You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मिथुन चक्रवर्ती म्हणाले 'मी कोब्रा' आणि ट्विटरवर पडला मीम्सचा पाऊस
भारतीय सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भारतीय जनता पक्षात काल (7 मार्च 2021) प्रवेश केला. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिथुन चक्रवर्ती चार वर्षांचा राजकीय संन्यास संपवत पुन्हा राजकारणात सक्रिय झाले.
मिथुन चक्रवर्ती यांचा भाजपप्रवेश देशभरातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला, तसा तो सोशल मीडियावरही चर्चेचा विषय बनला. मिथुन चक्रवर्ती म्हणजेच चाहत्यांचे आवडते 'मिथुनदा' अनेक पोस्ट, ट्वीट आणि मीम्सचे धनी बनले.
कुणी मिथुनदांच्या सिनेमांची नावं वापरून मीम्स तयार केले, तर कुणी एखाद्या व्हीडिओलाच थेट एडिट केलंय.
सोशल मीडियाच्या जमान्यात क्रिएटिव्हिटी ओसंडून वाहतेच, ती मिथुनदांच्या भाजपप्रवेशानंतरही दिसून आली.
सोशल मीडियावर लोकांनी मिथुन चक्रवर्ती यांच्यावर शेअर केलेले निवडक विनोद, मीम्स:
@NarundarM या ट्विटर हँडलवरून मिथून चक्रवर्तींच्या सिनेमातील एक फोटो शेअर करत मीम म्हटलंय, पश्चिम बंगाल भाजपला वाचवताना मिथुन चक्रवर्ती.
ओमकार गरवारे या युजरने मिथुन चक्रवर्ती यांच्यावर मीम ट्वीट केलंय.
मिथुन चक्रवर्ती त्यांच्या भाषणात स्वत:ला असली कोब्रा म्हणाले. त्यानंतर एकानं असं ट्वीट केलं :
मिथुन चक्रवर्तींच्या प्रवेशानंतर काय होईल, याची कल्पना या युजरनं वर्तवलीय
मिथुन चक्रवर्तींचा आजवरचा राजकीय प्रवास या युजरनं तीन फोटोत मांडला आहे
जेव्हा मिथुनदा कोब्राचे रूप धारण करतात तेव्हा ते कुणालाही चाऊ शकतात...
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)