सेक्स गुरू महिंदर वत्स यांचं निधन, 50हून अधिक वर्षं केलं लैंगिक समस्यावर लिखाण

महिंदर वत्स

फोटो स्रोत, PANOS

फोटो कॅप्शन, महिंदर वत्स
    • Author, विबेके विनेमा
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्विस

प्रसिद्ध सेक्स गुरू महिंदर वत्स यांचं मुंबईत निधन झालं. ते 96 वर्षांचे होते.

महिंदर वत्स यांना सेक्स गुरू म्हणून ओळखलं जायचं. सेक्सविषयी केलेल्या मार्गदर्शनामुळे त्यांनी अनेकांच्या जीवनात सुधारणा घडवून आणली.

त्यांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून 50 वर्षांपासून पुरुष आणि महिलांमधील सेक्सविषयीची भीती आणि शंका दूर करायचं काम केलं. 50 हून अधिक वर्षं ते या विषयावर कॉलम लिहित होते.

वत्स म्हणायचे, "सेक्स ही एक आनंद देणारी गोष्ट आहे. पण, काही लेखक बोजड शब्दांचा वापर करत सेक्स म्हणजे विज्ञान शास्त्राशीसंबंधित गंभीर गोष्ट असल्याचं दाखवतात."

वत्स यांनी दिलेली उत्तरं एकदम सरळ आणि सोपी असत.

याविषयी त्यांनी म्हटलं होतं, "मी लोकांना त्यांच्या भाषेत बोलतो म्हणून मग त्यांना माझं म्हणणं समजतं. शेवटी जो माणून तुमच्याशी बोलत असतो तो तुमच्यापैकीच एक असतो."

याचं एक उदाहरण पाहूया.

वत्स यांना प्रश्न विचारण्यात आला की, "दोन दिवसांपूर्वी मी माझ्या मैत्रिणीसोबत असुरक्षित सेक्स केला. गर्भाधारणेपासून वाचण्यासाठी आम्ही आय-पिल घेतली, पण आनंदाच्या भरात मैत्रिणीऐवजी मीच ती गोळी खाल्ली. यामुळे मला काही नुकसान होईल का?"

यावर वत्स यांचं उत्तर होतं, "कृपया करून पुढच्या वेळेस कंडोमचा वापर करा आणि तुम्ही कंडोमलाही गिळणार नाहीत तेवढी दक्षता बाळगा."

सेक्स

फोटो स्रोत, Thinkstock

वत्स यांना 1960मध्ये महिलांशी संबंधित 'डियर डॉक्टर' नावाचा कॉलम लिहिण्याचा प्रस्ताव मिळाला होता. त्यावेळी त्यांचं वय 30 वर्षं होतं.

सुरुवातीच्या काळात लहान मुलं आणि सर्दी-ताप-खोकल्याशी संबंधित पेशंट यायचे. नंतर मात्र लैंगिक आयुष्याशी संबंधित प्रश्न विचारण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

या महिला त्यांची समस्या कुणालाही सांगू शकत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी वर्तमानपत्रात त्या समस्या मांडल्या. तेव्हा मी त्यांना सांगायचो की, घाबरायची अजिबात गरज नाही, तुमच्या नवऱ्याला याविषयी माहिती कळणार नाही.

यांतील बुहतेक समस्या या लैंगिक शिक्षणाच्या कमतरतेमुळे येत असल्याचं वत्स यांच्या लक्षात आलं.

मला लग्न करायचं आहे, पण मुलगी व्हर्जिन आहे की नाही, हे कसं पाहायचं, असा प्रश्न लोक विचारायचे. वत्स त्यांना सांगायचो, "तुम्ही लग्न करू नका. फक्त जासूसी करूनच याची माहिती कळू शकते. त्यामुळे मग तुमच्या शंकाग्रस्त डोक्यामुळे एखाद्या मुलीचा बळी जाणार नाही."

लैंगिक शिक्षणावर जोर

वयाच्या 90व्या वर्षी वत्स मुंबईतील एका वर्तमानपत्रात 'आस्क द सेक्सपर्ट' हा कॉलम लिहायचे.

वर्तमानपत्राच्या संपादक मीनल बघेल सांगतात, "हा कॉलम सुरू करेपर्यंत आम्ही लिंग आणि योनी या शब्दांचा वापर कधीतरीच करत होतो. यानंतर लोकांचं लक्ष या कॉलमकडे गेलं. असं असलं तरी सगळंच काही सकारात्मक नव्हतं. आमच्या वर्तमानपत्राला अश्लीलता आणि इतर आरोपही सहन करावे लागले. पण, लोकांचा पाठिंबा पाहून हा कॉलम सुरू ठेवण्यात आला."

सेक्स

फोटो स्रोत, Thinkstock

लैंगिक समस्या या आसपास घडणाऱ्या सेक्सविषयीच्या उलटसुलट चर्चेचा परिणाम आहे, असं वत्स यांचं मत होतं.

वत्स यांना वाटायचं की, शालेय जीवनापासून लैंगिक शिक्षण द्यायला हवं.

ते म्हणायचे, "तुम्ही वर्गात एखादं रिकामं खोकं ठेवा आणि विद्यार्थ्यांना जो प्रश्न विचारायचा आहे तो कागदावर लिहून खोक्यात टाकायला सांगा आणि मग त्याचं उत्तर द्या."

वत्स यांना लोकांनी विचारलेले काही प्रश्न -

प्रश्न - कोणताही अॅसिडयुक्त पदार्थ वापरल्यास गर्भधारणा टाळता येते, असं मी ऐकलं आहे. सेक्सनंतर मी माझ्या गर्लफ्रेंडच्या योनीमध्ये लिंबू किंवा संत्र्यांच्या ज्यूसचे काही थेंब टाकू शकतो का? यामुळे तिला त्रास होईल का?

उत्तर - तू भेळपुरी विक्रेता आहेस का? तुला ही रानटी कल्पना कशी सुचली? गर्भधारणा टाळण्यासाठीच्या अनेक सोप्या पद्धती उपलब्ध आहेत. तू कंडोमही वापरू शकतो.

प्रश्न - दिवसातून चारदा सेक्स केल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी थकवा जाणवतो. माझ्या डोळ्यासमोर 5 मिनिटं अंधारी येते आणि मला काहीच स्पष्ट दिसत नाही. माझी मदत करा.

उत्तर - तुला माझ्याकडून काय अपेक्षित आहे. चारदा सेक्स करतो म्हणून कौतुक हवंय की तू मला अख्ख्या गावातील चॅम्पियन समजतोय?

प्रश्न - माझं लिंग लहान आहे आणि त्यामुळे माझ्या गर्लफ्रेंडचं समाधान होत नाही. श्लोक म्हणत असताना लिंगाला दररोज 15 मिनिट ओढण्याचा सल्ला मला माझ्या अॅस्ट्रोलॉजरनं दिला आहे. मी महिन्याभरापासून असं करत आहे, पण काही फरक जाणवत नाही. मी काय करायला हवं?

उत्तर - जर तो अस्ट्रॉलॉजर बरोबर असता तर आज अनेक पुरुषांचं लिंग गुडघ्यांपर्यंत येऊन टेकलं असतं. देव मूर्ख माणसांना मदत करत नाही. तुम्हाला सेक्स करण्याची कला शिकवू शकेल, अशा सेक्सपर्टला जाऊन भेटा.

प्रश्न - मी लग्न करावं असं माझ्या कुटुंबीयांचं मत आहे. पण, मुलगी व्हर्जिन आहे, हे मला कसं कळेल?

उत्तर - तुम्ही लग्न करू नका असा सल्ला मी देईल. जोपर्यंत तुम्ही या कामासाठी गुप्तहेर नेमत नाही, तोवर हे शोधण्यासाठी दुसरा काही मार्ग नाही. तुमच्या शंकेखोर डोक्यातून बिचाऱ्या मुलीची सुटका होवो.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज संध्याकाली 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)