पुणे : शाळा 3 जानेवारीपर्यंत बंद राहणार, महानगरपालिकेचा निर्णय

पुण्यातील शाळा 3 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहे. पुणे महानगरपालिकेनं असा निर्णय जाहीर केला आहे.

ANI या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार, 3 जानेवारी 2021पर्यंत पुणे महापालिका क्षेत्रातली शाळा बंद राहतील. पुणे महापालिका असा निर्णय घेतला आहे.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यासंबंधी माहिती देताना म्हटलं की, "पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळा 3 जानेवारी 2021 पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय आपण घेतला आहे. कोरोना संसर्ग नियंत्रणात असला तरी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे आरोग्य लक्षात घेता, आपण हा निर्णय घेतला आहे."

"शाळा सुरू करण्यासाठी पालकांचे आवश्यक असलेल्या हमीपत्रांना यावेळेसही अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. ही देखील शाळा बंद ठेवण्याच्या निर्णयाची पार्श्वभूमी आहे," असंही त्यांनी म्हटलं आहे.

(ही बातमी सतत अपडेट होत आहे.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)