रजनीकांत रुग्णालयात दाखल, 22 डिसेंबर रोजी केली होती कोरोनाची चाचणी

रजनीकांत

फोटो स्रोत, Getty Images

दक्षिणेतील सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत हे कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने अलगीकरणात गेले आहेत. खबरदारी म्हणून रजनीकांत यांना आज (25 डिसेंबर) हैदराबाद येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून तिथंच त्यांचं निरीक्षण आणि उपचार सुरू आहेत, अशी माहिती हॉस्पिटल प्रशासनाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

रजनीकांत हे गेल्या दहा दिवसांपासून हैदराबादमध्ये एका चित्रपटाचं चित्रिकरण करत होते. या चित्रपटाच्या सेटवर दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

त्या व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे रजनीकांत यांनीही 22 डिसेंबर रोजी कोव्हिड-19 संदर्भात चाचणी करून घेतली. पण त्यावेळी रजनीकांत यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता.

पण तरीसुद्धा खबरदारी म्हणून रजनीकांत हे स्वतःच अलगीकरणात गेले होते. त्यांच्या आरोग्याच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सध्यातरी, रजनीकांत यांच्यात कोरोनाशी संबंधित कोणतीच लक्षणं आढळून आली नाहीत. पण, त्यांच्या रक्तदाबामध्ये थोडाफार चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं हॉस्पिटल प्रशासनाने म्हटलं.

रजनीकांत

फोटो स्रोत, APolo hospital

याठिकाणी रजनीकांत यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत असून सध्यातरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं हॉस्पिटल प्रशासनाने सांगितलं आहे.

पक्ष स्थापना लांबणार?

रजनीकांत हे लवकरच आपला राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत.

याबाबत त्यांनी 3 डिसेंबर रोजी एक घोषणा केली होती.

यामध्ये जानेवारी 2021मध्ये आपला स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पक्ष स्थापनेची तारीख 31 डिसेंबरला जाहीर करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं होतं.

तामिळ भाषेतल्या ट्वीट करत त्यावेळी आता नाही तर कधी नाही अशा आशयाचे हॅशटॅगही त्यांनी वापरले होते. तसंच आता आपण बदल घडवू, असंही रजनीकांत त्यावेळी म्हणाले होते.

पण, आता त्याच्या एक आठवडा आधीच रजनीकांत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे त्यांची पक्षस्थापना लांबणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)