You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस : संपूर्ण देशाचं लसीकरण करू असं सरकारने कधीही म्हटलेलं नाही - केंद्रीय आरोग्य सचिव
संपूर्ण देशाचं लसीकरण करू असं सरकारने कधीही म्हटलेलं नाही. मी ही गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, असं वक्तव्य आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी केलं आहे.
विज्ञानाशी संबंधित जे मुद्दे असतात, त्यावर जेव्हा आपण चर्चा करतो, तेव्हा विषयाशी निगडीत मूलभूत माहिती घेऊनच आपण आलो तर चांगलं होईल. मगच विश्लेषण करू शकतो, असं ते पुढे म्हणाले आहेत.
देशातल्या सगळ्यांचं लसीकरण करू असं सरकारने कधीही म्हटलेलं नाही याचा भूषण यांनी पुनरुच्चार केला.
कोरोनाच्या संसर्गामुळे गंभीर स्थितीत असणाऱ्या नागरिकांचं लसीकरण करू शकलो तर त्याद्वारे संसर्गाची साखळी तोडता येईल. त्यानंतर सगळ्या लोकसंख्येचं लसीकरण करण्याची आवश्यकता नाही, असं आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितलं.
मास्कची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. लसीकरण मोहिमेनंतरही मास्कची भूमिका निर्णायक असेल. एका छोट्या वर्गापासून लसीकरणाला सुरुवात होईल. त्यामुळे लसीकरण मोहिमेदरम्यान आणि नंतरही मास्कची भूमिका कळीची असेल, असं त्यांचं म्हणणं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)