सुरत: ट्रक आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 13 जणांचा मृत्यू

सुरतमधील मांडवी मार्गावर रात्री उशिरा झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झालाय. ऊसाचा ट्रक्टर आणि ट्रक एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला.

नियंत्रण सुटलेल्या ट्रकखाली 13 जण चिरडले आणि त्यांचा मृत्यू झाला.

सुरतचे पोलीस उपअधीक्षक सी.एम.जडेजा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले, "नियंत्रण सुटलेल्या ट्रकने ट्रॅक्टरला धडक दिली. त्यात 18 जण उलटले आणि 13 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका मुलीचाही समावेश आहे."

सहा कामगार गंभीर जखमी असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्व मजूर राजस्थानच्या बन्सवाडा जिल्ह्यातील कुशलगडचे होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)