पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचे 18 हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

फोटो स्रोत, Bjp
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केली. या योजनेत तब्बल 9 कोटी लाभार्थी शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट 18 हजार कोटींची रक्कम ट्रान्सफर करण्यात आली आहे.
यादरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी विविध राज्यांतील शेतकऱ्यांशीही चर्चा केली.
यावेळी कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले, "पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. गरीब शेतकऱ्याला याचा खूप लाभ झाला."
"पंजाबसह काही शेतकऱ्यांच्या मनात नव्या कृषी कायद्यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. हे आंदोलन संपवून त्यांनी सरकारसोबत चर्चेला यावं, असं मी आव्हान करतो. नव्या कायद्याचं महत्त्व आणि गरज शेतकऱ्यांना समजेल, अशी मला आशा आहे," असंही तोमर म्हणाले.
नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे -
- कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या नावाने संभ्रम निर्माण केला जात आहे.
- पश्चिम बंगालमध्ये शेतकऱ्यांच्या हितावर काहीच बोलत नाहीत, इथं दिल्लीत येऊन बोलतात.
- केरळमध्ये बाजार समितीच नाहीत, केरळमध्ये आंदोलन करून तिथं समित्या चालू करायला लावा
- दुटप्पी राजकारण करू नका.
- खोट्या अफवा पसरवणं, भोळ्या शेतकऱ्यांची दिशाभूल करणं बंद करा.
- मी शेतकऱ्यांना नव्हे तर शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करणाऱ्या लोकांना बोलत आहे.
- पुन्हा शेतकऱ्यांना शिव्या दिल्या असं म्हणू नका
- निर्दोष शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळू नका,
- अनेक वर्षे सत्तेत घालवलेले हे लोक आहेत. यांच्या काळात आवश्यक तो विकास होऊ शकला नाही.
- जमीन आणि संसाधन कमी असलेल्या शेतकऱ्यांना जास्त त्रास व्हायचा.
- आधी शेतकऱ्यांकडे बँक खातंही नव्हतं. त्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळत नव्हता.
- गरीब शेतकऱ्यांना आपलं पीक विकण्यातही कसरत करावी लागत होती.
- देशात शेतकऱ्यांची संख्या छोटी नाही.
- वर्षानुवर्षे सत्तेत राहिलेल्या लोकांनी शेतकऱ्यांना त्यांच्याच भरवश्यावर सोडून दिलं.
- गरीब शेतकरी आणखी गरीब होत गेले.
- शेतकऱ्यांची जमीन हडपण्यात येईल, अशी अफवा मुद्दामहून पसरवली जात आहे.
- बदलत्या काळानुसार आपल्या दृष्टीकोनातही बदल करावा लागेल.
- सरकारने त्यासाठीचा विडा उचलला आहे. शेतकरीही त्यात सहभागी आहेत.
- आधी बाजार समितीत भाव मिळाला नाही तर शेतकऱ्यांचा नाईलाज व्हायचा. या कायद्यांमुळे तुम्ही जिथं पाहिजे तिथं माल विकू शकता.
- जिथं तुम्हाला योग्य भाव मिळेल तिथंच माल विकू शकता.
- आधीच्या कायद्यांमध्ये करार मोडल्यानंतर शेतकऱ्यांना दंड करण्यात येत होता.
- पण नव्या कायद्यात ती तरतूद रद्द केली आहे.
- कंपन्यांना जास्त फायदा मिळत असेल तर शेतकऱ्यांना बोनसही देण्यात येईल.
- संपूर्ण जोखीम करार करणाऱ्या कंपनी किंवा व्यक्तीची असेल. शेतकऱ्यांना त्याचं काहीच नुकसान नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)




