कोरोना लस उपलब्ध असलेल्या मुंबईतील खासगी रुग्णालयांची यादी

देशभरात कोरोना लसीकरण वेगाने सुरू आहे. सध्या देशभरातील ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जात आहे. तसेच मधुमेह, उच्चरक्तदाब असलेल्या 45 वर्षांपुढील नागरिकांना लस देण्यात येत आहे. कोविन अॅपवरून नोंदणी केल्यास लस मोफत मिळू शकते.

तसेच सरकारने खासगी रुग्णालयांना देखील लस देण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मुंबईतील 29 खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली असून, महापालिकेनं या रुग्णालयांच्या नावांची यादी प्रसिद्ध केली आहे.

केंद्र सरकारने परवानगी दिल्यामुळे सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांमध्येही लस घेता येणार आहे. मुंबईतही 29 खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरण होणार आहे. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या रुग्णालयांनाच लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे.

मुंबईतील या रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी…

1) सुश्रूषा हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, विक्रोळी

2) के. जे. सोमैय्या हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर

3) डॉ. बालाभाई नानावटी हॉस्पिटल

4) वोक्हार्ट हॉस्पिटल

5) सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल

6) सैफी हॉस्पिटल

7) पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल

8) डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल

9) कौशल्या मेडिकल फाऊंडेशन ट्रस्ट

10) मसीना हॉस्पिटल

11) होली फॅमिली हॉस्पिटल

12) एस. एल. रहेजा हॉस्पिटल

13) लिलावती हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र

14) गुरु नानक हॉस्पिटल

15) बॉम्बे हॉस्पिटल

16) ब्रीच कॅण्डी हॉस्पिटल

17) फोर्टिस हॉस्पिटल

18) भाटिया जनरल हॉस्पिटल

19) ग्लोबल हॉस्पिटल

20) सर्वोदय हॉस्पिटल

21) जसलोक हॉस्पिटल

22) करुणा हॉस्पिटल

23) एच. जे. दोशी घाटकोपर हिंदू सभा हॉस्पिटल

24) एआरसीसी चिल्डर्न हॉस्पिटल

25) कोकीलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल

26) कॉनवेस्ट अॅण्ड मंजुळा एस. बदानी जैन हॉस्पिटल

27) सुराणा सेठीया हॉस्पिटल

28) होली स्पिरिट हॉस्पिटल

29) टाटा हॉस्पिटल

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)