोजन केले जाईल व लसीचा पुरवठा वेळच्यावेळी मिळत राहील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी देशातील 25 वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची गरज असून तसा निर्णय घेण्याची विनंती पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना केली होती.
18 वर्षांवरील सर्वांनाच लस मिळायला हवी अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत केली होती. या मागणीला मान्यता दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचे आभार असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हटलं आहे.
कोरोना विरोधात देशाच्या सुरू असलेल्या लढाईच्यादृष्टीन केंद्र सरकारे आज एक मोठा व महत्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता 18 वर्षांवरील प्रत्येकाला करोनाची लस दिल्या जाणार आहे. 1 मे पासून हे लसीकरण सुरू होणार आहे. याशिवाय लस उत्पादकांना 50 टक्के साठा राज्य सरकारला द्यावा, असे देखील सांगण्यात आले आहे.
यापूर्वी 45 वर्षावरील नागरिकांना लस देण्याचं नियोजित करण्यात आलं होतं. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लसीकरणाचा टप्पा वाढवण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पंतप्रधानांच्या महत्त्वाच्या बैठकीनंतर निर्णय
सोमवारी पंतप्रधानांची काही औषध कंपन्यांसोबत बैठक झाली. आहे. भारतात सध्या व्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या लस दिल्या जात आहेत. स्पुटनिक व्हीला सुद्धा आपात्कालीन मंजुरी देण्यात आली. त्यामुळे लसीकरण मोहीमेला येत्या दिवसात वेग येणार असल्याचे दिसत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी श्वसनयंत्रे, प्राणवायू आणि औषधांच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. खासगी आणि सरकारी औषधनिर्मिती क्षेत्रांनी पूर्ण क्षमतेने लस उत्पादन करण्याचे आवाहनही त्यांनी केले होते.
कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यासंदर्भात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सविस्तर पत्र लिहिलं होतं. लसीकरणावर भर देण्याची आवश्यकता मनमोहन सिंह यांनी व्यक्त केली होती.
गेल्या 92 दिवसांत 12 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले असून वेगाने लसीकरण करणाऱ्या देशात भारत समाविष्ट आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. अमेरिकेत 97 दिवसांत हा टप्पा गाठला गेला होता, तर चीनमध्ये १०८ दिवसांत तो गाठला गेला.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)