इंदूरमध्ये वयोवृद्ध बेघरांना ट्रकमधून काढलं शहराबाहेर

इंदोर

फोटो स्रोत, SM VIRAL

    • Author, शुरैह नियाजी
    • Role, भोपाळहून, बीबीसी हिंदीसाठी

भारतात स्वच्छतेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या इंदूर नगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांची एक कृती सध्या टीकेचं केंद्र बनलीय. नगरपालिका प्रशासनावरही या प्रकरणावरून जोरदार टीका होत आहे.

नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा एक व्हीडिओ शुक्रवारी (29 जानेवारी) सर्वत्र व्हायरल झाला. या व्हीडिओत नगरपालिकेतील काही कर्मचारी रस्त्याच्या बाजूला राहणाऱ्या वयोवृद्ध बेघर आणि भिकाऱ्यांना एका डंपरमध्ये भरून शहराबाहेर सोडायला जात असल्याचे दिसते. स्थानिकांच्या विरोधानंतर त्या वयोवृद्ध बेघरांना दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आलं.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

मिळालेल्या माहितीनुसार, नगरपालिकेचे कर्मचारी वयोवृद्ध भिकाऱ्यांना इंदूर शहराच्या सीमेच्या पलिकडे क्षिप्रा नदीजवळ सोडणार होते. स्थानिक लोकांनी जेव्हा हे पाहिलं, तेव्हा यावर आक्षेप घेतला. त्यानंतर नगरपालिकेचे कर्मचारी तिथून निघून गेले.

इंदोर

फोटो स्रोत, SM VIRAL

व्हायरल होणारा व्हीडिओ पाहिल्यास नगरपालिकेची असंवेदनशीलता दिसून येते. वयोवृद्ध बेघर लोक या व्हीडिओत दिसतात. हे लोक चालण्याच्या स्थितीतही नाहीत. अशा स्थितीतल्या लोकांना नगरपालिकेचे कर्मचारी डंपरमध्ये भरून नेत होते.

इंदूरसह संपूर्ण मध्य प्रदेशमध्ये सध्या प्रचंड थंडीचं वातावरण आहे. अशा वेळी बेघरांना आश्रयगृहांमध्ये नेण्याऐवजी शहराबाहेर सोडण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी नेत होते.

मुख्यमंत्र्यांकडून उपायुक्तांह दोन कर्मचारी निलंबित

या घटनेचं वृत्त जसं सर्वत्र पसरू लागलं, त्यानंतर काँग्रेससह सगळ्यांनी आक्षेप नोंदवण्यास सुरुवात केली. त्यानंतर संध्याकाळी उशिरा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एका अधिकाऱ्याला निलंबित केलं आणि दोन कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्याचे आदेश दिले.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

शिवराज सिंह यांनी नाराजी दर्शवणारं ट्वीट केलं आणि म्हटलं, "आज इंदूर नगरापालिकेच्या कर्मचाऱ्यांद्वारे वयोवृद्धासोबत अमानवी व्यवहार करण्यात आल्याची माहिती मला मिळाली. या घटनेला जबाबदार असणाऱ्या नगरपालिकेचे उपायुक्त यांच्यासह दोन कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित केलं. तसंच, इंदूरच्या वयोवृद्धांच्या देखभालीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले."

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नगरपालिकेचे उपायुक्त प्रताप सोलंकी यांना निलंबित करण्यात आलं. त्याचसोबत इतर दोन कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आलीय.

या घटनेच्या चौकशीचे आदेशही सरकारकडून देण्यात आले आहे. कुठल्या अधिकाऱ्याने या वयोवृद्धांना शहराबाहेर सोडण्याचे आदेश दिले होते, हे या चौकशीत तपासले जाईल.

विरोधकांचा सरकारवर निशाणा

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या घटनेवरून मध्य प्रदेश सरकारवर निशाणा साधलाय.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

कमलनाथ यांनी ट्वीट करून म्हटलं, "इंदूर नगरपालिकेची लाजीरवाणी कृती. वयोवृद्धांना गाडीत प्राण्यांप्रमाणे भरलं. शिवराज यांना लाज वाटायला हवी."

काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनीही मध्य प्रदेश सरकारवर टीका केली. ही घटना मानवतेला कलंक असल्याचं प्रियंका गांधी म्हणाल्या.

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

तसंच, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही प्रियंका गांधी यांनी केलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, या वयोवृद्ध बेघरांना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रेन बसेरामध्ये सोडायला हवं होतं. पण शिप्रा नदीजवळ सोडण्यासाठी नेत होते. मग स्थानिकांनी विरोध केल्यानंतर या बेघरांना शहरभर फिरवलं आणि मग अखेर रेन बसेरामध्ये सोडलं.

नगरविकास मंत्री भूपेंद्र सिंह म्हणाले की, ही घटना अमानवी असून, याविरोधात तातडीने कारवाई करण्यात आलीय. यापुढे अशा घटना होऊ नये म्हणून तसे आदेश दिले जात आहेत.

या प्रकरणी अभिनेते सोनू सूद यांनीही पुढे येत म्हटलं की, या लोकांना आपण छप्पर मिळवून दिलं पाहिजे. या लोकांना त्यांचा हक्क दिला पाहिजे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)