कोरोना लस: भाजपच्या लशीवर कसा विश्वास ठेवणार?-अखिलेश यादव

अखिलेश यादव, कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अखिलेश यादव

भाजपच्या लशीवर कसा विश्वास ठेवणार? असा सवाल करत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी कोरोनाची लस घेणार नसल्याचं म्हटलं आहे.

कोरोना लशीचे डोस नागरिकांना देण्याची रंगीत तालीम होत असतानाच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपच्या लशीवर कसा विश्वास ठेवणार? असा सवाल करत लस घेणार नसल्याचं सांगितलं.

"मी कोरोनाची लस घेणार नाही. भाजप ही लस देणार आहे. त्यांच्यावर कसा विश्वास ठेऊ? जा, जा. आपलं सरकार येईल तेव्हा सगळ्यांना मोफत लस देऊ. आम्ही भाजपची लस घेऊ शकत नाही", असं अखिलेश यांनी म्हटलं आहे.

अखिलेश यादव, कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अखिलेश यादव

फेब्रुवारी-मार्च 2020 पासून भारतासह जगभरातील बहुतांश देश कोरोनाच्या विळख्यात अडकले. देशात हजारो जणांचा या विषाणूच्या संसर्गाने मृत्यूही झाला. आता लशीला मंजुरी मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यावेळी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी असं वक्तव्य करून सनसनाटी निर्माण केली आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात १ कोटी आरोग्य सेवा कर्मचारी व २ कोटी कोविड काळात पहिल्या फळीत काम करणाऱ्यांना लस देण्यात प्राधान्य दिलं जाणार आहे. प्राधान्यक्रमातील २७ कोटी लाभार्थ्यांना लस कशी दिली जाईल, याचा तपशील जुलैपर्यंत निश्चित केला जाणार आहे असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी सांगितलं.

देशभरात मोफत लस दिली जाणार असल्याचं डॉ. हर्षवर्धन म्हणाले मात्र त्यानंतर त्यांनी खुलासा करून लशीसंदर्भात आराखडा स्पष्ट केला.

कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका. सुरक्षितता आणि लशीची कार्यक्षमता याला सर्वोच्च प्राधान्य आहे. पोलिओ लशीवेळी अनेक अफवा पसरवण्यात आल्या. परंतु नागरिकांनी लस घेतली आणि देश पोलिओमुक्त झाला असं डॉ. हर्षवर्धन म्हणाले.

दरम्यान राज्यात पुणे, नागपूर, जालना आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांध्ये आज (2 जानेवारी) कोरोना लशीची 'ड्राय रन' करण्यात येत आहे.

शातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना व्हायरससंदर्भात लसीकरणासाठी तयार राहावं, अशी सूचना केंद्र सरकारने केली होती.

देशात प्रत्येक राज्यात कमीत कमी 3 ठिकाणी ही 'ड्राय रन' घेण्यात येणार आहे. लसीकरण मोहिमेत कोणत्या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात, त्या अडचणी कशा प्रकारे दूर केल्या जातील, हे सुद्धा यावेळी तपासलं जाईल.

यानंतर 50 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना आणि इतर व्याधींनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना ही लस प्राधान्याने दिली जाणार आहे.

राज्यांकडून याबाबतचा डेटाबेस तयार केला जात आहे. यासाठी को-विन या अप्लीकेशनवर फॉर्म भरून सर्वप्रथम लोकांची नोंदणी करून घेतली जाईल. त्यानंतर लसीकरणाची तारीख, वेळ आणि केंद्र लोकांना मॅसेज करूनच कळवण्यात येणार आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)